10 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 जानेवारी 2022)
चिनी यानाकडून चंद्रावरील पाण्याचा पुरावा :
- चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी होते, याचा पहिला प्रत्यक्ष पुरावा चीनच्या चँग-5 यानास आढळला आहे.
- तर यातून पृथ्वीचा हा उपग्रह शुष्क कसा बनला, हे समजून घेणे शक्य होणार आहे.
- तसेच चीनचे हे चांद्रयान चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले, तेथील पृष्ठभागावरील मातीमध्ये 120 पीपीएमपेक्षा कमी पाणी आहे.
- तर हे प्रमाण एक टन मातीमध्ये 120 ग्रॅम पाणी इतके आहे. त्याचप्रमाणे तेथील हलक्या सच्छिद्र खडकामध्ये 180 पीपीएमपेक्षा कमी पाणी दिसून आले आहे.
- पृथ्वीच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांच्या तुलनेत चंद्राचा पृष्ठभाग फारच शुष्क आहे.
- चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे अस्तित्व हे दूरवरून निरीक्षणातून निश्चित करण्यात आले असले तरी, या यानाने आता चांद्रभूमीवरील खडक आणि मातीमध्ये पाणी असल्याच्या खुणा शोधून काढल्या आहेत.
- तसेच या यानावरील एका साधनाद्वारे पृष्ठभागावरील माती आणि खडकांची स्पेक्ट्रल रिफ्लेक्टन्स तपासणी करून त्याच वेळी पाण्याचे अस्तित्व शोधून काढले. हे प्रथमच घडले आहे.
‘नीट-पीजी’ प्रवेशप्रक्रिया बुधवारपासून :
- वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया (नीट-पीजी) येत्या 12 जानेवारी सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी केली.
- सन 2021-22 वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले होते.
- तर या प्रवेशात इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांसाठी 27 टक्के, तर आर्थिक दुर्बल गटातील (ईडब्ल्यूएस) उमेदवारांसाठी 10 टक्के आरक्षणही कायम ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते.
भारताकडून पुरस्कारासाठी मयंक अग्रवालला नामांकन :
- न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालला डिसेंबर महिन्यातील आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
- तसेच मयंकशिवाय न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.
- नियमित सलामीवीर रोहित शर्मा, शुबमन गिल आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत मयंकने न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.
- तर या कालावधीत खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांमध्ये त्याने 69.00 च्या सरासरीने 276 धावा केल्या ज्यात 2 अर्धशतक आणि 1 शतकाचा समावेश आहे.
भारतातील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत ‘व्हीएआर’चा वापर :
- भारतात होणाऱ्या महिलांच्या आगामी ‘एएफसी’ आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीपासून चित्रफीत साहाय्यक सामनाधिकारी (व्हीएआर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
- भारतातील फुटबॉल स्पर्धात ‘व्हीएआर’चा वापर होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
- तर यंदा आशियाई चषक स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे रंगणार आहे.
- नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी या दोन मैदानांवर सामनाधिकाऱ्यांना ‘व्हीएआर’ तंत्रज्ञान उपलब्ध असणार आहे.
- आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) सामनाधिकाऱ्यांच्या निर्णयांचा उच्च स्तर राखण्यासाठी प्रयत्नशील असून स्टेडियम आणि संघांच्या सराव केद्रांवर ‘व्हीएआर’ची चाचणी करण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- 10 जानेवारी 1666 मध्ये सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.
- पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास 10 जानेवारी 1730 मध्ये सुरुवात झाली.
- 10 जानेवारी 1806 मध्ये केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
- 10 जानेवारी 1926 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
- भारत व पाकिस्तान यांच्यात 10 जानेवारी 1966 मध्ये ताश्कंद करार झाला.