11 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
11 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 डिसेंबर 2022)
निर्बंध असतानाही मानवी दृष्टिकोनातून मदत करण्याच्या ठरावावर भारत तटस्थ :
- निर्बंधात्मक कारवाईतून मानवतावादी दृष्टिकोनातून केलेली आर्थिक आणि साधनात्मक मदत वगळण्यात यावी, या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील ठरावावर भारत तटस्थ राहिला.
- अशा प्रकारच्या अपवादांचा गैरवापर करून आपल्या शेजारी देशांत (पाकिस्तान) दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधीची मदत झाल्याची भूमिका भारताने या वेळी मांडली.
- 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे.
- अमेरिका आणि आर्यलड यांनी मांडलेल्या या ठरावात म्हटले आहे की, (एखाद्या देशाविरुद्ध) निर्बंध लादताना त्यात मानवतवादी दृष्टिकोनातून केलेल्या मदतीचा अपवाद करण्यात यावा.
- हा ठराव मान्य झाल्यास मदतीअभावी होणारे अनेक मृत्यू थांबविता येतील, असा दावा अमेरिकेने केला आहे.
- या ठरावाला भारताचा अपवाद वगळता अन्य सर्व 14 सदस्य देशांनी पाठिंबा दिला.
- या ठरावात म्हटले आहे की, मानवतावादी दृष्टिकोनातून वेळीच मदत व्हावी यासाठी आर्थिक निधी पुरविणे, अन्य आर्थिक मदत, आर्थिक स्रोत पुरविणे, वस्तू आणि सेवा स्वरूपात मदत देणे या बाबींना परवानगी असावी.
- अशी मदत ही सुरक्षा परिषद किंवा तिच्या निर्बंध समितीने जारी केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन मानले जाणार नाही.
Must Read (नक्की वाचा):
हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदर सिंग सुखू :
- हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचलचे नवे मुख्यमंत्री होतील, असे पक्षातर्फे शनिवारी घोषित करण्यात आले.
- पक्षश्रेष्ठींनी हमीरपूर जिल्ह्यातील नादौन येथून निवडले गेलेले 58 वर्षीय आमदार सुखू यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केले आहे.
- उपमुख्यमंत्रीपदासाठी मुकेश अग्निहोत्री यांची निवड झाली असून ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
- दरम्यान, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी रविवारी होणार असल्याचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी जाहीर केले.
- हिमाचल प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष सुखू हे चार वेळा आमदारपदी निवडून गेले आहेत.
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा भूपेंद्र पटेल :
- नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सत्ता कायम राखणाऱ्या भाजपच्या विधिमंडळ पक्षाने शनिवारी विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची नेता म्हणून निवड केली.
- त्यामुळे पटेल सलग दुसऱ्यांदा राज्याची धुरा सांभाळणार आहेत.
- विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पटेल यांनी राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतली व सरकार स्थापनेचा दावा केला.
- 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत 156 जागांवर भाजपचा विजय झाला आहे.
- 12 डिसेंबर रोजी गांधीनगर येथील नवीन सचिवालयाजवळील हेलिपॅड मैदानावर पटेल राज्याचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
इशान किशन आणि विराट कोहलीने रचला नवा इतिहास :
- बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे.
- बांगलादेशविरुद्ध इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वात मोठी भागीदारी केली आहे.
- 8 वर्षांपूर्वी अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्यात 213 धावांच्या भागीदारीचा विक्रम होता पण या दोन्ही फलंदाजांनी हा विक्रम उद्ध्वस्त केला आहे.
- बांगलादेशविरुद्ध भारताकडून कोणत्याही विकेटसाठी इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वाधिक धावांची भागीदारी केली आहे.
- #IshanKishan आणि #ViratKohli मधील भागीदारी भारतासाठी तिसरी सर्वोच्च आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सातव्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी आहे.
- इशान किशन आणि विराट कोहली यांनी 213 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे.
द्विशतकाने इशान किशनने काढले अनेक विक्रम मोडीत :
- भारत आणि बांगलादेश या संघात एकदिवसीय मालिकेचा तिसरा सामना चट्टोग्राम येथे खेळला आहे.
- बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनने अनेक इतिहास रचले.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो चौथा भारतीय ठरला आहे.
- इशान किशनने केवळ 126 चेंडूत 200 धावा पूर्ण केल्या.
- भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये इशान किशनच्या आधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी द्विशतके झळकावली आहेत.
- मात्र, इशानने केवळ 125 चेंडूत द्विशतक झळकावले.
नेयमारची पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी:
- गतउपविजेत्या क्रोएशियाकडून पेनल्टी शूटउटमध्ये पराभव पत्करावा लागल्याने ब्राझीलचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
- ब्राझीलचा तारांकित आघाडीपटू नेयमारने या सामन्यादरम्यान ब्राझीलकडून सर्वाधिक गोल करण्याच्या पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
- नियमित वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर अतिरिक्त वेळेत नेयमारने गोल करत ब्राझीलला आघाडी मिळवून दिली होती.
- ब्राझीलसाठी नेयमारचा हा 77वा गोल ठरला.
- त्यामुळे त्याने दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
दिनविशेष:
- सी.व्ही. रमण यांना सन 1930 मध्ये नोबेल पारितोषिक जाहीर झाला.
- भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी झाला.
- सन 1946 या वर्षी युनिसेफ (UNICEF) ची स्थापना झाली.
- भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म 11 डिसेंबर 1969 मध्ये झाला.
- 2001 या साली चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मध्ये प्रवेश झाला.
- सन 2006 मध्ये अंतराळवीर सुनिता विल्यम आय.एस.एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली होती.