Current Affairs (चालू घडामोडी)

1 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

1 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2019)

चीन मिसाईलचे आज अनावरण :

  • चीनमध्ये आज राष्ट्रीय दिवस साजरा केला जाणार आहे. या निमित्त चीन ताकदीचे प्रदर्शन करणार आहे.
  • तर रस्त्यांवर 15 हजार जवान आणि अनेक अत्याधुनिक शस्त्रात्रांचे प्रदर्शन होणार आहे.
  • तसेच यामध्ये असेही एक मिसाईल आहे जे अमेरिकेच्या उरात धडकी भरवू शकते. चीन ते अमेरिका हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करू शकण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. याशिवाय अन्य काही शस्त्रास्त्रे आहेत जी याआधी दाखविण्यात आली नव्हती.
  • Dongfeng-17 एक लघू मध्यम पल्ल्याचे मिसाईल आहे जे हाइपरसोनिक ग्‍लाइड व्हेईकल लाँच करू शकते. हे मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने अंतर कापते. एवढेच नाही तर हे मिसाईल अमेरिकेच्या सुरक्षा प्रणाली
    शिल्ड मिसाईलला भेदण्याची क्षमता ठेवते. उड्डान करताना हे मिसाईल त्याच्या लक्ष्यानुसार उंची कमी किंवा जास्त करू शकते. याशिवाय हे मिसाईल आण्विक हत्यारांशिवाय कव्हेंशन वायरहेड नेण्यासही सक्षम आहे. 2017 मध्ये या
    मिसाईलची चाचणी झाली होती. या मिसाईलने पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाऊन पुन्हा कक्षेत येण्याचा विक्रम केला होता.
  • तर मिसाईलचे पूर्ण नाव Dongfeng-41 आहे. ही आयसीबीएम मिसाईल पहिल्यांदाच परेडमध्ये भाग घेणार आहे. ही मिसाईल 10 मॅकच्या वेगाने उड्डाण करते. या मिसाईलची रेंज 7500 मैल असून जगातील कोणत्याही भागात
    काही मिनिटांत हल्ला चढवू शकते. या मिसाईलमुळे चीन अमेरिकेवर केवळ 20 मिनिटांत हल्ला करू शकते. महत्वाचे म्हणजे एका वेळी ही मिसाईल 10 लक्ष्यांचा भेद करण्यास सक्षम आहे. तसेच अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. अमेरिका आणि रशियाकडेही अशा प्रकारची मिसाईल आहे. तसेच रडारलाही ही मिसाईल सापडत नाही. या मिसाईलमुळे चीनला वेगवेगळ्या ठिकाणी मिसाईल तैनात करण्यापासून मुक्ती मिळाली आहे.
  • विमान दिसायला साध्या प्रवासी विमानासारखे आहे. मात्र, या विमानातून लांबच्या ठिकाणी बॉम्बवर्षाव करता येतो. नॅशनल डे परेडच्या रिहर्सलवेळी हे विमान दिसले आहे. सहा विमानांनी आकाशात कसरती केल्या होत्या. या वेळी या
    विमानांना KD-20/CJ-10K आणि KD-63 क्रूझ मिसाईल लावलेली होती. हे विमान हवेतल्या हवेत इंधन भरू शकते.

प्लास्टिक, थर्माकोलबंदीच्या सूचना केंद्राने केल्या प्रसिद्ध :

  • केंद्र सरकारची प्लॅस्टिकबंदी 2 आॅक्टोबरपासून देशभर लागू होत असून, त्यात थर्मोकोलच्या वस्तू, तसेच प्लॅस्टिकचा वापर असलेले कप आणि अन्य वस्तूंचाही समावेश आहे.
  • तर एवढेच नव्हे, 51 मायक्रॉनवरील पिशव्यांवरही ही बंदी आहे. मात्र, प्लॅस्टिकच्या बाटल्यांना यातून वगळण्यात आले आहे.
  • तसेच या संदर्भात सर्व राज्यांसाठी एक आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एक अशा दोन अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक उपक्रम, कंपन्या, खासगी कंपन्या, सर्व सरकारी व खासगी कंपन्या, कार्यालये यांचा त्यात समावेश
    आहे. सर्व सरकारी व खासगी कार्यालयांना प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • या बंदीमुळे यापुढे कोणत्याही आकाराच्या व जाडीच्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, स्ट्रॉ, सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वस्तू वापरता येणार नाहीत. सरकारी व खासगी कार्यालयात प्लॅस्टिक व थर्माकोलची फुले, बॅनर्स, झेंडे, कुंड्या, बाटल्या, फोल्डर्स वा प्लॅस्टिक, थर्माकोलच्या वस्तू न वापरण्याच्या सूचना आहेत.

