1 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
1 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 मे 2019)
‘फॅनी’ चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता :
- फॅनी हे चक्रीवादळ अधिक रौद्र रूप धारण करण्याची शक्यता असून ते शुक्रवारी दुपापर्यंत ओदिशामध्ये धडकू शकते, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
- तसेच सध्या फॅनी वादळ दक्षिण पूर्वेकडे आणि बंगालच्या उपसागरात असून ते पुरीपासून 830 कि.मी.वर, विशाखापट्टणमपासून (आंध्र प्रदेश) 670 कि.मी.वर आणि त्रिंकोमालीपासून (श्रीलंका) 680 कि.मी.अंतरावर आहे, असे हवामान खात्याने 12 वाजता जाहीर केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे.
- तर फॅनी चक्रीवादळ पुढील 12 तासांमध्ये अधिक रौद्र रूप धारण करण्याची शक्यता असून ते 3 मे रोजी दुपापर्यंत ओदिशाच्या किनाऱ्यावर थडकण्याची शक्यता आहे, या वेळी 170-180 कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
- राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि भारतीय तटरक्षक दल यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):
पुडुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांना केंद्राने दिलेले अधिकार काढले :
- पुडुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना मद्रास उच्च न्यायालयाने दणका दिला. पुडुचेरी सरकारच्या दैनंदिन कामकाजामध्ये बेदी यांना हस्तक्षेप करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
- तसेच नायब राज्यपाल म्हणून केंद्र सरकारने बेदी यांना काही विशेष अधिकार दिले होते ते अधिकार न्यायालयाने काढून घेतले आहेत. या अधिकारांमुळे बेदी पुडुचेरी सरकारच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालत होत्या.
- तर सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची फाइल तपासण्यासाठी मागविण्याचा अधिकार त्यांना मिळाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी आणि बेदी यांच्यात खटके उडत होते. पुडुचेरीतील काँग्रेसचे आमदार के.
लक्ष्मीनारायणन यांनी बेदी यांच्या विशेष अधिकारांना न्यायालयात आव्हान दिले होते त्यावर न्या. आर. महादेवन यांनी आदेश दिला. - न्यायालयाने बेदी यांचे विशेषाधिकार रद्द केल्याने त्यांना आता सरकारकडून कोणतीही फाइल मागविता येणार नाही अथवा सरकारला किंवा सरकारच्या वतीने कोणताही आदेश देता येणार नाही.
‘जेट’च्या कर्मचाऱ्यांसाठी ‘विस्तारा’चा मदतीचा हात :
- जेट एअरवेज बंद झाल्यानंतर नोकरी गेलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना एअर विस्ताराने मदतीची हात दिला आहे.
विस्ताराने जेटच्या 550 कर्माचाऱ्यांना आपल्यामध्ये सामिल करुन घतले आहे. यापूर्वी स्पाईसजेटनेही जेटच्या कर्माचाऱ्यांना नोकरी देऊ केली आहे. - तसेच विस्ताराने समावून घेतलेल्या 550 कर्मचाऱ्यांमध्ये 100 पायलट्सचा समावेश आहे.
- तर लवकरच एअर विस्तारा आणि एअर एशिया जेटची विमानं आपल्या ताफ्यात समाविष्ट करुन घेणार आहेत.
- दरम्यान, जेट एअरवेजने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठीची आजपासूनच मेडिक्लेमची सुविधाही बंद केली आहे.
- टाटा समुहाच्या मालकीच्या एअर विस्ताराने जेट एअरवेजच्या 450 केबिन क्रू कर्मचाऱ्यांना आपल्याकडे नोकरी दिली आहे. त्याचबरोबर एअर इंडिया, स्पाइसजेट, गो एअर या विमान कंपन्याही जेटच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येत
आहेत. एअर एशिया जेटचे बोईंग 737 आपल्या ताफ्यात समावून घेणार आहे.
