10 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
10 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 सप्टेंबर 2020)
राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात समावेश केला जाणार:
- अंबाला हवाई तळावर गुरुवारी राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात औपचारिकरीत्या समावेश केला जाणार आहे.
- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, त्यांचे फ्रान्समधील समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली, संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया व संरक्षण सचिव अजय कुमार यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमात उपस्थित राहतील.
- ‘राफेल’च्या समावेशाबरोबरच, पारंपरिक सर्वधर्म पूजा, राफेल आणि तेजस विमानांसह ‘सारंग हवाई कसरत चमूचे’ हवाई प्रदर्शन यांचा कार्यक्रमात समावेश असेल.
- हा कार्यक्रम हवाई दलाच्या इतिहासातील ‘अतिशय महत्त्वाचा मैलाचा दगड’ ठरेल, असे हवाई दलाचा प्रवक्ता म्हणाला.
- फ्रान्सच्या ‘दसॉल्त अॅव्हिएशन’ कंपनीने तयार केलेली राफेल लढाऊ विमाने त्यांचे आकाशातील प्रभुत्व आणि अचूक हल्ले यांसाठी प्रसिद्ध आहेत.
- राफेल विमानांचा हवाई दलाच्या 17व्या स्क्वाड्रनमध्ये समारंभपूर्वक समावेश होण्यापूर्वी राफेलच्या ताफ्याला पाण्याच्या तोफांची (वॉटर कॅनन) पारंपरिक सलामी दिली जाईल, असे वायुदलाचे प्रवक्ते विंग कमांडर इंद्रनील नंदी यांनी सांगितले.
- 59 हजार कोटी रुपये किमतीची 36 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी भारताने फ्रान्सशी आंतर-सरकार करार केल्यानंतर सुमारे 4 वर्षांनी पाच राफेल विमानांची पहिली तुकडी 29 जुलैला भारतात पोहोचली होती.
Must Read (नक्की वाचा):
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळालं:
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळालं आहे.
- 2021 च्या पुरस्कारांसाठी हे नामांकन मिळालं आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील शांतता करारासाठी मध्यस्थी करुन दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यासाठीच हे नामांकन देण्यात आलं आहे.
- नर्वोच्या संसदेतील सदस्य ख्रिश्चन टायब्रिंग-गजेडे यांनी ट्रम्प यांना नामांकित केलं आहे.
- ख्रिश्चन हे नॉर्वेच्या संसदेमध्ये चौथ्यांदा निवडूण आलेले खासदार आहेत.
- त्याचप्रमाणे ते ‘नाटो’साठी काम करणाऱ्या नॉर्वेच्या संसदीय समितीचे अध्यक्षही आहेत.
- युएई आणि इस्रायलमधील संबंध सुधारण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं ख्रिश्चन यांनी नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाचे समर्थन करताना सांगितले.
फोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली:
- फोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली आहे.
- या यादीत सात भारतीय अमेरिकन नागरिकांना स्थान देण्यात आलं आहे.
- या यादीत सायबर सिक्युरिटी फर्म झेडस्केलरचे जय चौधरी हे 61 व्या स्थानावर आहेत.
- तर सिम्फनी टेक्नॉलॉजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रमेश वाधवानी हे 3.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 238 व्या स्थानावर आहेत.
- ऑनलाइन विक्री करणारी कंपनी वेयफेअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज शाह यांना फोर्ब्सच्या यादीत 299 वं स्थान देण्यात आलं आहे.
- त्यांच्याकडे 2.8 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर सिलिकॉन व्हॅली व्हेंचर कॅपिटल फर्म खोसला व्हेंचर्सचे संस्थापक विनोद खोसला हे 2.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 353 व्या स्थानावर आहेत.
- शेरपालो व्हेंचर्सचे मॅनिजिंग पार्टनर कवितर्क राम श्रीराम यांना या यादीत 359 वं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे 2.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
- तर राकेश गंगवा यांना या यादीत 359 वं स्थान देण्यात आलं असून त्यांच्याकडे 2.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला:
- विश्वातील अव्वल फुटबॉलपटूंपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
- आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील गोलशतक साकारणाऱ्या रोनाल्डोने नोंदवलेल्या दोन गोलांच्या बळावर पोर्तुगालने नेशन्स लीग फुटबॉलच्या ‘क’ गटातील सामन्यात स्वीडनवर 2-0 असा विजय मिळवला.
- 35वर्षीय रोनाल्डो अशी कामगिरी करणारा फक्त दुसरा खेळाडू ठरला आहे.
- आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकीर्दीत 100 गोल झळकावण्याचे माझे स्वप्न साकार झाले आहे. परंतु एवढय़ावरच मी थांबणार नाही. भविष्यातही खेळाचा अधिकाधिक आनंद लुटून आणखी विक्रम रचण्याचा प्रयत्न करेन.
दिनविशेष :
- 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे.
- कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के.एस. रणजितसिंह यांचा जन्म 10 सप्टेंबर 1872 मध्ये झाला. तसेच यांच्या स्मरणार्थ 1934 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात.
- स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म 10 सप्टेंबर 1887 मध्ये झाला.
- सन 1966 मध्ये पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
- सन 2002 मध्ये परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.