1 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 ऑगस्ट 2019)
विद्यार्थ्यांसाठी उत्तम शहरात लंडन क्यूएस क्रमवारीत प्रथम :
- विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शहरात लागोपाठ दुसऱ्या वर्षी लंडनचा पहिला क्रमांक आला असून टोकियो व मेलबर्न यांचा दुसरा व तिसरा क्रमांक लागला आहे. क्यूएस बेस्ट स्टुडंटस सिटीज रँकिंग ही क्रमवारी जाहीर करण्यात आली.
- जगातील सर्वात नामांकित अशा क्व्केरली सायमंड्स या सल्लागार आस्थापनेने ही यादी जाहीर केली असून त्यात शहरातील अग्रमानांकित विद्यापीठे, शहराची लोकसंख्या, राहणीमानाचा दर्जा, नोकरीच्या संधी, परवडणारे वास्तव्य,
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद या सहा निकषांचा विचार करण्यात आला आहे. - तसेच या क्रमवारीनुसार भारतातील बेंगळुरूचा क्रमांक 81 वा असून मुंबई 85, दिल्ली 113, चेन्नई 115 याप्रमाणे क्रमवारी आहे. तर एकूण 120 शहरांचा यात विचार करण्यात आला आहे.
- लंडनमध्ये शिकण्यास येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 2017-18 मध्ये 20 टक्के वाढली असून 2016-17 मध्ये ही संख्या 4545 होती ती 2017-18 मध्ये 5455 झाली.
नासाच्या उपग्रहाकडून तीन बाह्य़ग्रहांचा शोध :
- नासाच्या ग्रहशोधन उपग्रहाने तीन नवीन बाह्य़ग्रहांचा शोध लावला असून ते ग्रह पृथ्वीपासून 73 प्रकाशवर्षे दूर आहेत, असे वैज्ञानिकांनी सांगितले.
- तर याबाबतचा शोधनिबंध हा ‘नेचर अॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला असून यात तीन नवीन बाह्य़ग्रहांपैकी एक हा खडकाळ व पृथ्वीपेक्षा काहीसा मोठा आहे, तर इतर दोन ग्रहांवर वायू जास्त असून ते पृथ्वीपेक्षा दुप्पट आकाराचे आहेत.
- ‘टेस ऑब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट’ म्हणजे ‘टीओआय 270’ या तारका प्रणाली भोवती हे ग्रह फिरत असून ‘ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सव्र्हे सॅटेलाइट’ या उपग्रहाने ज्या प्रकारचे ग्रह शोधणे अपेक्षित होते त्याच प्रकारचे ते ग्रह आहेत, असे
रिव्हरसाइड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे. यातील लहान ग्रह हा मातृ ताऱ्यापासून अशा अंतरावर आहे की, तेथे पाणी द्रवरूपात असू शकेल. टीओआय 270 हा मातृतारा शांत आहे. - तर त्यावर कुठल्या ज्वाळा नाहीत त्यामुळे तो व त्याभोवती फिरणारे ग्रह यांचे निरीक्षण करणे सोपे आहे. यात काही ग्रह हे ताऱ्यापासून वसाहतयोग्य अंतरावर आहेत. म्हणजे ते इतक्या अंतरावर आहेत ज्यामुळे तेथे पाणी असू शकते.
आपल्या सौर मालेत पृथ्वी, मंगळ, शुक्र व बुध असे लहान ग्रह आहेत. ते खडकाळ आहेत तर शनी, गुरू, युरेनस, नेपच्यून हे ग्रह वायूने भरलेले आहेत.
IAFच्या पायलटाला पहिल्या विंगसुट स्कायडायव्हरचा मिळवला मान :
- हवाई दलातील पायलट विंग कमांडर तरुण चौधरी यांनी विंगसुट स्कायडायव्हिंग करीत इतिहास रचला आहे.उडणाऱ्या हेलिकॉप्टरमधून बाहेर उडी घेत आकाशात तरंगण्याचा साहसी खेळ खेळण्याची ऐतिहासिक कामगिरी विंग कमांडर तरुण चौधरी यांनी केली आहे.
- भारतीय हवाई दलातील एखाद्या पायलटने विंगसुट स्कायडायव्हिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे विंगकमांडर चौधरी यांच्या या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.
- कारगिल दिनानिमित्त जोधपूरमध्ये आयोजित हवाई दलाच्या विशेष कार्यक्रमात त्यांनी ही कामगिरी पार पाडली. भारतीय हवाई दलाच्या MI-17 या हेलिकॉप्टरमधून 8500 फूट उंचीवरुन त्यांनी विंगसुटच्या सहाय्याने बाहेर उडी घेत आकाशात तरंगण्याचे आव्हान पूर्ण केले.
दिनविशेष :
- 1 ऑगस्ट 1774 मध्ये जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
- 1 ऑगस्ट 1876 मध्ये कोलोरॅडो अमेरिकेचे 38 वे राज्य बनले.
- इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी 1 ऑगस्ट 1960 मध्ये झाली.
- 1 ऑगस्ट 1981 मध्ये अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.
- भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी 1 ऑगस्ट 1994 मध्ये विमा योजना लागू झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
View Comments
Tell me about indian education system.