10 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
10 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 ऑक्टोबर 2022)
गुजरातचे मोधेरा देशातील पहिले ‘सौरऊर्जा ग्राम’ :
- मेहसाणा जिल्ह्यातील मोधेरा हे देशातील पहिले 100 टक्के सौरऊर्जा वापरणारे गाव ठरले आहे.
- येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली.
- सूर्यमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले हे गाव आता ‘सौरऊर्जा ग्राम’ म्हणून ओळखले जाईल, असे ते म्हणाले.
- मोधेरामध्ये पुष्पावती नदीच्या काठावर 10व्या शतकात बांधलेले सूर्यमंदिर आहे.
- तिथेच आता मोकळय़ा जमिनीवरील सौरऊर्जा प्रकल्प तसेच 1,300 छपरांवर सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात आल्या आहेत.
- त्यातून ‘बॅटरी एनर्जी स्टोअरेज सिस्टीम’मध्ये वीज साठवली जाते आणि नंतर तिचे गावात वितरण होते.
Must Read (नक्की वाचा):
पंकज अडवाणीने बिलियर्ड्समध्ये रचला इतिहास :
- भारताचा अव्वल स्नूकरपटू पंकज अडवाणीने शनिवारी मलेशिया येथे पार पडलेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये बिलियर्ड्सच्या अंतिम फेरीत देशबांधव सौरव कोठारीचा 4-0 असा पराभव करून कारकिर्दीतील 25वा जागतिक करंडक जिंकला.
- अडवाणीने चमकदार खेळ केला आणि कोठारीला संधी देणार नसल्याचे पहिल्याच फ्रेमपासून आपले इरादे स्पष्ट केले.
- या 150 पेक्षा जास्त प्रकारामध्ये अडवाणीने 149 च्या ब्रेकसह पहिली फ्रेम घेतली.
- सौरवला त्याच्या पहिल्या आयबीएसएफ (आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर महासंघ) जागतिक किताबाची प्रतीक्षा आहे.
- या बेस्ट ऑफ सेव्हन अंतिम सामन्यामध्ये, अडवाणीने सुरुवातीपासूनच आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले आणि एका कॅलेंडर वर्षात पाचव्यांदा बिलियर्ड्स राष्ट्रीय, आशियाई आणि जागतिक ट्रॉफी जिंकण्याचा अनोखा विक्रम प्रस्थापित केला.
- कोठारीला दुसऱ्या फ्रेममध्ये काही संधी मिळाल्या, पण त्याचा फायदा त्याला उठवता आला नाही.
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 7 गड्यांनी विजय:
- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रांची येथे झाला.
- मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 9 धावांनी पराभव केला होता.
- त्या पराभवाचा बदला घेत भारताने दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर तब्बल सात गडी राखून विजय मिळवला.
- आजच्या विजयाने भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
दिनविशेष:
- 10 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन‘ तसेच ‘जागतिक लापशी दिन‘ आहे.
- सन 1846 मध्ये इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.
- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1899 मध्ये झाला.
- श्यामची आई चित्रपटाला 1954 या साली राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.
- सन 1998 मध्ये ‘आदर्श सेन आनंद‘ भारताचे 29वे सरन्यायाधीश बनले होते.