10 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 जून 2019)
भारत खरेदी करणार NASAMS-II :
- देशाची राजधानी राजधानी सुरक्षित राहावी यासाठी आता भारत अमेरिकेकडून नॅशनल अडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम – II (NASAMS-II) खरेदी करण्याच्या तयारीत आहे.
- भारत याचा उपयोग स्वदेशी, रशियन आणि इस्त्रायली तंत्रज्ञान प्रणाली एकत्रित करून हवाई ढाल बनवण्यासाठी करणार आहे.
- तर दरम्यान, हे क्षेपणास्त्र खरेदी केल्यास दिल्लीवर कोणत्याही क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याचा, तसेच ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपासूनही संरक्षण मिळणार आहे.
- संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका NASAMS-II या क्षेपणास्त्राच्या विक्रीसाठी अंतिम मसुद्याचे स्वीकृती पत्र जुलै ते ऑगस्टदरम्यान पाठवण्याची शक्यता आहे.
- तसेच 6,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च असलेल्या परदेशी सैन्य विक्री कार्यक्रमाअंतर्गत अमेरिका भारताला या क्षेपणास्राची विक्री करणार आहे. तसेच दिल्लीच्या जवळ या क्षेपणास्त्राच्या बॅटरीच्या उभारण्यासाठीही जागांची निवड
करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. - सध्या अमेरिका भारतावर टर्मिनल हाय अल्टीट्यूड एरिया डिफेंस (THAAD) आणि पॅट्रियट अडव्हाँस्ड कॅपेबिलिटी (PAC-3) मिसाइल डिफेंस सिस्टमच्या खरेदीवर विचार करण्यासाठी दबाव टाकत आहे.दिलेल्या माहितीनुसार 5.43
अब्ज डॉलर्सच्या उन्नक एस – 400 टायम्फ या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या पाच स्क्वाड्रन्ससाठी रशियाशी यापूर्वीच व्यवहार करण्यात आला आहे. - तसेच यापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये भारताने रशियाबरोबर एस – 400 चा व्यवहार केला होता. अमेरिका भारतावर प्रतिबंध घालण्याची भीती असतानाही भारताने हा करार केला होता. मेरिकेच्या THAAD ची रशियाच्या एस – 400
शी तुलना करणे योग्य नसल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. - NASAMS हे क्षेपणास्त्र प्रामुख्याने दिल्लीच्या सुरक्षेसाठी खरेदी करण्यात येणार आहे. तर भारत खरेदी करणार असलेले एस – 400 हे क्षेपणास्त्र ऑक्टोबर 2020 ते एप्रिल 2023 या कालावधीदरम्यान भारताला मिळेल.
- एस – 400 सिस्टम 380 किमीपर्यंत असेलेला बॉम्ब, जेट, टेहळणी विमान, क्षेपणास्त्र आणि ड्रोनची माहिती घेण्यास आणि त्यांना नष्ट करण्यास सक्षम आहे.
- NASAMS च्या माध्यमातून दिल्लीची सुरक्षा केली जाणार आहे. या क्षेपणास्त्रावर जमिनीवरून हवेत मारा करणारे स्टिंगर क्षेपणास्त्र, बंदूक प्रणाली AIM-120C-7 AMRAAMs (मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र) वापरण्यात येणार
आहे. थ्री डायमेंशनल सेंटीनल रडाल प्रणालीवर हे आधारित असेल. दरम्यान, या क्षेपणास्त्राची बाहेरील लेअर डीआरडीओद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या स्वदेशी बीएमडी प्रमालीद्वारे तयार करण्यात येणार आहे. या प्रणालीतील उन्नतहवाई संरक्षण (AAD) आणि पृथ्वी वायू संरक्षण (PAD) इंटरसेप्ट क्षेपणास्त्र भविष्यात शत्रूच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी तयार करण्यात आले आहे. याद्वारे 15 ते 20 किमीपासून 80 ते 100 किमीपर्यंतच्या उंचीवरून 2000 किमीपर्यंतचे लक्ष्य भेदता येणे शक्य आहे. - तर दुसरीकडे एस 400 सिस्टमच्या माध्यमातूनही संरक्षण केले जाणार आहे. यामध्ये 120, 200, 250 आणि 380 किमीपर्यंत लक्ष्य भेदणारी क्षेपणास्त्रे असतील. यामध्ये रडार, लॉन्चर्ससारख्या अत्याधुनिक सुविधाही देण्यात येणार आहेत.
