1 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

1 October 2018 Current Affairs In Marathi

1 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2018)

एलपीजी, सीएनजी आणि एटीएफच्या दरातही वाढ:

  • पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये दररोज होत असलेल्या वाढीमुळे त्रस्त असलेल्या सामान्य व्यक्तीवर आता महागाईचा तिहेरी झटका बसला आहे.
  • स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबरोबर आता सीएनजीही महाग झाले आहे. त्याचबरोबर विमान इंधनाचे (एटीएफ) देशांतर्गत दर 2650 रूपये प्रति किलोलीटर वाढल्यामुळे हवाई प्रवासासाठी आता खिसा रिकामा करावा लागणार आहे. नवीन किमती या 30 सप्टेंबर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.
  • इंडियन ऑइलने जारी केलेल्या निवेदनानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमती आणि विदेश मुद्रा विनिमय दरातील चढ-उतारामुळे ही वाढ करण्यात आली आहे.
  • स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर असलेल्या ग्राहकाच्या बँक खात्यात ऑक्टोबरमध्ये 376.60 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी जमा केली जाईल. सप्टेंबर महिन्यात 320.49 रुपये होत होती.

अभिजित कटकेला सुवर्णपदक:

  • हरयाणाच्या मल्लांनी 23 वर्षांखालील वयोगटाच्या फ्री स्टाइल टाटा मोटर्स राष्ट्रीय कुस्ती स्पध्रेवर वर्चस्व गाजवले असले, तरी अभिजित कटकेच्या सुवर्णपदकासह आणखी तीन रौप्यपदके कमावत महाराष्ट्राने छाप पाडली. महाराष्ट्राने एकूण 139 गुणांसह तिसरे स्थान संपादन केले.
  • 125 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अभिजितने सेनादलाच्या संजयचा 7-2 असा पाडाव करून सुवर्णपदक पटकावले. Abhijit Katke
  • 74 किलो गटाच्या अंतिम सामन्यात हरयाणाच्या प्रवीणने महाराष्ट्राच्या कुमार शेलारला 15-3 अशा फरकाने नामोहरम केले.
  • 65 किलो गटात दिल्लीच्या सुरजीतने अक्षय हिरगुडेला पराभूत केले, तर 57 किलो गटात दिल्लीच्या रवी कुमारने महाराष्ट्राच्या सागर मारकडचा 10-4 असा पराभव केला.
  • तसेच या स्पध्रेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या मल्लांना 12 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत रोमानिया येथे होणाऱ्या 23 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार:

  • इंधनदरवाढ आणि रुपयाच्या मूल्यातील चढउताराच्या पाश्र्वभूमीवर 5 ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. कर्जाच्या व्याजदरांबाबतही उत्सुकता आहे.
  • रिझव्‍‌र्ह बँकेकडून होणारी पतधोरण बैठक, रुपयाची मूल्यघसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमतीतील वाढ यांच्यावरच येत्या आठवडय़ातील शेअर बाजारातील स्थिती अवलंबून असेल असे तज्ज्ञांनी सांगितले. RBI
  • बाजारात सध्या अस्थिरता आहे. त्याला स्थैर्य मिळेपर्यंत आणि गमावलेला विश्वास पुन्हा प्रस्थापित होईपर्यंत बाजारात मंदीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेची संभाव्य पतधोरण बैठक बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाची असेल, असे निओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनाद नायर यांनी सांगितले.
  • व्याजदराबाबतच्या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष आहे, असे एपिक रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुस्तफा नदीम म्हणाले.
  • बँकेने व्याजदर 0.25 टक्क्य़ाने वाढवले तर बाजारात प्रतिक्रिया उमटेल, असा अंदाज सॅमको सिक्युरिटीज अ‍ॅण्ड स्टॉकनोटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिमीत मोदी यांनी व्यक्त केला.

दीपिका कुमारीला विश्व तिरंदाजीत कांस्यपदक:

  • भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने येथे 31 सप्टेंबर रोजी तिरंदाजी विश्वचषक फायनलच्या तणावपूर्ण प्ले ऑफमध्ये लिजा उनरूला पिछाडीवर टाकत कांस्य पदकाची कमाई केली.
  • दोन्ही तिरंदाज पाच सेट संपल्यावर 5-5 अशा बरोबरीवर होते. त्यामुळे त्यांना शूट ऑफचा सामना करावा लागला. दीपिका आणि लिजा यांनी 9 गुण मिळवले; मात्र दीपिकाचा शॉट जवळ असल्याने ती विजयी ठरली.
  • तसेच दीपिका हिने विश्वकप फायनल्समध्ये पाचव्यांदा पदक मिळवले आहे. या आधी ती चार वेळा रौप्यपदकविजेती राहिली आहे.
  • पाचव्या सेटमध्ये ड्रॉसोबत दीपिका तिसरे स्थान मिळवू शकली असती; मात्र प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत ती येथे झुंजताना दिसली. तिचा शॉट बाहेर गेला. या स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी कंपांऊंड मिश्र प्रकारात एक रौप्य जिंकले.

दिनविशेष:

  • 1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय कॉफी दिन तसेच आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्तींचा दिन आहे.
  • सन 1837 मध्ये भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
  • सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या अ‍ॅनी बेझंट यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1847 मध्ये झाला.
  • गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग.दि. माडगूळकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 मध्ये झाला.
  • भारतात 1958 या वर्षापासून दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
  • भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी सन 1959 मध्ये भारताचे 6वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 ऑक्टोबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.