दहावीचा शेवटचा पेपर 31 मार्च नंतर होणार; विद्यार्थी नाराज पण पर्याय नाही

10th paper postponed due to corona virus
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : येत्या सोमवारी म्हणजेच 23 मार्च रोजी दहावीचा शेवटचा पेपर होता परंतु कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उर्वरित एक पेपर लांबणीवर टाकावा लागला. दहावीच्या शेवटचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. या अगोदरच पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द तर नववी व अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

कोरोन व्हायरसची लागण झालेल्या महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याकारणाने, खबरदारी म्हणून दहावीचा शेवटचा पेपर तातडीने पुढे ढकलण्यात आला आहे. 31 मार्च नंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील तारीख जाहीर करण्यात येईल असे वर्षा गायकवाड यांनी आज सांगितले आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच जाहीर केलेले तीन प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे –

  • दहावीचा शेवटचा पेपर 31 मार्चनंतर होईल
  • पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आल्या
  • नववी आणि अकरावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर होईल
  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.