1 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs

मनोज पांडे
मनोज पांडे

1 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 मे 2022)

लष्करप्रमुखपदाची सूत्रे मनोज पांडे यांच्याकडे :

  • जनरल मनोज पांडे यांनी 29 वे लष्करप्रमुख म्हणून शनिवारी सूत्रे स्वीकारली.
  • सेवानिवृत्त झालेले लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या जागी ते आले आहेत.
  • तर आतापर्यंत लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत असलेले जनरल पांडे हे लष्कराचे नेतृत्व करणारे अभियांत्रिकी शाखेतील (कॉर्प्स ऑफ इंजिनीयर्स) पहिले अधिकारी ठरले आहेत.
  • तसेच 1 फेब्रवारीला लष्कर उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी जनरल पांडे हे सिक्कीम व अरुणाचल प्रदेश सेक्टरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या ईस्टर्न आर्मी कमांडचे नेतृत्व करत होते.
  • आपल्या उल्लेखनीय कारकीर्दीत जनरल पांडे यांनी अंदमान व निकोबार कमांडचे प्रमुख कमांडर म्हणूनही काम पाहिले आहे.
  • तर तिन्ही सेवा एकत्रित असलेले हे देशातील एकमेव कमांड आहे.

स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका नौदलाकडे सुपूर्द केली जाणार :

  • स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ( aircraft carrier) ‘आयएनएस विक्रांत’ (INS Vikrant) ही भारतीय नौदलाच्या ( Indian Navy) सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे.
  • तसेच आत्तापर्यंत झालेल्या विविध चाचण्या या यशस्वी झाल्या आहेत, विक्रांवरील सर्व उपकरणांनी समाधानकारक काम केले आहे.
  • तर आता लवकरच विक्रांत शेवटच्या चाचण्यांकरता कोचिन बंदरातून रवाना होणार आहे.
  • ही चाचणी यशस्वी झाल्यावर मे महिन्यात विक्रांत नौदलाकडे सुपूर्द केली जाणार आहे.
  • कोचिन शिपयार्डकडून विक्रांतची बांधणी करण्यात आली आहे.
  • भारतात प्रथमच स्वबळावर कोचिन शिपयार्डमध्ये विमानवाहू युद्धनौका बांधण्यात आली आहे.
  • 262 मीटर लांब आणि साधारण 14 मजली उंच अशी 45 हजार टन वजनाची आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौका आहे.
  • तर पुर्ण क्षमतेने वापर झाल्यास या युद्धनौकेवर 40 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर राहू शकतात. हवाई हल्ल्याला प्रतिरोध करणारी यंत्रणा आणि क्षेपणास्त्रे विक्रांतवर तैनात आहेत.

ले. जनरल बी. एस. राजू लष्कराचे उपप्रमुख :

  • लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांची लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तर 1 मे रोजी ते कार्यभार स्वीकारतील.
  • सध्याचे लष्कराचे उपप्रमुख असलेल्या लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची लष्करप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आल्याने राजू यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तसेच सध्या बी. एस. राजू हे लष्करी मोहिमांचे महासंचालक आहेत.

आशिया बॅडमिंटन स्पर्धात सिंधूला कांस्यपदक :

  • जपानच्या अकाने यामागुचीकडून शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत तीन गेममध्ये पराभूत झाल्यामुळे दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूची आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील वाटचाल कांस्यपदकासह संपुष्टात आली.
  • 26 वर्षीय सिंधूने सकारात्मक सुरुवात करीत विजयी घोडदौड कायम राखण्याची आशा दाखवली.
  • परंतु अग्रमानांकित आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरील यामागुचीच्या खेळापुढे सिंधूचा निभाव लागला नाही.
  • तसेच एक तास आणि सहा मिनिटांत यामागुचीने 13-21, 21-19, 21-16 अशा फरकाने हा सामना जिंकत अंतिम फेरी गाठली.

दिनविशेष :

  • 1 मे : जागतिक कामगार दिन / महाराष्ट्र दिन / गुजरात दिन
  • 1 मे 1760 मध्ये किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले.
  • द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये 1 मे 1840 मध्ये जारी केले गेले.
  • हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल 1 मे 1844 मध्ये स्थापन झाले.
  • 1 मे 1882 मध्ये आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.
  • आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्‍या बैठकीत 1 मे 1886 मध्ये पहिल्यांदा साजरा केला.
  • 1 मे 1890 मध्ये जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
  • रामकृष्ण मिशन ची सुरूवात 1 मे 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी केली.
  • 1 मे 1927 मध्ये जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
  • सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण 1 मे 1930 मध्ये करण्यात आले.
  • गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना 1 मे 1960 मध्ये झाली.
  • 1 मे 1962 मध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 मे 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.