11 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 जानेवारी 2023)
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ:
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
- त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 34 वरून 38 टक्के झाला आहे.
- वित्त विभागाने याबाबतचा आदेश प्रसृत केला आहे.
- त्यानुसार 1 जुलै 2022 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन रचनेच्या मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 34 टक्क्यांवरून 38 टक्के करण्यात आला आहे.
- महागाई भत्त्यातील वाढ 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीतील थकबाकीसह यंदाच्या जानेवारी महिन्यातील वेतनाबरोबर रोखीने देण्याचे आदेश वित्त विभागाने जारी केले आहेत.
कोव्होव्हॅक्सबाबत आज निर्णय:
- सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या करोनावरील कोव्होव्हॅक्स या लशीला विभिन्न वर्धक मात्रा म्हणून परवानगी देण्याबाबत केंद्रीय औधष नियामक प्राधिकरणाची (सीडीआरए) तज्ज्ञ समिती बुधवारी निर्णय घेण्याची शक्यता आहे.
- ज्या प्रौढांनी कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लशीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, त्यांना विभिन्न वर्धक मात्रा म्हणून कोव्होव्हॅक्सची मात्रा देणे प्रस्तावित आहे.
- केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) विषय तज्ज्ञ समितीची ही बैठक आज जानेवारीला होणार आहे.
- सध्या या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी काही अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.
- प्रौढ, 12 ते 17 वर्षे आणि 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुले यांच्यासाठी ही परवानगी दिलेली आहे.
रोहित शर्माने मोडला हाशिम आमलाचा मोठा विक्रम:
- हिटमॅनने बाद होण्यापूर्वी 11 चौकार आणि 3 षटकार मारले.
- या खेळीच्या जोरावर रोहितने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
- रोहितने दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर फलंदाज हाशिम आमलाचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
- सलामीवीर फलंदाज म्हणून 150 डावांमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा हा विक्रम आहे.
- अमलाने एकदिवसीय सामन्यांच्या पहिल्या 150 डावांमध्ये 60 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
- रोहितने श्रीलंकेविरुद्ध अर्धशतर झळकावत हा विक्रम मोडला.
- सलामीवीर म्हणून त्याने 50 प्लस 61 वेळा धावा केल्या आहेत.
- सचिन तेंडुलकर आणि शिखर धवन यांनी 53 वेळा अशी कामगिरी केली आहे.
- रोहित शर्माने या सामन्यात वनडे फॉरमॅटमध्ये 9500 धावांचाही टप्पा पूर्ण केल्या.
- त्याने 236व्या एकदिवसीय सामन्यात हा आकडा पार केला आहे.
- तो आता भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सहावा फलंदाज ठरला आहे.
- केवळ एमएस धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हिटमॅनच्या पुढे आहेत.
भारत ऑस्ट्रेलियाला मागे टाकत बनला जगातील पहिलाच संघ:
- भारत आणि श्रीलंका संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे.
- भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला 374 धावांचे लक्ष्य दिले.
- या बरोबरच भारताने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक विश्वविक्रम रचला आहे.
- टीम इंडियाने विक्रमी 9व्यांदा श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 हून अधिक धावा केल्या.
- भारताने या विक्रमाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे.
- ऑस्ट्रेलियाला हा कारनामा भारताविरुद्ध केला आहे.
दिनविशेष:
- ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.स. खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 मध्ये झाला होता.
- गुलजारीलाल नंदा यांनी सन 1966 मध्ये भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
- सन 1972 मध्ये पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
- क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म 11 जानेवारी 1973 मध्ये झाला.
- बुद्धिबळाच्या खेळात सन 1980 मध्ये नायजेल शॉर्ट वयाच्या 14व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
- कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून सन 1999 मध्ये जारी झाला होता.
- सन 2001 मध्ये एस.पी. भरुचा यांनी भारताचे 30वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.