1 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 मे 2022)
लष्करप्रमुखपदाची सूत्रे मनोज पांडे यांच्याकडे :
जनरल मनोज पांडे यांनी 29 वे लष्करप्रमुख म्हणून शनिवारी सूत्रे स्वीकारली.
सेवानिवृत्त झालेले लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या जागी ते आले आहेत.
तर आतापर्यंत लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत असलेले जनरल पांडे हे लष्कराचे नेतृत्व करणारे अभियांत्रिकी शाखेतील (कॉर्प्स ऑफ इंजिनीयर्स) पहिले अधिकारी ठरले आहेत.
तसेच 1 फेब्रवारीला लष्कर उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी जनरल पांडे हे सिक्कीम व अरुणाचल प्रदेश सेक्टरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या ईस्टर्न आर्मी कमांडचे नेतृत्व करत होते.
आपल्या उल्लेखनीय कारकीर्दीत जनरल पांडे यांनी अंदमान व निकोबार कमांडचे प्रमुख कमांडर म्हणूनही काम पाहिले आहे.
तर तिन्ही सेवा एकत्रित असलेले हे देशातील एकमेव कमांड आहे.
स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका नौदलाकडे सुपूर्द केली जाणार :
स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ( aircraft carrier) ‘आयएनएस विक्रांत’ (INS Vikrant) ही भारतीय नौदलाच्या ( Indian Navy) सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे.
तसेच आत्तापर्यंत झालेल्या विविध चाचण्या या यशस्वी झाल्या आहेत, विक्रांवरील सर्व उपकरणांनी समाधानकारक काम केले आहे.
तर आता लवकरच विक्रांत शेवटच्या चाचण्यांकरता कोचिन बंदरातून रवाना होणार आहे.
ही चाचणी यशस्वी झाल्यावर मे महिन्यात विक्रांत नौदलाकडे सुपूर्द केली जाणार आहे.
कोचिन शिपयार्डकडून विक्रांतची बांधणी करण्यात आली आहे.
भारतात प्रथमच स्वबळावर कोचिन शिपयार्डमध्ये विमानवाहू युद्धनौका बांधण्यात आली आहे.
262 मीटर लांब आणि साधारण 14 मजली उंच अशी 45 हजार टन वजनाची आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौका आहे.
तर पुर्ण क्षमतेने वापर झाल्यास या युद्धनौकेवर 40 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर राहू शकतात. हवाई हल्ल्याला प्रतिरोध करणारी यंत्रणा आणि क्षेपणास्त्रे विक्रांतवर तैनात आहेत.
ले. जनरल बी. एस. राजू लष्कराचे उपप्रमुख :
लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांची लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर 1 मे रोजी ते कार्यभार स्वीकारतील.
सध्याचे लष्कराचे उपप्रमुख असलेल्या लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची लष्करप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आल्याने राजू यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच सध्या बी. एस. राजू हे लष्करी मोहिमांचे महासंचालक आहेत.
आशिया बॅडमिंटन स्पर्धात सिंधूला कांस्यपदक :
जपानच्या अकाने यामागुचीकडून शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत तीन गेममध्ये पराभूत झाल्यामुळे दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूची आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील वाटचाल कांस्यपदकासह संपुष्टात आली.
26 वर्षीय सिंधूने सकारात्मक सुरुवात करीत विजयी घोडदौड कायम राखण्याची आशा दाखवली.
परंतु अग्रमानांकित आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरील यामागुचीच्या खेळापुढे सिंधूचा निभाव लागला नाही.
तसेच एक तास आणि सहा मिनिटांत यामागुचीने 13-21, 21-19, 21-16 अशा फरकाने हा सामना जिंकत अंतिम फेरी गाठली.
दिनविशेष :
1 मे : जागतिक कामगार दिन / महाराष्ट्र दिन / गुजरात दिन
1 मे 1760 मध्ये किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले.
द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये 1 मे 1840 मध्ये जारी केले गेले.
हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल 1 मे 1844 मध्ये स्थापन झाले.
1 मे 1882 मध्ये आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्या बैठकीत 1 मे 1886 मध्ये पहिल्यांदा साजरा केला.
1 मे 1890 मध्ये जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
रामकृष्ण मिशन ची सुरूवात 1 मे 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी केली.
1 मे 1927 मध्ये जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण 1 मे 1930 मध्ये करण्यात आले.
गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना1 मे 1960 मध्ये झाली.
1 मे 1962 मध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.