11 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 मे 2019)
Amazon चंद्रावर जाण्याच्या तयारीत :
- अमेझॉन चंद्रावर आपले यान पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांनी ही घोषणा केली.
- तसेच ‘ब्लू ओरिजिन स्पेस प्रोग्राम’ अंतर्गत त्यांनी मून लँडर लॉन्च केले आहे.
- तर हे मून लॅन्डर चार रोव्हर्स, नव्या पद्धतीने डिझाईन केलेले रॉकेट आणि सूपअप रॉकेटला वाहून नेण्यास सक्षम असल्याची माहिती बेझॉस यांनी दिली.
- गेल्या तीन वर्षांपासून नासाच्या वैज्ञानिकांसह आपण या मून लँडरवर काम करत असल्याचे बेझॉस म्हणाले आहें. सध्या चीन, जपान, अमेरिकेसहित अनेक देश चंद्रावरील रहस्य जाणून घेण्यासाठी या अभियानावर काम करत आहेत.
- 1966 साली सोव्हिएत महासंघाने चंद्रावर ‘लूना 9’ उतरवले होते. त्यानंतर अमेरिकेनेही आपली महत्त्वाकांक्षी अपोलो ही मोहीम राबवली होती. या अभियानाअंतर्गत नासाने सूक्ष्म संशोधन केले होते. तसेत या अभियानाचे अमेरिकेने थेट
प्रक्षेपणही करण्यात आले होते.
मुकेश अंबानी विकत घेतली 259 वर्ष जुनी ब्रिटिश कंपनी :
- प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ब्रिटनमधील खेळण्याची कंपनी हॅमलेज (Hamleys)ला खरेदी केले आहे.
- रिलायन्स इंडस्ट्रीजने यासाठी तब्बल 67.96 मिलियन पौंड म्हणजेच 620 कोटी रूपये मोजले आहेत.
- हॅमलेज या कंपनीची स्थापना लंडनमध्ये 1760 मध्ये झाली. हॅमलेज हा लहान मुलांच्या खेळण्यांचा प्रसिद्ध ब्रँड असून याचे 18 देशांत उत्पादने विकली जातात. त्यात चीन, जर्मनी, रशिया, भारत, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व इथे कंपनीची
स्टोअर्स आहेत. - हॅमलेजचा भारतामध्ये विक्रीसाठी रिलायन्ससोबत करार होता. त्याअंतर्गत भारतातील 29 शहरांमध्ये हेमलेजची 88 दुकानं आहेत.
- हॅमलेजची मालकी सध्या हाँगकाँगच्या सी बॅनर आंतरराष्ट्रीय होल्डिंग्स या कंपनीकडे आहे.
इराणकडून होणारी तेल आयात पूर्ण बंद :
- अमेरिकेच्या दबावाखाली येऊन भारताने इराणकडून तेलाची आयात पूर्णपणे थांबवली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, ज्या आयातींबाबत इराणशी आधीच करार झाले आहेत, त्यानुसार प्रलंबित असलेल्या खेपांतील तेल मिळवण्यासाठी भारत अमेरिकेशी वाटाघाटी करत करत आहे.
- भारताचा निर्णय इराणमधून कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची सर्व आयात थांबवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्देशांना अनुसरून आहे. इराणशी केलेल्या अणुकरारातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेने इराणच्या हसन रूहानी राजवटीवर विशेषत: इराणी अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार असलेल्या कच्च्या तेलाबाबत आणि इतरही अनेक निर्बंध लादले होते.
- तसेच यानंतर, आपल्या ऊर्जाविषयक गरजांसाठी इराणवर अवलंबून असलेल्या सात देशांना अमेरिकेने गेल्या नोव्हेंबरमध्ये सहा महिन्यांची सवलत दिली होती.
- ‘सिग्निफिकंट रिडक्शन एक्झेम्प्शन’ या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या सवलतीची मुदत 2 मे रोजी संपली. ज्यांच्याबाबत आधीच करार झाले होते, त्यातील काही तेल अद्याप यायचे आहे.
लास्ट मिनिट बुकिंगवर सूट :
- एअर इंडियाने शेवटच्या क्षणी होणार्र्या तिकीट बुकिंगसाठी मोठी सूट अधिकृतरीत्या जाहीर केली आहे. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
- तसेच सवलतीचा नेमका आकडा निवेदनात देण्यात आलेला नाही.
- तथापि, एका वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, शेवटच्या क्षणी होणार्या बुकिंगवर एअर इंडियाकडून सरसकट 50 टक्के सूट देण्यात येणार आहे.
- जेट एअरवेज जमिनीवर आल्यानंतर विमान तिकिटे प्रचंड महागली आहेत. ऐनवेळच्या प्रवासासाठी तर विमान कंपन्या अव्वाच्या सव्वा दर आकारत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताची राष्ट्रीय विमान वाहतूक सेवाप्रवाशांच्या मदतीला धावून
आली आहे. सुट्यांच्या हंगामात ही प्रवाशांसाठी बंपर ऑफर ठरणार आहे. - एअर इंडियाने घेतलेल्या निर्णयानुसार, विमान उड्डाणाच्या तीन तास आधी ऐनवेळच्या बुकिंगअंतर्गत विकण्यात येणार्या तिकिटांवर मोठी सवलत दिली जाणार आहे.
दिनविशेष :
- 11 मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
- 11 मे 1857 चा राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
- मिनेसोटा अमेरिकेचे 32 वे राज्य 11 मे 1858 मध्ये झाले.
- 11 मे 1867 मध्ये लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
- मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना 11 मे 1888 मध्ये रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
- इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश 11 मे 1949 मध्ये झाला.
- 11 मे 1949 मध्ये सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा