10 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 एप्रिल 2019)
सीआरपीएफ 192 बटालियनतर्फे शौर्य दिन साजरा:
- गडचिरोली पोलीस संकुलात असलेल्या सीआरपीएफ 192 बटालियनतर्फे 9 एप्रिल रोजी 54वा शौर्यदिवस साजरा करण्यात आला.
- सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक मानस रंजन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले.
- कार्यक्रमाप्रसंगी सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी व जवानांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मार्गदर्शन करताना मानस रंजन यांनी 9 एप्रिल 1965 रोजी सीआरपीएफच्या जवानांनी दाखविलेल्या साहसाची माहिती दिली. उपस्थित सर्व जवानांना ‘आम्ही देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या बहादुरीचा परिचय देत राहू’ अशी शपथ देण्यात आली.
- विशेष शौर्याबद्दल सीआरपीएफ जवान प्रवीण पाटील यांना 26 जानेवारी 2019 रोजी गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींद्वारे सन्मानित करण्यात आले. शौर्यदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रवीण पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
- 9 एप्रिल 1965 रोजी सीआरपीएफच्या चार कंपन्यांनी गुजरात राज्यातील कच्छ परिसरात पाकिस्तानच्या एका इंफेट्री ब्रिगेडवर हमला करून सदर इंफेट्री पूर्णपणे नष्ट केली. ही घटना युद्धकौशल्याचे अद्वितीय प्रतीक मानले जाते. तेव्हापासून शौर्यदिन साजरा होतो.
भारतीय गोळाफेकपटू मनप्रीत कौरवर 4 वर्षांची बंदी:
- आशियाई सुवर्णपदक विजेती भारतीय गोळाफेकपटू मनप्रीत कौर हिच्यावर 2017 मध्ये चार वेळा उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (नाडा) चार वर्षांची बंदी घातली आहे.
- मनप्रीतच्या बंदीचा कालावधी हा 20 जुलै 2019 पासून सुरू होणार आहे, असे ‘नाडा’च्या उत्तेजकविरोधी शिस्तपालन समितीने 29 मार्च रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
- ‘मनप्रीत कौर हिच्यावर चार वर्षांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे,’ असे ‘नाडा’चे महासंचालक नवीन अगरवाल यांनी सांगितले. आता या बंदीविरोधात उत्तेजकविरोधी लवादाकडे दाद मागण्याचा पर्याय मनप्रीत कौर हिच्याकडे उपलब्ध आहे. मनप्रीतवर करण्यात आलेल्या कारवाईनुसार तिची बंदीची शिक्षा 20 जुलै 2019 पासून सुरू होणार आहे.
- मनप्रीतची उत्तेजक चाचणी 2017 मध्ये उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यामुळे तिला आता आशियाई अजिंक्यपद अथलेटिक्स स्पर्धेत मिळवलेल्या सुवर्णपदकाला मुकावे लागणार आहे. त्याचबरोबर तिचा राष्ट्रीय विक्रमही पुसला जाणार आहे.
दिघा धरण हस्तांतराला हवे जाहीरनाम्यात प्राधान्य:
- ब्रिटिशांनी 160 वर्षांपूर्वी बांधलेल्या दिघा धरणातील जलसाठ्याचा सद्यस्थितीमध्ये काहीही उपयोग होत नाही. धरण रेल्वेकडून महापालिकेकडे हस्तांतर करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला आहे.
- लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवारांनी त्यांच्या जाहीरनाम्यात या विषयाला प्राधान्य द्यावे व जे निवडून येतील, त्यांनी पाच वर्षांत हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली आहे.
- लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. मतदार संघामधील प्रश्न सोडविण्याचे व विकासकामे करण्याची आश्वासने दिली जात आहेत. नागरिकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षांविषयी मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दिघा धरणाच्या हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
- देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान 1853 मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हाच्या रेल्वे इंजिनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता होती. वर्षभर पाणीपुरवठा करता यावा, यासाठी ब्रिटिशांनी दिघामध्ये धरण बांधले. 18.10 एकर जमिनीवर 185 मीटर लांबीचे व 14.95 मीटर उंचीचे हे धरण आहे.
- उन्हाळा सुरू झाल्यामुळे राज्यात सर्वत्र पाणीटंचाईची स्थिती आहे. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना अनेक किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. अनेक शहरामध्ये दोन दिवसांनी ते आठवड्यामधून एकदाच पाणीपुरवठा होत आहे; पण दिघा धरणामध्ये पाणीसाठा असताना त्याचा काहीच उपयोग होत नाही. राज्यात छोटी-मोठी 1821 धरणे असून, त्यामधील जलसाठ्याचा वापर न होणारे दिघा हे एकमेव धरण आहे.
नीरज इंगळे यांना तिसऱ्यांदा ऑस्कर अवॉर्ड:
- ऑस्कर अवॉर्ड हे नावच त्याच्या व्यापकतेची साक्ष देते. ही प्रतिष्ठित बाहुली अमरावती येथील पस्तीशीतील तरुणाने तिसर्यांदा पटकावली, असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. नीरज वसंतराव इंगळे यांनी ‘स्पायडर मॅन-इन्टू द स्पायडर व्हर्स’ या चित्रपटाच्या व्हीएफएक्सच्या कामगिरीसाठी ऑस्कर अवॉर्ड तिसर्यांदा पटकावला आहे.
- नीरज इंगळे हे व्हॅन्कुअर (कॅनडा) स्थित सोनी पिक्चर्स इमेजवर्क्स या चित्रपटांना व्हिज्युअल इफेक्ट्सद्वारे सर्वांगसुंदर बनविणार्या कंपनीमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स डिजिटल कंपोझिटर म्हणून अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्यासमवेत असलेल्या 400 जणांच्या चमूने गतवर्षी प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडर मॅन-इन्टू द स्पायडर व्हर्स’ या चित्रपटासाठी व्हिज्युअल इफेक्ट्स निर्माण केले. त्यासाठी त्यांना यंदाचा ‘बेस्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म’ या वर्गवारीत ऑस्कर पुरस्काराचा बहुमान लाभला.
- नीरज इंगळे यांनी सर्वप्रथम 2008 मध्ये ‘गोल्डन कम्पास’ या चित्रपटासाठी सर्वप्रथम ऑस्कर अवॉर्ड पटकावला. त्यानंतर 2013 मध्ये आलेल्या ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी प्रतिष्ठेच्या ऑस्कर अवॉर्डची बाहुली पटकावली. 12 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 35 ब्लॉकबस्टर हॉलीवूड चित्रपटांसाठी काम केल्याची नोंद आहे.
दिनविशेष:
- होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमान यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी झाला.
- विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर यांचा जन्म 10 एप्रिल 1843 मध्ये झाला.
- बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म 10 एप्रिल 1894 मध्ये झाला होता.
- अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. धनंजय रामचंद्र तथा द.रा. गाडगीळ यांचा जन्म 10 एप्रिल 1901 रोजी झाला.
- इंग्लंडमधील साऊथम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने 1912 यावर्षी पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
- सन 1955 मध्ये योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
View Comments
Police bharti 2019 any news when will start