10 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs
10 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 जुलै 2022)
ट्वीटर खरेदी व्यवहारातून इलॉन मस्क यांची माघार :
- टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याचा व्यवहार रद्द करत असल्याचे शुक्रवारी सांगितले.
- ट्विटरने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला.
- ट्विटरकडून बनावट खात्यांची माहिती देण्यात येत नसल्याचे कारण देत मस्क यांनी ट्विटर खरेदीच्या व्यवहारातून माघार घेतली.
- दुसरीकडे ट्विटर हा करार लागू करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याच्या तयारीत आहे.
Must Read (नक्की वाचा):
जगनमोहन रेड्डी वायएसआर काँग्रेसचे आजीवन अध्यक्ष :
- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची शनिवारी युवाजन श्रमिक रायथू काँग्रेसच्या (वायएसआर काँग्रेस) आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
- पक्षाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी पक्षातर्फे ही निवड करण्यात आली.
- जगन यांची आजीवन अध्यक्षपदी निवड व्हावी यासाठी यापूर्वी पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली होती.
- जगनमोहन यांनी 2011 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर ‘वायएसआर काँग्रेस’ची स्थापना केली आणि तेव्हापासून ते पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची आई विजयम्मा या मानद अध्यक्ष आहेत.
- जगन यांची यापूर्वी 2017 मध्ये पक्षाच्या अधिवेशनात पक्षाध्यक्षपदी निवड झाली होती.
ब्रिटिशांनी बंदी घातलेल्या क्रांतिकारकांच्या कविता भारत सरकार करणार प्रकाशित :
- भारतीय स्वातंत्र चळवळीच्या काळात अनेक क्रांतीकारकांनी लिहिलेल्या कविता आणि लेखांवर ब्रिटीशांनी बंदी आणली होती.
- तर या कविता आणि लेख भारत सरकार पुन्हा प्रकाशित करणार आहे.
- स्वातंत्र्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
- अमृत महोत्सवानिमित्ताने भारत सरकारने एक संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर एक वेगळा सेक्शन तयार करण्यात आला आहे.
- तसेच याच सेक्शनमध्ये 1947 पूर्वी क्रांतीकारकांनी लिहिलेल्या कविता आणि लेख प्रकाशित करण्यात येणार आहे.
- तर हे सर्व साहित्य बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, ओडीया, पंजाबी, सिंधी, तामिळ, तेलुगू आणि उर्दू भाषेत प्रकाशित करण्यात येईल.
- यासोबत अनेक कवितांचे व्हिडीओ देखील येथे प्रकाशित करण्यात आले आहे.
भारत-इंग्लंड ट्वेन्टी-20 मालिका :
- रवींद्र जडेजाच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने शनिवारी दुसऱ्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर 49 धावांनी मात केली.
- तर या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे.
- तर या मालिकेतील तिसरा सामना रविवारी खेळवण्यात येईल.
- बर्मिगहॅम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने दिलेल्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 17 षटकांत 121 धावांत गारद झाला.
विम्बल्डन टेनिस स्पर्धात रायबाकिनाला ऐतिहासिक जेतेपद :
- रशियाची माजी खेळाडू आणि आता कझाकस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एलिना रायबाकिनाने ऐतिहासिक अधिराज्य गाजवताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
- शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तिने पिछाडीवरून तिसऱ्या मानांकित टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरला पराभवाचा धक्का देत पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा केला.
- तसेच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी ती कझाकस्तानची पहिली टेनिसपटू ठरली.
- रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विम्बल्डनमध्ये रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती.
- मात्र, 2018पासून रशियन रायबाकिना कझाकस्तानचे प्रतिनिधित्व करत असल्याने तिला यंदाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तिने या संधीचे सोने केले.
- 11 विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी 23 वर्षीय रायबाकिना ही गेल्या 11 वर्षांतील सर्वात युवा महिला टेनिसपटू ठरली आहे.
दिनविशेष :
- सन 1940 मध्ये बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.
- सन 1973 मध्ये पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.
- सन 1978 मध्ये मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली.
- सन 1992 आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.
- तसेच सन 1992 मध्येह संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-2ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.