अखेर बाबर आझमने करुन दाखवलं :

  • मोठ्या कालावधीनंतर घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध क्रिकेट खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने आश्वासक सुरुवात केली आहे. कराचीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर 67 धावांनी मात केली.
  • तर बाबर आझमच्या शतकी खेळाच्या जोरावर पाकिस्तानने 305 धावांचा पल्ला गाठला. बाबरने संयमी खेळी करत 105 चेंडूत 115 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
  • तसेच यानंतर उस्मान शिनवारीने श्रीलंकेचा निम्मा संघ गारद करत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
    श्रीलंकेचा संघ 238 धावांपर्यंतच मजल मारु शकला. या खेळीदरम्यान बाबर आझमने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे.
  • श्रीलंकेविरुद्ध झळकावलेलं शतक हे बाबर आझमचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं 11 वं शतकं ठरलं आहे. सर्वात कमी डावांमध्ये 11 शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला धोबीपछाड देत बाबर आझम तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

10 महिन्याच्या बाळाच्या आईने मोडला उसेन बोल्टचा विक्रम :

  • अमेरिकेच्या एलिसन फेलिक्स हिने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उसेन बोल्टला मागे टाकत नवा इतिहास रचला.
  • फेलिक्सने दोहा येथे सुरू असलेल्या स्पर्धेत 4 गुणिले 400 मीटर मिश्र रिले प्रकारात आपल्या संघाला सुवर्णपदक जिंकवून दिले आणि स्टार धावपटू उसेन बोल्टचा विक्रम मोडीत काढला.
  • तर महत्वाची बाब म्हणजे केवळ 10 महिन्यांचे बाळ असलेल्या मातेने हा दमदार पराक्रम करून दाखवला आहे.
  • तसेच 10 महिन्यांपूर्वी फेलिक्सने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सहा वेळा ऑलिम्पिक विजेत्या फेलिक्सने गेल्या वर्षी मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर प्रथमच मैदानावर उतरली. त्यामुळे तिचा हा विक्रम अधिकच खास मानला जातो आहे.
  • फेलिक्सने 4 गुणिले 400 मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचसोबत तिचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत हे 12 वे सुवर्णपदक ठरले.
  • एखाद्या जागतिक स्पर्धेत एवढी सुवर्णपदके जिंकणारी फेलिक्स पहिलीचं धावपटू खेळाडू ठरली.
  • यापूर्वी हा विक्रम उसेन बोल्ट याच्या नावावर होता. त्याच्या नावावर आतापर्यंत 11 सुवर्णपदके आहेत. तो 2017 मध्ये अखेरचा स्पर्धेत उतरला होता. पण त्याचा हा विक्रम फेलिक्सने मोडला.

ऑक्टोबरमध्ये 11 दिवस राहणार बँका बंद :

  • दिवाळी आणि दसऱ्या या सणांमुळे पुढील महिन्यात 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये बँकेची कामासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
  • 11 दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती, राम नवमी, दसरा, दिवाळी, गोवर्धन पुजा आणि भाऊबीज यांसारखे सण आले आहेत.
  • तर ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग तीन दिवस आणि चौथ्या आठवड्यात सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत.
  • तसेच सहा ऑक्टोबरला रविवार, सात ऑक्टोबरला महानवमी आणि 8 ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त बँका बंद राहणार आहेत. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत.
  • महिन्यातील चौथा शनिवार असल्याने २६ ऑक्टोबरला बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. दिवाळीला रविवारी सुरुवात होणार असून, 28 ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आहे. 29 ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँका बंद राहणार आहेत.

दिनविशेष:

  • 1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय कॉफी दिन तसेच आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्तींचा दिन आहे.
  • सन 1837 मध्ये भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
  • सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या अ‍ॅनी बेझंट यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1847 मध्ये झाला.
  • गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग.दि. माडगूळकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 मध्ये झाला.
  • भारतात 1958 या वर्षापासून दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
  • भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी सन 1959 मध्ये भारताचे 6वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 ऑक्टोबर 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

View Comments

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago