10 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 जानेवारी 2023)
बागकामामुळे कर्करोगाचा धोका कमी:
एखाद्या छंदात स्वत:ला गुंतवून घेतले आणि त्याचा आनंद घेत राहिला की मानसिक आरोग्य सुधारते.
बागकाम हा छंद जोपासणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यात सुधारणा तर होतेच, पण त्यांना कर्करोगाचा धोका कमी असतो, असे एका संशोधनात दिसून आले.
अमेरिकन कर्करोग सोसायटी आणि ‘बार्सिलोना इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थ’च्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे.
सामुदायिक बागकाम केल्याने अधिक फायबर खाल्ले जाते आणि शारीरिक हालचाली अधिक होतात, असे या संशोधकांनी केलेल्या चाचणीतून प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
त्यामुळे कर्करोग आणि जुनाट आजारांचा धोका कमी होतो आणि मानसिक आरोग्यही सुधारते, असे या संशोधकांचे म्हणणे आहे.
बागकामामुळे तणाव आणि चिंतेची पातळीही लक्षणीयरीत्या कमी होते, असे या संशोधकांनी सांगितले.
‘लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
काश्मिरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ विजेते कवी रेहमान राही यांचे निधन:
काश्मीरचे प्रसिद्ध कवी व काश्मिरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रा. रेहमान राही यांचे सोमवारी येथे निधन झाले.
6 मे 1925 रोजी जन्मलेल्या प्रा. राही यांचे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
इतर भाषांतील काही नामांकित कवींच्या कवितांनाही त्यांनी काश्मिरी भाषेत अनुवादित केले.
2007 मध्ये त्यांना ‘सियाह रूद ज़रीन मंज़’ (इन ब्लॅक ड्रिझल) या काव्यसंग्रहासाठी देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान- ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना 2000 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
प्रा. राही यांना 1961 मध्ये त्यांच्या ‘नवरोज़-ए-सबा’ या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
त्यांनी बाबा फरीद यांच्या रचनांचा काश्मिरी भाषेत अनुवाद केला आहे.
मेरी कोमची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून माघार:
सहा वेळा विश्वविजेती महिला बॉक्सर मेरीकोमने दुखापतीमुळे यंदाच्या बॉक्सिंग महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.
जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकूण आठ पदके जिंकणाऱ्या 40 वर्षीय मेरीने दुखापतीच्या स्वरूपाबाबत स्पष्टीकरण दिले नाही.
आईबीए (IBA) वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा यावर्षी 1 ते 15 मे दरम्यान ताश्कंद, उझबेकिस्तान येथे होणार आहे.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे निवड चाचणीतून माघार घ्यावी लागल्याने मेरी कोमला गेल्या वर्षी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.
पहिल्या सात जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ती एकमेव महिला बॉक्सर आहे.
आठ जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकणारी एकमेव बॉक्सर (पुरुष किंवा महिला) आहे.
दक्षिण कोरियाच्या इंचॉन येथे 2014 च्या आशियाई खेळांमध्ये सुवर्ण जिंकणारी मेरी पहिली भारतीय महिला बॉक्सर आणि 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली.
दिनविशेष :
10 जानेवारी 1666 मध्ये सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.
पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास10 जानेवारी 1730 मध्ये सुरुवात झाली.
10 जानेवारी 1806 मध्ये केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
10 जानेवारी 1926 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
भारत व पाकिस्तान यांच्यात 10 जानेवारी 1966 मध्ये ताश्कंद करार झाला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.