10 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
10 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 फेब्रुवरी 2020)
आरक्षण बंधनकारक नाही :
- सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यास राज्ये बांधील नाहीत. तसेच पदोन्नत्यांमध्ये आरक्षण हा मूलभूत हक्क नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
- तर न्या. एल. नागेश्वर राव आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने उत्तराखंडमधील आरक्षणाबाबतच्या एका याचिकेवर नुकताच हा निकाल दिला.
- तसेच ‘आरक्षण लागू करण्याचा कुठलाही आदेश न्यायालय राज्य सरकारांना देऊ शकत नाही,’ असेही सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्टपणे नमूद केले.
- उत्तराखंडमधील सरकारी सेवांमधील सर्व पदे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण न देता भरण्याचा निर्णय राज्य सरकारने 5 सप्टेंबर 2012 रोजी घेतला होता. त्याला उत्तराखंड उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
- ‘निर्धारित कायद्यानुसार सार्वजनिक पदांवरील नियुक्त्यांमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले जाऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे, पदोन्नत्यांच्या बाबतीतही राखीव जागा ठेवण्यास राज्य सरकार बांधील नाही.
- तथापि, राज्य सरकारांना त्यांचा विशेषाधिकार वापरून आरक्षणाची तरतूद करण्याची इच्छा असेल; तर त्या संवर्गाचे सार्वजनिक सेवांमध्ये अपुरे प्रतिनिधित्व असल्याचे परिमाण ठरवता येण्याइतपत आकडेवारी सरकारला जमा करावी लागेल,’ असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
- पदोन्नत्यांमध्ये आरक्षण देण्यास राज्य सरकार बांधील नसल्यामुळे उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयाला बेकायदा ठरवणे गैर असल्याची टिप्पणी करून, उत्तराखंड सरकारची सप्टेंबर 2012ची अधिसूचना सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली.
- राज्य सरकारी सेवेत संबंधित समाजांचे पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याचे निदर्शनास आल्यास राज्य सरकार नियुक्त्या आणि पदोन्नतीमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण देऊ शकते. तसा अधिकार संविधानातील अनुच्छेद 16 (4) आणि 16 (4-ए)नुसार राज्य सरकारांना आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.
Must Read (नक्की वाचा):
टाटा खुली टेनिस स्पर्धात जिरी वेसली एकेरीचा विजेता :
- चेक प्रजासत्ताकचा जिरी वेसली टाटा खुल्या महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा विजेता ठरला. पुरुष दुहेरीचे विजेतेपद इंडोनेशियाचा ख्रिस्तोफर रुंगकट आणि स्वीडनचा आंद्रे गोरान्सन या जोडीने पटकावले.
- पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत वेसलीने बेलारुसच्या इगोर गेरासिमोवला 7-6, 5-7, 6-3 असे नमवले.
- तर पहिला सेट वेसलीने जिंकल्यावर दुसरा सेट गमावला होता. मात्र पुन्हा तिसरा सेट सहज जिंकत वेसलीने बाजी मारली. पुरुष दुहेरीत रुंगकट-गोरान्सन जोडीने अंतिम फेरीत इस्रायलचा जोनाथन एर्लिच आणि बेलारुसचा आंद्रेई वासिलेवस्की जोडीचा 6-2, 3-6, 10-8 असा पराभव केला
पोलीस मॅरेथॉनवर केनियाचे वर्चस्व :
- पदार्पणाच्या महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवर केनियाच्या धावपटूंनी वर्चस्व गाजवले. केनियाच्या स्टीफन किपचिरचिर याने सुरुवातीपासूनच आघाडी घेत पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनचे विजेतेपद पटकावले. महिलांमध्ये शायलिन जेपकोरिर विजेती ठरली.
- तर स्टीफन याने 2 तास, 17 मिनिटे, 39 सेकंद वेळ देत प्रथम क्रमांक पटकावला. केनियाच्या डॉमिनिक कँगोर याने 2 तास, 19 मिनिटे, 35 सेकंद अशी कामगिरी करत दुसरे स्थान प्राप्त केले.
- तसेच इथिओपियाच्या झिके देबेबे याला 2 तास, 21 मिनिटे, 35 सेकंदांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
- महिलांमध्ये शायलिन हिने आपल्याच देशाच्या ग्लॅडिय केम्बॉय हिला 50मीटरच्या अंतराने मागे टाकत 2 तास 41 मिनिटे 58 सेकंद अशा कामगिरीसह विजेतेपदाचा मान मिळवला. केम्बॉयला 2.42.01 सेकंदासह दुसऱ्या तर महाराष्ट्राच्या ज्योती गवतेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
रवी बिश्नोईची जादू, संघाकडून सर्वोत्तम कामगिरीची नोंद :
- भारतीय युवा संघाचा फिरकीपटू रवी बिश्नोईने दक्षिण आफ्रिकेत आपल्या फिरकीच्या जादूने सर्वांना प्रभावित केलं आहे.
- बांगलादेशविरुद्ध अंतिम सामन्यात रवी बिश्नोईने भेदक मारा करत 3 बळी घेतले. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 177 धावांपर्यंत मजल मारली. 178 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाची अतिशय आश्वासक सुरुवात केली.
- मात्र रवी बिश्नोईने आपल्या फिरकीच्या जाळ्यात बांगलादेशी फलंदाजांना अडकवत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. एका क्षणाला वरचढ वाढणारा बांगलादेशचा संघ बिश्नोईच्या प्रभावी माऱ्यामुळे बॅकफूटला ढकलला गेला.
- तसेच बिश्नोईने तंझिद हसन, मोहमदुल हसन जॉय, तौहिद हृदॉय आणि शाहदत हुसैनला माघारी धाडलं.
- रवीने 10 षटकांत 3 षटकं निर्धाव टाकत केवळ 30 धावा देत 4 बळी घेतले. 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
92 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात :
- जगातल्या प्रतिष्ठीत ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्याचं यंदाचं 92 व्या वर्ष आहे.
- अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. हॉलिवुड सुपरस्टार ब्रॅड पिटला पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे.
- तर वन्स अपॉन अ टाईम इन अमेरिका चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी पिटचा गौरव करण्यात आला आहे. बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर विभागात तो पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
- तर या विभागात पिटसोबत टॉम हँक्स, एँथॉनी हॉपकिन्स, जॉय पेस्की आणि एल. पचिनो यांनादेखील नामांकन मिळालं होतं. मात्र पिटनं बाजी मारली.
भारतावर विजय मिळवत बांगलादेशने जिंकला विश्वचषक :
- आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या युवा (19-वर्षांखालील) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेर बांगलादेशनेभारतावर विजय मिळवला.
- यशस्वी जैस्वालच्या 88 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या होत्या.
- तसेच बांगलादेशच्या संघाला या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला, पण अखेर त्यांनीच डकवर्थ-लुईस नियमांनुसार विजय साकारला. बांगलादेशने जिंकलेला हा पहिला युवा विश्वचषक आहे.
- भारताच्या 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली होती. बांगलादेशच्या सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी रचली होती.
- पण रवी बिश्णोईने यावेळी मॅजिक स्पेल टाकला आणि चक्क चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. रवीच्या या स्पेलने सामन्याचे रुप बदलले.
दिनविशेष :
- जे. आर. डी टाटा हे 1929 मध्ये पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले होते.
- 1931 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली होती.
- पुणे विद्यापीठाची स्थापना 1949 मध्ये झाली आहे.
- गांधी-वध अभियोगातून 1949 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली होती.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा