Current Affairs (चालू घडामोडी)

10 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

10 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 ऑगस्ट 2018)

राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश सिंह:

  • राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश नारायण सिंह यांची निवड झाली आहे. सगळ्या खासदारांवर आता हरीकृपा राहिल असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. दोन्हीकडे हरी होते. मात्र हरिवंश नारायण यांचा विजय झाला याचा मनस्वी आनंद झाला असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
  • हरिवंश यांनी आपल्या वृत्तपत्रतात संसद कशी चालवावी याचा स्तंभ चालवला होता. त्यामुळे त्यांना संसद कशी चालवायची हे ठाऊक आहे. दशरथ मांझी यांची बातमी शोधून काढणारे ते पत्रकार आहेत. ते राज्यसभेच्या उपसभापतीपदी बसल्याने त्यांच्या अनुभवाचा सगळ्यांनाच फायदा होईल यात शंका नाही असेही मोदी यांनी म्हटले आहे. संसदेत त्यांच्या येण्याने एक प्रगल्भ नेता आपल्या सगळ्यांनाच मिळाला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 ऑगस्ट 2018)

तिहेरी तलाक विधेयकात सुधारणा:

  • तिहेरी तलाक बेकायदा ठरवणाऱ्या आणि तो देणाऱ्या पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद असलेल्या विधेयकात केंद्रीय मंत्रिमंडळाने 9 ऑगस्ट रोजी सुधारणा केली. या कायद्याचा दुरूपयोग होऊ नये, यासाठी ही सुधारणा झाली असून संबंधित पतीला परिस्थितीनुरूप जामीन देण्याचा अधिकार त्यानुसार न्यायालयाला देण्यात आला आहे.
  • हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने त्याच्या गैरवापराची भीती मोठय़ा प्रमाणात व्यक्त झाली होती. कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली.
  • मुस्लीम महिला विवाहविषयक हक्क संरक्षण‘ हे विधेयक गेल्या वर्षी लोकसभेत मंजूर करण्यात आले, मात्र ते राज्यसभेत प्रलंबित आहे. 10 ऑगस्ट रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस असून हे सुधारित विधेयक राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेत ते मंजूर झाले, तर लोकसभेत परत पाठवले जाऊन त्यातील सुधारणांना मंजुरी मिळवली जाईल, असे सांगण्यात आले. या विधेयकाला आता विरोधकांनी मंजुरी द्यावी, असे प्रसाद म्हणाले.
  • तिहेरी तलाक हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने पोलीस गुन्हेगाराला जामीन देऊ शकत नाहीत. त्यासाठी त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जावे लागेल, असे प्रसाद यांनी सांगितले.
  • अर्थात पत्नीला भरपाई देण्यास पतीने मान्यता दिली तरच हा जामीन देता येणार आहे. अर्थात या भरपाईची व्याप्ती किती असावी, याचा निर्णयही न्यायालयावरच सोपवण्यात आला आहे.

परिक्षार्थी विद्यार्थांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या:

  • रेल्वेतील नोकरी म्हणजे सुरक्षित आणि चांगली असा समज असतो. याचा फायदा घेण्याची संधी नुकतीच चालून आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये मोठी नोकरी भरती केली जाणार आहे. परिक्षार्थी विद्यार्थांनी त्यासाठी अर्ज भरले आहेत. रेल्वेकडून ही परिक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे.
  • तसेच त्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांची होणारी तारांबळ टाळण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत. बिहार-मुझफरनगर आणि तेलंगना-सिंकदराबाद यादरम्यान दोन विशेष रेल्वे धावणार आहेत. या ट्रेनमधील सर्व बोगी या परिक्षार्थीसाठी अनारक्षित असतील.
  • लोको पायलट आणि टेक्निशियन पदासाठी 66,520 जागांसाठी परिक्षा होणार आहे. यासाठी 48 लाख जणांनी अर्ज दाखल केला आहे. 31 ऑगस्ट पर्यंत रेल्वेची परिक्षा वेगवेगळ्या ठिकाणावर होणार आहे.
  • 10, 13, 14, 17, 20, 21, 29, 30 आणि 31 ऑगस्ट रोजी रेल्वेची ऑनलाईन परिक्षा वेगवेगळ्या केंद्रावर होणार आहे.

