1 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

1 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 जानेवारी 2023)

पॅलेस्टाईन-इस्रायल प्रश्नावरील ठरावावर भारत तटस्थ :

  • इस्रायलने पॅलेस्टाईनच्या भूभागाचा दीर्घकाळपर्यंत ठेवलेला ताबा आणि विलिनीकरणाच्या कायदेशीर परिणामांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मत मागण्याच्या संयुक्त राष्ट्र आमसभेतील ठरावावर भारत तटस्थ राहिला.
  • अमेरिका आणि इस्रायलने ठरावाच्या विरोधात मतदान केले.
  • भारतासह ब्राझील, जपान, म्यानमार, फ्रान्स आदी देश तटस्थ राहिले.
  • ‘पूर्व जेरुसलेमसह इस्रायलव्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशातील पॅलेस्टिनी नागरिकांच्या मानवी हक्कांवर परिणाम करणाऱ्या इस्रायली आचरणाची पद्धत’ या ठरावाचा मसुदा शुक्रवारी 87 विरुद्ध 26 मतांनी मंजूर झाला.
  • भारतासह 53 देश तटस्थ राहिले.
  • तसेच जेरुसलेम या पवित्र शहराची लोकसंख्यानिहाय रचना, वैशिष्टय़े व स्थिती बदल, येथे लागू केलेले पक्षपाती कायदे याबाबत कायदेशीर उपाययोजना सुचवण्याचीही विनंती करण्यात येणार आहे.

उत्तर कोरियाकडून पुन्हा तीन क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण :

  • दक्षिण कोरियाच्या हवाई हद्दीत उत्तर कोरियाच्या ड्रोनने कथितरित्या घुसखोरी केल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने शनिवारी पुन्हा तीन क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण केले.
  • उत्तर कोरियाने आपल्या पूर्व सागरी हद्दीत ही तीन कमी पल्ल्याची ‘बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्रे डागली.
  • शुक्रवारी दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या हालचाली टिपण्याची क्षमता वाढावी म्हणून घन इंधन उपग्रह प्रक्षेपक (रॉकेट) प्रक्षेपित केले.
  • याद्वारे हेरगिरीसाठी उपग्रह प्रक्षेपणाची दक्षिण कोरियाची योजना आहे.
  • ही क्षेपणास्त्रे सुमारे 350 किलोमीटर (220 मैल) अंतर पार करून कोरिया व जपानमधील सागरी क्षेत्रात कोसळली.
  • या क्षेपणास्त्रांचा अंदाजे पल्ला पाहता, दक्षिण कोरिया डोळय़ांसमोर ठेवूनच ही चाचणी केली गेली.

रोनाल्डो नव्या वर्षांपासून सौदी अरेबियात खेळणार :

  • आधुनिक फुटबॉलमधील तारांकित खेळाडू पोर्तुगालचा ख्रिस्तिआनो रोनाल्डो नव्या वर्षांत सौदी अरेबियातील अल नासर क्लबकडून खेळणार आहे.
  • फुटबॉल विश्वातील त्यातही मध्य आशियातील ही सर्वात मोठी घटना मानली जाते.
  • अल नासर क्लबने आपल्या क्लबची जर्सी घेतलेल्या रोनाल्डोचे छायाचित्र समाज माध्यमावर टाकून या घडामोडीची माहिती जाहीर केली.
  • रोनाल्डोचा हा करार सर्वात मोठा मानला जात असला, तरी कराराची रक्कम अजूनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.
  • या नव्या करारामुळे युरोपातील एक आघाडीचा खेळाडू प्रथमच आशियातून खेळताना दिसणार असून, रोनाल्डोचा हा करार 2055 पर्यंत असेल.
  • पाच बॅलन डी’ओर पुरस्काराचा मानकरी 37 वर्षीय रोनाल्डोचा हा कारकीर्दीमधील अखेरचा करार मानला जात आहे.

दिनविशेष:

  • सन 1756 मध्ये निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.
  • बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सन 1842 मध्ये सुरू झाले.
  • महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.
  • 1 जानेवारी 1862 पासून इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.
  • विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो.ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.
  • भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सत्येंद्रनाथ बोस‘ यांचा जन्म 1 जानेवारी 1894 रोजी झाला होता.
  • सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
  • भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक ‘कमलाकांत वामन केळकर‘ यांचा जन्म 1 जानेवारी 1902 मध्ये झाला होता.
  • 1 जानेवारी 1919 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
  • चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये स्वराज्य पार्टीची स्थापना केली.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago