1 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs
1 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 जानेवारी 2023)
पॅलेस्टाईन-इस्रायल प्रश्नावरील ठरावावर भारत तटस्थ :
- इस्रायलने पॅलेस्टाईनच्या भूभागाचा दीर्घकाळपर्यंत ठेवलेला ताबा आणि विलिनीकरणाच्या कायदेशीर परिणामांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मत मागण्याच्या संयुक्त राष्ट्र आमसभेतील ठरावावर भारत तटस्थ राहिला.
- अमेरिका आणि इस्रायलने ठरावाच्या विरोधात मतदान केले.
- भारतासह ब्राझील, जपान, म्यानमार, फ्रान्स आदी देश तटस्थ राहिले.
- ‘पूर्व जेरुसलेमसह इस्रायलव्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशातील पॅलेस्टिनी नागरिकांच्या मानवी हक्कांवर परिणाम करणाऱ्या इस्रायली आचरणाची पद्धत’ या ठरावाचा मसुदा शुक्रवारी 87 विरुद्ध 26 मतांनी मंजूर झाला.
- भारतासह 53 देश तटस्थ राहिले.
- तसेच जेरुसलेम या पवित्र शहराची लोकसंख्यानिहाय रचना, वैशिष्टय़े व स्थिती बदल, येथे लागू केलेले पक्षपाती कायदे याबाबत कायदेशीर उपाययोजना सुचवण्याचीही विनंती करण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
उत्तर कोरियाकडून पुन्हा तीन क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण :
- दक्षिण कोरियाच्या हवाई हद्दीत उत्तर कोरियाच्या ड्रोनने कथितरित्या घुसखोरी केल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने शनिवारी पुन्हा तीन क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण केले.
- उत्तर कोरियाने आपल्या पूर्व सागरी हद्दीत ही तीन कमी पल्ल्याची ‘बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्रे डागली.
- शुक्रवारी दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या हालचाली टिपण्याची क्षमता वाढावी म्हणून घन इंधन उपग्रह प्रक्षेपक (रॉकेट) प्रक्षेपित केले.
- याद्वारे हेरगिरीसाठी उपग्रह प्रक्षेपणाची दक्षिण कोरियाची योजना आहे.
- ही क्षेपणास्त्रे सुमारे 350 किलोमीटर (220 मैल) अंतर पार करून कोरिया व जपानमधील सागरी क्षेत्रात कोसळली.
- या क्षेपणास्त्रांचा अंदाजे पल्ला पाहता, दक्षिण कोरिया डोळय़ांसमोर ठेवूनच ही चाचणी केली गेली.
रोनाल्डो नव्या वर्षांपासून सौदी अरेबियात खेळणार :
- आधुनिक फुटबॉलमधील तारांकित खेळाडू पोर्तुगालचा ख्रिस्तिआनो रोनाल्डो नव्या वर्षांत सौदी अरेबियातील अल नासर क्लबकडून खेळणार आहे.
- फुटबॉल विश्वातील त्यातही मध्य आशियातील ही सर्वात मोठी घटना मानली जाते.
- अल नासर क्लबने आपल्या क्लबची जर्सी घेतलेल्या रोनाल्डोचे छायाचित्र समाज माध्यमावर टाकून या घडामोडीची माहिती जाहीर केली.
- रोनाल्डोचा हा करार सर्वात मोठा मानला जात असला, तरी कराराची रक्कम अजूनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.
- या नव्या करारामुळे युरोपातील एक आघाडीचा खेळाडू प्रथमच आशियातून खेळताना दिसणार असून, रोनाल्डोचा हा करार 2055 पर्यंत असेल.
- पाच बॅलन डी’ओर पुरस्काराचा मानकरी 37 वर्षीय रोनाल्डोचा हा कारकीर्दीमधील अखेरचा करार मानला जात आहे.
दिनविशेष:
- सन 1756 मध्ये निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.
- बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सन 1842 मध्ये सुरू झाले.
- महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.
- 1 जानेवारी 1862 पासून इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.
- विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो.ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.
- भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सत्येंद्रनाथ बोस‘ यांचा जन्म 1 जानेवारी 1894 रोजी झाला होता.
- सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
- भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक ‘कमलाकांत वामन केळकर‘ यांचा जन्म 1 जानेवारी 1902 मध्ये झाला होता.
- 1 जानेवारी 1919 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
- चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये स्वराज्य पार्टीची स्थापना केली.