11 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs

11 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 मार्च 2022)

रशियातील धनाढय़ांना ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी :

  • रशियाच्या धनाढय़ नागरिकांना ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांना ब्रिटनमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • प्रीमियर लीग सूकर क्लब चेल्सियाचा अब्जाधीश रोमन अ‍ॅब्रामोव्हिच यांनाही ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांची ब्रिटनमधील बँक खाती गोठवण्यात आली आहे.
  • अ‍ॅब्रामोव्हिच यांना ब्रिटनमध्ये स्वतंत्रपणे किंवा व्यापारासाठी कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही, असे ब्रिटिश प्रशासनाकडून सांगण्यात आले.
  • ब्रिटनमध्ये व्यापार करणाऱ्या आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या रशियन धनाढय़ांना तडाखा देण्यास ब्रिटनने सुरुवात केली आहे.
  • तर या धनाढय़ांना ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांची ब्रिटनमधील बँक खाती गोठवण्यात आली आहे.
  • तसेच‘बेसिक एलिमेंट्स’ या रशियातील मोठय़ा उद्योगसमूहाचे संस्थापक ओलेग देरिपास्का आणि रोस्नेफ्ट या ऊर्जा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयगोर सियाचिन यांनाही ब्रिटनने त्यांच्या देशात प्रवेशबंदी केली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 मार्च 2022)

पुन्हा भाजपचीच लाट :

  • शेतकरी आंदोलन, करोना हाताळणी, बेरोजगारी आदी मुद्यांवरून विरोधकांनी उभे केलेले आव्हान मोडीत काढून भाजपने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी चौकार लगावला़.
  • उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या ‘बुलडोझर’ने विरोधकांना भुईसपाट केलेच.
  • पण, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील सत्ताही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केल़े.
  • पंजाबने काँग्रेसचा ‘झाडू’न धुव्वा उडवला़ ‘आप’ने दिल्लीपाठोपाठ तिथेही एकहाती सत्ता मिळवून राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने घोडदौड केली़.
  • पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांच्या पक्षांतराने जेरीस आलेल्या काँग्रेसच्या आणि उत्तर प्रदेशात चार वेळा सत्तास्थानी राहिलेल्या बसपच्या अस्तित्वावर या निकालाने प्रश्नचिन्ह उभे केल़े.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धात भारताचा पराभव :

  • सलामीवीरांसह मधल्या फळीने केलेल्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाला गुरुवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडकडून 62 धावांनी पराभव पत्करावा लागला.
  • उपकर्णधार हरमनप्रीत कौरने भारताचा पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली.
  • हॅमिल्टन येथे झालेल्या या दुसऱ्या साखळी सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 261 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 46.4 षटकांत 198 धावांत आटोपला.
  • फेब्रुवारीत झालेल्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने भारतावर 4-1 असे वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे भारताला या वेळी पराभवाची परतफेड करण्याची संधी होती.
  • दुसऱ्या विजयासह न्यूझीलंडने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले, तर भारतीय संघ दोन लढतींमधील दोन गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

श्रीसंतची निवृत्तीची घोषणा :

  • एस. श्रीसंतने भारतीय क्रिकेट संघाला दोनदा विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
  • पण मॅच फिक्सिंगमुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली.
  • तसेच बंदी उठल्यानंतर पुन्हा एकदा तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला आणि त्याने टीम इंडियातही पुनरागमन दाखविण्याचा आशेचा किरण त्याच्या चाहत्यांना दाखवला.
  • पण सलग दोन आयपीएल लिलावाट दुर्लक्ष आणि वृद्धत्व यामुळे त्याच्या कारकिर्दीला ब्रेक लागला.
  • श्रीसंतने बुधवारी, 9 मार्च रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
  • श्रीसंतने आधी एकामागून एक ट्विट केले आणि नंतर लाइव्ह येऊन ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

दिनविशेष:

  • 1886 या वर्षी आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.
  • पंडिता रमाबाई यांनी मुंबई सन 1889 मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.
  • सन 1984 मध्ये ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.
  • 1999 या वर्षी नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.
  • कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. सन 2001 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 मार्च 2022)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago