11 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

सीएच-47 एफ (आय) चिनूक लष्करी हेलिकॉप्टरचा पुरवठा बोईंग कंपनीकडून करण्यात आला
सीएच-47 एफ (आय) चिनूक लष्करी हेलिकॉप्टरचा पुरवठा बोईंग कंपनीकडून करण्यात आला

11 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 जुलै 2020)

सीएच-47 एफ (आय) चिनूक लष्करी हेलिकॉप्टरचा पुरवठा बोईंग कंपनीकडून करण्यात आला:

  • भारतीय हवाई दलाने मागणी नोंदवलेल्या सर्व नव्या एएच-64 ई अपाचे आणि सीएच-47७ एफ (आय) चिनूक लष्करी हेलिकॉप्टरचा पुरवठा बोईंग कंपनीकडून करण्यात आला आहे.
  • 22 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरपैकी अखेरच्या टप्प्यातील पाच हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाला हिंडान हवाई तळावर सुपूर्द करण्यात आली.
  • याआधी मार्चमध्ये बोईंगने एकूण 15 सीएच-47 एफ (आय) चिनूक भारीवहन हेलिकॉप्टरपैकी शेवटची पाच भारतीय हवाई दलाच्या ताब्यात दिली होती.
  • अपाचे’चे सर्वात आधुनिक रूप असलेली एएच-64 ई हेलिकॉप्टर भारताला मिळाली आहेत.
  • जगातील 20 देशांच्या संरक्षण दलांनी आपल्या ताफ्यात चिनूकचा समावेश केला आहे, किंवा त्याच्या खरेदीचे करार केले आहेत.
  • गेल्या 50 वर्षांपासून भारी वहन श्रेणीतील हे एक अत्यंत विश्वसनीय हेलिकॉप्टर मानले जाते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 जुलै 2020)

महाराष्ट्रात करोना रुग्णांची आत्तापर्यंतची संख्या 2 लाख 38 हजार 461 झाली आहे:

  • महाराष्ट्रात 7 हजार 862 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील चोवीस तासात 226 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 5 हजार 366 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • सध्याच्या घडीला करोना रुग्णांची आत्तापर्यंतची संख्या 2 लाख 38 हजार 461 झाली आहे. यापैकी 1 लाख 32 हजार 625 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
  • आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन 9 हजार 893 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.

मोहम्मद मुश्ताक अहमद यांचा राजीनामा:

  • राष्ट्रीय क्रीडा धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन के ल्याप्रकरणी क्रीडा मंत्रालयाने राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर मोहम्मद मुश्ताक अहमद हे हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदावरून वैयक्तिक बांधिलकीचे कारण देत पायउतार झाले आहेत.
  • हॉकी इंडियाचे कार्यकारी सदस्य तसेच महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहणारे मणिपूरचे ज्ञानेंद्रो निगोमबाम यांची अहमद यांच्या जागी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

दिनविशेष :

  • 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो.
  • प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचा जन्म 11 जुलै 1891 मध्ये झाला.
  • सन 1893 मध्ये कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.
  • 11 जुलै सन 1950 मध्ये पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.
  • केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म 11 जुलै 1953 मध्ये झाला.
  • चिलितील तांब्याच्या खाणींचे सन 1971 मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 जुलै 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.