10 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
10 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 मे 2020)
अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे :
कोरोनाविरुद्ध सुरू असलेला लढा मजबूत करण्यासाठी काही सनदी अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती महापालिकेत करण्यात आली आहे.
त्यानंतर आता अतिरिक्त आयुक्तपदी अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी शनिवारी सकाळी आपला पदभार स्वीकारला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
भारतीय सनदी सेवेतील 1995 च्या तुकडीतील अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती पालिका मुख्यालयातील कोरोना वॉर रूममध्ये गेल्या महिन्यात करण्यात आली. कोरोनाशी संबंधित नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.
मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात सनदी अधिकायांच्या पथकात भिडे यांचा समावेश करण्यात आला आहे. घाटकोपर, भांडुप, मुलुंड येथील रुग्ण संख्यावाढीचे प्रमाण कमी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
तर अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल हे भारतीय सनदी सेवेतील 1996 च्या तुकडीचे अधिकारी असून त्यांनीही आतापर्यंत महत्त्वपूर्ण अशा विविध पदांवरचे काम पाहिले आहे.
आयसीआयसीआय बँकेचं मुख्यालय गुजरातमधून महाराष्ट्रात हलवण्यात येणार :
आयसीआयसीआय बँकेचं मुख्यालय गुजरातमधून महाराष्ट्रात हलवण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आयसीआयसीआय बँकेने मुंबई शेअर बाजाराला व राष्ट्रीय शेअर बाजाराला हे कळवलं आहे. बँकेचे भागधारक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात असल्याने, कार्यक्षमतेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे व्यवस्थापनानं म्हटलं आहे.
आयसीआयसीआय बँकेने या संदर्भातला जो प्रस्ताव RBI कडे पाठवला होता त्या प्रस्तावाला आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ना हरकत प्रमाणपत्र अर्थात NOC दिलं आहे.
तर बँकेचं मुख्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी ज्या औपचारिकता आणि निर्देशांचं पालन करावं लागतं ते केलं जावं असं RBI ने स्पष्ट केलं आहे.
लॉकडाउनदरम्यान तीन राज्यांनी केला श्रम कायद्यात बदल :
करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्यातच उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे अर्थचक्रही पूर्णपणे थांबलं आहे. अशा परिस्थितीत काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरूवात केली आहे.परंतु यानंतर काही राज्यांनी आपल्या कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकांच्या नोकऱ्याही कायम राहाव्या आणि गुंतवणुकदारही आकर्षित व्हावे, यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात सरकारनं आपल्या श्रम कायद्यात बदल केला आहे.
तसेच यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना मिळण्याची शक्यता या राज्यांच्या सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे.
श्रम कायद्यांमध्ये बदल करण्याच्या या निर्णयाला ट्रेड युनियननं विरोध केला आहे. कायद्यात बदल केल्यामुळे कामगारांचं शोषण होऊ शकते अशी भीती ट्रेड युनियनकडून व्यक्त करण्यात आली आहे.
कामगार कायद्यात सर्वात महत्त्वाचा करण्यात आलेला बदल म्हणजे कामाचे तास 8 तासांवरून वाढवून 12 तास करण्यात आले आहेत.
भारताचा शेष विश्व संघावर विजय:
भारताला नेशन्स चषक सांघिक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत शुक्रवारी आठव्या फेरीत युरोपविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. मात्र तत्पूवी, भारताने या स्पर्धेतील पहिला विजय शेष विश्ववर मिळवला.
युरोपविरुद्धच्या लढतीत भारताकडून विदित गुजरातीने युरोपच्या लेवॉन अरोनियानला नमवत पहिल्या विजयाची नोंद केली.
मात्र भारताच्या पी. हरिकृष्णला जॅन-क्रिस्टोर्फ डय़ूडाने नमवत युरोपला बरोबरी साधून दिली.
माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंद आणि मॅक्सिम वॅचियर-लॅग्रेव्ह यांच्यातील डाव 60 चालींमध्ये बरोबरीत संपला. महिलांच्या लढतीत जागतिक जलद स्पर्धेतील विजेत्या कोनेरू हम्पीनेही अॅना मुझिचूकविरुद्ध बरोबरी साधली.
तर या निकालांमुळे भारत आणि युरोप यांच्यातील लढत बरोबरीत संपली.
दिनविशेष :
लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी 10 मे 1824 मध्ये खुली करण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857च्यास्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव10 मे 1907 रोजीलंडनमधे साजरा केला.
रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म10 मे 1918 रोजी झाला होता.
10 मे 1993 रोजी संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.