1 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
1 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 ऑगस्ट 2020)
दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा- ऑक्सफर्ड:
भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ज्ञांच्या समितीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे.
संपूर्ण मूल्यांकनानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट समितीच्या तज्ज्ञांनी ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ला एक शिफारस केली आहे.
यामध्ये सिरम इन्स्टीट्यूला ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यास सांगितलं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं दिली.
या आठवड्याच्या सुरुवातीला समितीने सिरम इन्स्टिट्य़ूटला लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी सुधारित प्रोटोकॉल तयार करण्यास सांगितलं होतं.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अॅस्ट्राझेनेकाबरोबर या लसीला विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे (आरआयएल) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सरकारला भारत 2G मुक्त करण्यासाठी त्वरित धोरणात्मक पावलं उचलण्याची विनंती केली आहे.
“25 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या 2G सेवेतून आता बाहेर पडण्याची वेळ आली आहे. त्या सेवांना आता इतिहासाचा एक भाग बनण्याची गरज आहे,” असं ते शुक्रवारी बोलताना म्हणाले.
“सध्या देशात 30 कोटी ग्राहत 2G सेवांच्या फिचर फोनचा वापर करत आहेत. ते इंटरनेटसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. जेव्हा आपण 5G च्या जगात प्रवेश करणार आहोत, अशा वेळी ते जुन्या सेवांचा लाभ घेत असल्याचंही अंबानी म्हणाले.
“सद्यस्थितीत 30 कोटींपेक्षा अधिक ग्राहक हे 2G सेवांमध्येच अडकले आहेत. तसंच त्यांच्या फिचर फोनमुळे त्यांना इंटरनेट सेवांचा लाभही घेता येत नाही. आपण 5G च्या जगतात प्रवेश करणार आहोत. अशा वेळी 2G सेवांना इतिहास बनवण्यासाठी सरकारनं पावलं उचलली पाहिजेत,” असंही अंबानी यांनी स्पष्ट केलं.
अमेरिकेत करोनाची लागण झालेल्या सर्वात पहिल्या श्वानाचा मृत्य:
अमेरिकेत करोनाची लागण झालेल्या सर्वात पहिल्या श्वानाचा मृत्यू झाला आहे.
करोनाची लागण झाल्यानंतर माणसांमध्ये दिसणारी लक्षणं या श्वानामध्ये दिसू लागली होती.
एप्रिल महिन्यात सात महिन्यांचा जर्मन शेफर्ड बडी आजारी पडला होता. त्याचवेळी त्याचे मालक रॉबर्ट करोनाचे उपचार घेतल्यानंतर बरे होत होते.
रॉबर्ट यांना मात्र नंतर त्याला करोना झाल्याची शंका आली. पण करोनामुळे परिसरातील सर्व प्राण्यांची रुग्णालयं बंद होती.
सरकारनं रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना आता व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं.
त्यानंतर पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत योजनेला चालना देण्यासाठी सरकारनं देशात रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
परदेश व्यापार महासंचालनालयानं (डीजीएफटी) यासंदर्भात एक पत्रक काढलं आहे. रंगीत टीव्हीसाठी असलेल्या आयात धोरणात बदल केले गेले असल्याची माहिती यात देण्यात आली आहे.
2019 या आर्थिक वर्षात देशात तब्बल 7 हजार 120 कोटी रूपयांच्या रंगीत टीव्हीची आयात करण्यात आली होती.
तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये यात घट होऊन ती 5 हजार 514 कोटी रूपये इतकी झाली, 2019 या आर्थिक वर्षात रंगीत टीव्हीच्या आयातीत 52.86 टक्क्यांची वाढ झाली होती.
परंतु आता सरकारनं रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
जुलै महिन्यात देशात 11 लाख रुग्णांची नोंद:
जगात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे देशातही करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. शुक्रवारीही देशातील करोनाग्रस्तांच्या संख्येत एका दिवसातील सर्वात मोठी वाढ झाली.
देशात 57 हजार करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. दरम्यान, केवळ जुलै महिन्यात भारतात 11.1 लाख करोनाबाधित आढळले असून 19 हजार 122 जणांना करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येत 2.8 टक्क्यांनी वाढ झाली. जून महिन्याच्या अखेरिस देशात करोनाबाधितांची संख्या 4 लाखांच्या वर होती.
तर दुसरीकडे जून महिन्याच्या तुलनेत मृतांची संख्यादेखील 1.6 टक्क्यांनी वाढली आहे.
जुलै महिन्यात करोनानं इतका वेग पकडला की अखेरच्या 15 दिवसांमध्ये तब्बल 7.3 लाख रुग्णांची नोंद करण्यात आली.
सेहवाग, सरदार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत:
माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या 12 जणांच्या निवड समितीत स्थान देण्यात आले आहे.
या वर्षीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे मानकरी ठरवण्याची जबाबदारी या 12 जणांवर असणार आहे, असे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले.
अपंग क्रीडापटू दीपा मलिकचाही या 12 जणांमध्ये समावेश आहे. एकच निवड समिती क्रीडा पुरस्कार निवडीसाठी ठेवण्याचे गेल्या वर्षीपासून सुरू केले आहे.
यंदाही तीच पद्धत अवलंबवण्यात येणार आहे. खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद हे पुरस्कार या एकाच समितीमार्फत ठरवण्यात येणार आहेत.
दिनविशेष :
1 ऑगस्ट 1774 मध्ये जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
1 ऑगस्ट 1876 मध्ये कोलोरॅडो अमेरिकेचे 38 वे राज्य बनले.
इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी1 ऑगस्ट 1960 मध्ये झाली.
1 ऑगस्ट 1981 मध्ये अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.
भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी1 ऑगस्ट 1994 मध्ये विमा योजना लागू झाली.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.