महाराष्ट्रात करोना रुग्णांची आत्तापर्यंतची संख्या 2 लाख 38 हजार 461 झाली आहे:
महाराष्ट्रात 7 हजार 862 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील चोवीस तासात 226 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 5 हजार 366 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
सध्याच्या घडीला करोना रुग्णांची आत्तापर्यंतची संख्या 2 लाख 38 हजार 461 झाली आहे. यापैकी 1 लाख 32 हजार 625 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन 9 हजार 893 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.
मोहम्मद मुश्ताक अहमद यांचा राजीनामा:
राष्ट्रीय क्रीडा धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन के ल्याप्रकरणी क्रीडा मंत्रालयाने राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर मोहम्मद मुश्ताक अहमद हे हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदावरून वैयक्तिक बांधिलकीचे कारण देत पायउतार झाले आहेत.
हॉकी इंडियाचे कार्यकारी सदस्य तसेच महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहणारे मणिपूरचे ज्ञानेंद्रो निगोमबाम यांची अहमद यांच्या जागी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दिनविशेष :
11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो.
प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचा जन्म 11 जुलै 1891 मध्ये झाला.
सन 1893 मध्ये कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.
11 जुलै सन 1950 मध्ये पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म 11 जुलै 1953 मध्ये झाला.
चिलितील तांब्याच्या खाणींचे सन 1971 मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.