- त्यानंतर इस्त्रायल आणि भारताने संयुक्तरित्या विकसित केलेल्या मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली बराक – 8 ला सेवेत सामावून घेतले जाणार आहे.
पाकिस्तानातून भारतात होणाऱ्या आयातीत 92 टक्के घट :
- भारताने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या वस्तूंवर सीमा शुल्क 200 टक्के वाढवल्यानंतर तेथून होणारी आयात 92 टक्के कमी झाली आहे. पाकिस्तानातून होणारी आयात मार्च अखेरीस 2.84 दशलक्ष डॉलर्सची होती.
- तर पुलवामा हल्ल्यानंतर यावर्षी 16 फेब्रुवारीला पाकिस्तानविरोधात भारताने आर्थिक कारवाई केली होती, त्यात पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के सीमा शुल्क लादण्यात आले होते.
- तसेच कापूस, फळे, सिमेंट, पेट्रोलियम पदार्थ, खनिजे पाकिस्तानातून आयात करण्यात येत होती.
- व्यापार मंत्रालयाच्या माहितीनुसार मार्च 2018 अखेरीस 34.61 दशलक्ष डॉलर्सच्या वस्तूंची आयात झाली. मार्चमध्ये 2.84 दशलक्ष डॉलर्सच्या वस्तूंची आयात करण्यात आली असून त्यात 1.19 दशलक्ष डॉलर्सच्या कापसाचा समावेश आहे.
सुखोई विमानांवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रे लावण्यास प्रारंभ :
- बालाकोट हवाई हल्ल्यानंतर सरकारने ब्राह्मोस क्षेपणास्त्रे एकूण 40 सुखोई लढाऊ जेट विमानांवर बसवण्याचा निर्णय घेतला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड व ब्राह्मोस एरोस्पेस लिमिटेड या दोन कंपन्यांना याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. डिसेंबर 2020 पर्यंत सुखोई लढाऊ विमानांवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रे बसवण्यात येतील असे सांगण्यात आले.
- प्रत्यक्षात ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची हवाई आवृत्ती सुखोई विमानांवर बसवण्याचे सरकारने 2016 मध्ये ठरवले होते. प्रत्यक्षात ते काम 2017 च्या अखेरीस सुरूही झाले, पण त्याची गती फार मंद होती त्यामुळे आता हे काम वेगाने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संविधानात ‘इंडिया’ ऐवजी भारत शब्द हवा :
- भारतातील धर्मनिरपेक्षता, संस्कृती आणि इतिहास गौरवशाली आहे. ‘इंडिया’ या नावातून परकेपणा जाणवतो, तर ‘भारत’मधून राष्ट्रीय एकात्मतेची झलक पहायला मिळते. त्यामुळे भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करून ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरला जावा, असा ठराव स्वदेशी जागरण मंचाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. याबाबतची माहिती मंचाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अश्विनी महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- नियोजन आयोगाने एकाच प्रकारची योजना संपूर्ण देशात राबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे योजना आयोग बदलून नीती आयोग स्थापन करण्याचा निर्णय योग्यच होता. मात्र, नीती आयोगाच्या कार्यपद्धतीवर पुनर्विचार करण्याची गरज आहे.
- लक्ष वेधले. एअर इंडिया, बीएसएनएलसह सार्वजनिक क्षेत्रातील 92 कंपन्यांमध्ये निर्गुंंतवणुकीच्या नीती आयोगाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करावा, अशी मागणीही मंचाने केली.
दिनविशेष :
- 10 जून : महाराष्ट्र राज्य दृष्टीदिन.
- अॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी 10 जून 1935 रोजी अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस या संस्थेची स्थापना केली.
- दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर 10 जून 1940 रोजी शरणागती पत्करली.
- दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध 10 जून 1940 रोजी युद्ध पुकारले.
- 10 जून 1982 पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा