भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात खेळवला जात आहे.
त्याचबरोबर या कसोटी सामन्यात भारत प्रथम गोलंदाजी करत आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने भारतासाठी एक मोठा विक्रम केला आहे.
अश्विनने या मालिकेत पहिली विकेट घेताच एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
ऑस्ट्रेलियातील नागपूर कसोटीत टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने कांगारूंचा यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीला बॉलिंग देत कसोटी क्रिकेटमध्ये 450 बळी पूर्ण केल्या.
अनिल कुंबळेला मागे टाकून तो सर्वात जलद 450 कसोटी बळी घेणारा भारतीय ठरला आहे.
अश्विनने आपल्या 89व्या कसोटीतील 167व्या डावात गोलंदाजी करताना ही कामगिरी केली.
कसोटी क्रिकेटमध्ये 450 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेणारा अश्विन हा अनिल कुंबळेनंतरचा जगातील नववा आणि दुसरा भारतीय गोलंदाज आहे.
मोहम्मद शमीने वॉर्नरला बोल्ड करत रचला इतिहास:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला क्लीन-बोल्ड करून इतिहास रचला.
मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळी पूर्ण केले आहेत.
भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा तो नववा गोलंदाज ठरला आहे.
या विकेटसह शमीही स्पेशल क्लबमध्ये देखील सामील झाला आहे.
मोहम्मद शमी 400 विकेट्स घेतल्यानंतर अनिल कुंबळे, झहीर खान, कपिल देव, हरभजन सिंग यांसारख्या दिग्गज गोलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा जगातील 56 वा गोलंदाज बनला आहे.
चंद्रपॉल- ब्रॅथवेटने नोंदवला सर्वात अनोखा विक्रम:
वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला कसोटी सामना पार पडला. हा सामना अनिर्णीत राहिला.
145 वर्षांच्या कसोटी इतिहासात जे घडले नाही ते या सामन्यात घडले.
बुधवारी पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अनोखा विक्रम रचला गेला.
हा विक्रम क्रेग ब्रॅथवेट आणि तेजनारायण चंद्रपॉल हे पाचव्या दिवशी खेळायला उतरताच निर्माण झाला.
त्या दोघांनी सलग पाच दिवस फलंदाजीसाठी उतरुन नवा विक्रम केला.
दिनविशेष :
जे. आर. डी टाटा हे 1929 मध्ये पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले होते.
1931 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली होती.
पुणे विद्यापीठाची स्थापना 1949 मध्ये झाली आहे.
गांधी-वध अभियोगातून 1949 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली होती.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.