1 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs
1 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 मार्च 2023)
फेब्रुवारी 2023 ठरला 122 वर्षांमधला सर्वात उष्ण महिना:
- फेब्रुवारी 2023 हा मगाच्या 122 वर्षांमधला सर्वात उष्ण महिना ठरला आहे.
- फेब्रुवारी महिन्यातच एप्रिल-मे सारखं वातावरण जाणवत होतंच अशात आता IMD ने दिलेल्या महितीनुसार 122 वर्षांमध्ये हा सर्वात उष्ण महिना ठरला आहे.
- भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1901 नंतर फेब्रुवारीत पहिल्यांदाच पारा इतका वाढला की 122 वर्षात हा महिना इतका उष्ण ठरला आहे.
- 1981 ते 2010 या कालावधीत वाढलेलं तापमान हे सर्वसाधारण होतं.
Must Read (नक्की वाचा):
वानखेडेत सचिन तेंडुलकरचा भव्य पुतळा पुतळा बसवला जाणार:
- सचिन तेंडुलकरने भारतासाठी खेळताना ज्या मैदानात यशाची अनेक शिखरे जिथे पादाक्रांत केली अशा वानखेडे स्टेडियममध्ये आता क्रिकेटच्या देवाचा एक भव्य दिव्य पुतळा बसवला जाणार आहे.
- क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेतल्यानंतर 10 वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- 24 एप्रिलला, तेंडुलकरच्या 50व्या वाढदिवसाला किंवा वर्षाच्या अखेरीस 50 षटकांच्या विश्वचषकादरम्यान या पुतळ्याचे अनावरण केले जाईल.
- वानखेडे स्टेडियममध्ये सध्या सचिनचे नाव असलेले स्टँड आहे.
- एमसीएने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना कॉर्पोरेट बॉक्स आणि फलंदाजीतील दिग्गज दिलीप वेंगसरकर यांच्या नावाचा स्टँड उभारून त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होत.
- मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दिवंगत शेन वॉर्नचा क्रिकेटपटूंचा सर्वात प्रसिद्ध पुतळा आहे.
Lionel Messi ने जिंकला Fifa सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब:
- अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू आणि विश्वचषक विजेता लिओनेल मेस्सीला फिफाचा पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळाला आहे.
- त्याचबरोबर महिला गटात स्पेनच्या अलेक्सिया पुटेलासने ही कामगिरी केली.
- पुटेलासने 2022 मध्ये बॅलन डी’ओर जिंकला.
- सर्वोत्तम खेळाडूसाठी मेस्सीला एम्बाप्पेपेक्षा सर्वाधिक मते मिळाली.
- लिओ मेस्सीने अलीकडेच ऑलिम्पिक डी मार्सेल विरुद्ध लिग 1 मध्ये पॅरिस सेंट-जर्मेनकडून खेळून इतिहास रचला.
- त्याने आपल्या क्लब करिअरमध्ये 700 गोल पूर्ण केले होते.
न्यूझीलंडने एका धावेने विजय मिळवत रचला इतिहास:
- न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा शानदार पराभव करून इतिहास रचला आहे.
- त्याचबरोबर इंग्लंडचा 146 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे.
- तसेच मालिकेत 1-1 अशी बरोबरीत साधली.
- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावांनी सामना जिंकणारा न्यूझीलंड हा जगातील दुसरा संघ ठरला आहे.
- यापूर्वी 1993 मध्ये अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1 धावेने विजय मिळवून वेस्ट इंडिजने हा विक्रम केला होता.
- तब्बल 30 वर्षांनंतर न्यूझीलंडने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय नोंदवून या यादीत आपले नाव नोंदवले आहे.
दिनविशेष:
- एक मार्च हा दिवस ‘जागतिक नागरी संरक्षण दिन‘ आहे.
- यलो स्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना सन 1872 मध्ये झाली होती.
- सन 1907 मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे 1 मार्च 1922 रोजी जन्म झाला.
- आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास 1947 या वर्षी पासून सुरूवात झाली.
Very nice mam and sir Thank you