अमित पंघालची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस :
- भारतीय बॉक्सिंग महासंघाने आशियन गेम्स व आशियन चॅम्पियनशिपचा सुवर्णपदक विजेता अमित पंघाल व विश्व चॅम्पियनशिप 2017 चा कांस्यपदक विजेता गौरव बिधुडी यांच्या नावांची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
- तर अमितने जकार्तामध्ये आशियन गेम्समध्ये 49 किलो वजनगटात उज्बेकिस्तानचा विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन हसनबाय दुसमातोव्हचा पराभव करीत सुवर्णपदक पटकावले होते.
- तसेच गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कारासाठी अमितच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.
- अमितच्या नावावर विचार करण्यात आला नव्हता. कारण तो 2012 मध्ये डोप चाचणीत अपयशी ठरला होता. त्यासाठी त्याच्यावर वर्षभराची बंदी घालण्यात आली होती.
व्हेल मासा बनला रशियाचे अस्त्र :
- उत्तर नार्वेच्या समुद्रात मच्छीमारांना एक सफेद व्हेल मासा आढळला. त्याच्या गळयाभोवती हार्नेस म्हणजे पट्टयासारखे काहीतरी बांधण्यात आले होते. रशियाकडून या व्हेल माशाचा उपयोग हेरगिरीसाठी केला जात असल्याची दाट शक्यता आहे. रशियन नौदलाने या व्हेल माशाला प्रशिक्षित केले असावे अशी शक्यता नॉर्वेच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे.
- तसेच या व्हेल माशाच्या गळयातील हार्नेस म्हणजे पट्टयावर ‘इक्युपमेंट ऑफ सेंट पीटसबर्ग’ असे लिहिलेले होते. या हार्नेसचा उपयोग कॅमेऱ्यासाठी किंवा अन्य उपकरणांसाठी केला जात असावा अशी शक्यता नॉर्वेच्या तज्ञांनी व्यक्त केली.
- नॉर्वेची सीमा रशियाला लागून आहे. फिनमार्कच्या समुद्रात मागच्या आठवडयात सर्वप्रथम हा व्हेल मासा दिसला होता.
जपानच्या सम्राटांचा स्वेच्छेने राज्यत्याग :
- जपानचे लोकप्रिय सम्राट अकिहितो यांनी स्वेच्छेने राज्यत्याग केला. अखंडपणे 200 वर्षे सुरू असलेली जपानची राजेशाही ही जगातील सर्वात जुनी राजेशाही असून, त्यातील कोणाही सम्राटाने स्वत:हून राजसिंहासनावरून पायउतार होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- तसेच टोकियोच्या राजप्रासादाच्या ‘पाईन दालनात’ सम्राट अकिहितो यांनी आपली राज्यवस्त्रे, तलवार आणि पवित्र मानला जाणारा मुकुटमणी उतरवून ठेवला.
- सम्राट या नात्याने केलेल्या शेवटच्या भाषणात अकिहितो यांनी जपानच्या प्रजेचे मनापासून आभार मानले व जपानसह संपूर्ण जगात शांतता आणि आनंद नांदावा, अशी कामना केली.
दिनविशेष :
- 1 मे : जागतिक कामगार दिन / महाराष्ट्र दिन / गुजरात दिन
- 1 मे 1760 मध्ये किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले.
- द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये 1 मे 1840 मध्ये जारी केले गेले.
- हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल 1 मे 1844 मध्ये स्थापन झाले.
- 1 मे 1882 मध्ये आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.
- आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्या बैठकीत 1 मे 1886 मध्ये पहिल्यांदा साजरा केला.
- 1 मे 1890 मध्ये जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
- रामकृष्ण मिशन ची सुरूवात 1 मे 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी केली.
- 1 मे 1927 मध्ये जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
- सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण 1 मे 1930 मध्ये करण्यात आले.
- गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना 1 मे 1960 मध्ये झाली.
- 1 मे 1962 मध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा