11 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

एसएसएलव्ही डी2
एसएसएलव्ही डी2

11 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 फेब्रुवारी 2023)

इस्रोच्या ‘एसएसएलव्ही डी2’ अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण:

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी एसएसएलव्ही (लघु उपग्रह प्रक्षेपण यान) डी2 अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
  • त्यासह ईओएस-07 या पृथ्वीचे निरीक्षण करणाऱ्यासह एकूण तीन उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
  • अंतरिसकडून न्यूस्पेस इंडिया लिमिटेडचा जानुस-1 हा उपग्रह आणि स्पेस किड्स इंडियाच्या आझादीसॅट हे दोन उपग्रहदेखील त्यांच्या प्रस्तावित कक्षेत यशस्वीरीत्या सोडण्यात आले.
  • यापैकी आझादीसॅट हा विशेष महत्त्वाचा उपग्रह आहे. त्याची निर्मिती देशभरातील विद्यार्थिनींनी केली आहे.
  • हे तिन्ही उपग्रह वर्तुळाकार कक्षेत भ्रमण करतील. यामुळे इस्रोने आता लहान उपग्रहांचे प्रक्षेपण करणाऱ्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे.
  • लघु उपग्रह प्रक्षेपण यान अग्निबाण 10 ते 500 किलो वजनाचे लहान, सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म उपग्रह 500 किमी कक्षेमध्ये सोडू शकतो.
  • पृथ्वीपासून जवळच्या कक्षांमध्ये मागणीप्रमाणे प्रक्षेपण करण्याची त्याची क्षमता आहे.
  • हे अग्निबाण एकाच वेळी एकापेक्षा जास्त उपग्रहांचे प्रक्षेपण करू शकतात त्यामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत अवकाशाचा अभ्यास शक्य होतो.
  • तसेच त्याच्या प्रक्षेपणासाठी तुलनेने कमी पायाभूत सुविधा आवश्यक असतात.
  • आझादीसॅट-2वजन – 8.2 किलो. चेन्नईमधील स्पेस किड्स इंडियाद्वारे देशभरातील 750 विद्यार्थिनींच्या एकत्रित प्रयत्नातून निर्मिती.
  • ईओएस-07वजन – 156.3 किलो. इस्रोद्वारे रचना, विकास आणि अंमलबजावणी.
  • जानुस-1वजन – 10.2 किलो. अमेरिकेतील अंतरिसद्वारे बांधणी.

जम्मू-काश्मीरमध्ये 5.9 दशलक्ष लिथियम साठय़ांचा शोध:

  • विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या ‘बॅटरी’तील महत्त्वाचा घटक असलेल्या ‘लिथियम’ साठय़ाचा शोध जम्मू-काश्मीरमध्ये लागला आहे.
  • 5.9 दशलक्ष टन लिथियम साठा सापडल्याचे सरकारने जाहीर केले आहे.
  • लिथियमसाठी भारत प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया आणि अर्जेटिनावर अवलंबून आहे.
  • भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाला जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सालाल-हैमाना भागात लिथियमचे साठे सापडल्याचे केंद्रीय खणीकर्म मंत्रालयाने जाहीर केले.
  • कर्नाटकात 2021 मध्ये या खनिजाचे अनेक छोटे साठे आढळले होते.
  • ‘रिचार्जेबल ‘बॅटरी’त ‘लिथियम’ हा महत्त्वाचा घटक असतो.
  • स्मार्टफोन, लॅपटॉप सारखी अनेक उपकरणे तसेच विजेवरील मोटारींसाठी या ‘बॅटरी’ वापरल्या जातात.

दोन मुख्य न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती:

  • उच्च न्यायालयाच्या दोन मुख्य न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी बढती देण्यात आली.
  • त्यामुळे आतार सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या सर्व 34 जागा भरल्या आहेत.
  • अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल, गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरविंद कुमार यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे.
  • येत्या दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते शपथ घेण्याची शक्यता आहे.
  • गेल्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तीची नियुक्ती करण्यात आली होती.

सूर्यापासून एक भाग वेगळा :

  • नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने हे निरीक्षण नोंदवलं आहे की सूर्यापासून त्याच एक भलामोठा भाग वेगळा झाला आहे.
  • आता हा भाग सूर्याभोवती फिरतो आहे.
  • हा भाग वेगळा झाल्याने सूर्याला एक मोठी भेग पडली आहे असं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
  • या अवलोकनाबाबत वैज्ञानिक जगतात काहीसं कुतूहल निर्माण झालं आहे.
  • तमिथा स्कोव नावाच्या हवामान विषयक संशोधकांनी ही बाब सोशल मीडियावर ट्विट केलं आहे.

बारामतीच्या रोहित शिंदे याची इंडिया,एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद:

  • चालत्या मोटारसायकलवर चार मिनीट आणि वीस सेकंदांमध्ये दहा सूर्यनमस्कार बारामतीच्या रोहित शिंदे या युवकाने घातले आहेत.
  • त्याच्या या कामगिरीची नोंद इंडिया बुक रेकाॅर्ड आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
  • मोटारसायकलवर दहा वेळा सूर्यनमस्कार घालणारा तो जगातील पहिला मोटारसायकलस्वार ठरला आहे.
  • वयाच्या 16 व्या वर्षापासून मोटारसायकल रेस करणाऱ्या रोहितने रथसप्तमी म्हणजेच जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून 28 जानेवारी रोजी चालत्या मोटारसायकलवर दहा सूर्यनमस्कार घालण्याची कामगिरी केली.

लायन-टेलरच्या विशेष क्लबमध्ये सामील होत रचला नवा इतिहास:

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळवला जात आहे.
  • ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर टॉड मर्फी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वप्नवत पदार्पण केले आहे.
  • त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात अप्रतिम गोलंदाजी करत 5 बळी घेतले.
  • त्याचबरोबर त्याने एक विक्रम केला.
  • टॉड मर्फी हा पदार्पणाच्या सामन्यात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा गोलंदाज ठरला.
  • तो पीटर टेलर, जेसन क्रेझा आणि नॅथन लायनच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला.

रोहित‘हा’ कारनामा करणारा जगातील चौथा खेळाडू ठरला:

  • भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरातील पहिल्या कसोटीत शतक झळकावून इतिहास रचला आहे.
  • तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
  • रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील हे 9वे आणि घरच्या मैदानावरील 8वे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले शतक आहे.
  • रोहित शर्माने कर्णधार म्हणून न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये शतके झळकावली आहेत, तर टी-20 मध्ये त्याने श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दोनदा हा पराक्रम केला आहे.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे.
  • त्याच्या आधी हा पराक्रम श्रीलंकेचे माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान, फाफ डुप्लेसिस आणि बाबर आझम यांनी केला आहे.

दिनविशेष:

  • लंडन विद्यापीठाची स्थापना 11 फेब्रुवारी 1826 मध्ये झाली.
  • सन 1830 मध्ये मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
  • पोप पायस (11वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झालेल्या लॅटेरान ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर सन 1929 मध्ये राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले.
  • पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सन 1979 मध्ये अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.