ओबीसी शिष्यवृत्ती योजनेला मुदतवाढ:

  • ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणाऱ्या विधेयकानंतर केंद्र सरकारने आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेला मुदतवाढ दिली आहे.
  • मंत्रिमंडळाने याबद्दलचा निर्णय केला. देशांतर्गत शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेला सरकारने 2020 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या केंद्रपुरस्कृत योजनेचा आढावा घेताना 2017-18 ते 2019-20 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. या योजनेसाठी 3085 कोटी रुपये खर्चाचे सरकारचे नियोजन आहे.

‘बीसीसीआय’च्या घटनेत काही बदल होणार:

  • सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) घटनेमधील काही बदलांना मान्यता दिली आहे. तसेच यापूर्वी दिलेल्या आदेशामध्ये बदल करत सर्वोच्च न्यायालयाने सौराष्ट्र, विदर्भ, मुंबई क्रिकेट असोसिएशन, रेल्वे, सेनादल आणि विद्यापीठ यांना पूर्णवेळ सदस्यचा दर्जा दिला आहे.
  • बीसीसीआयने सुचवल्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या ‘एक राज्य, एक मत‘ ही शिफारस रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे ज्या राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त क्रिकेट संघटना आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ या तीन क्रिकेट संघटनांनाही दिलासा मिळाला आहे.
  • एखाद्या राज्यात अनेक सदस्य असतील, तर त्यापैकी एकाला राज्याचे प्रतिनिधी म्हणून नेमावे, तर अन्य सदस्य संलंग्न संघटना म्हणून कार्यरत असतील. 30 दिवसांमध्ये नवे नियम लागू व्हावेत असे आदेश बीसीसीआयला देण्यात आले आहेत. आदेशांचे पालन न केल्यास कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

ट्रायचे अध्यक्ष रामसेवक शर्मा यांना दोन वर्षांची मुदतवाढ:

  • आधार क्रमांक मिळवून त्याद्वारे संबंधित व्यक्तीची सर्व माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंटरनेट हॅकरना सायबरविश्वात खुले आव्हान देणारे तसेच ट्रायचे विद्यमान अध्यक्ष रामसेवक शर्मा यांना केंद्र सरकारने दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. ट्रायच्या वीस वर्षांच्या इतिहासात त्याच्या अध्यक्षाला मुदतवाढ देण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
  • रामसेवक शर्मा हे या पदावरून 9 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार होते. कॅबिनेटच्या नियुक्तीविषयक समितीने आता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत त्यांना मुदतवाढ दिली आहे. ते आता 65व्या वर्षी सेवानिवृत्त होतील.
  • बिहारमधील 1978च्या केडरचे आयएएस अधिकारी असलेले शर्मा ट्रायचे अध्यक्ष बनण्याआधी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते. ते युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे (यूआयडीएआय) पहिले महासंचालक होते. या प्राधिकरणाचे प्रमुख नंदन नीलकेणी आयआयटीमध्ये रामसेवक शर्मा यांचे सहाध्यायी होते.
  • तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान असलेल्या निवडक आयएएस अधिकार्‍यांमध्ये त्यांचा समावेश होतो. 2014च्या लोकसभा निवडणुकीत आधार योजनेवर 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने जोरदार टीका केली होती.
  • परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर आधारसंदर्भात रामसेवक शर्मा यांनी त्यांच्यासमोर जे सादरीकरण केले त्यामुळे मोदींचा आधारला असलेला विरोध मावळला. त्यानंतर आधारची प्रणाली अधिक मजबूत करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला.

दिनविशेष:

  • 10 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बायो डीझेल दिन‘ आहे.
  • सन 1675 मध्ये चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.
  • स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना 10 ऑगस्ट 1810 मध्ये झाली.
  • सन 1821 मध्ये मिसुरी हे अमेरिकेचे 24 वे राज्य बनले.
  • भारतीय राजकारणी फुलन देवी यांचा जन्म 10 ऑगस्ट 1963 मध्ये झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago