11 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs
11 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 मे 2022)
आता देशात होणार डिजिटल जनगणना :
- करोना साथीच्या रोगामुळे देशात गेल्यावर्षी जनगणनेची प्रक्रिया राबवण्यात आली नाही.
- भारतात दर दहा वर्षांनी जनगणना प्रक्रिया राबवली जाते. यापूर्वी ही प्रक्रिया कागदोपत्री केली जायची.
- पण आता जनगणना प्रक्रियेचं डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.
- ही प्रक्रिया डिजिटल केल्यामुळे मोजणी प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे.
- एवढंच नव्हे तर, जन्म आणि मृत्यू बाबतचं रजिस्टरही याला जोडण्यात (लिंक) येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
- यामुळे देशात प्रत्येक जन्म आणि मृत्यूनंतर जनगणना आपोआप अपडेट होणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
भारतीय रेल्वेने सादर केली ‘बेबी बर्थ’सीट :
- भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे (NR)झोनने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आणखी एक पाऊल उचलले आहे.
- उत्तर रेल्वे झोनच्या लखनौ विभागाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये खालच्या बर्थमध्ये लहान मुलांसाठी बेबी बर्थ जोडण्यात आला आहे.
- प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये बेबी बर्थ बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
- रेल्वेच्या या निर्णयामुळे लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
- बेबी बर्थमधील प्रवासी त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या मुलाला अतिरिक्त बर्थमध्ये बसवून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
भारताच्या दानिश सिद्दिकींना ‘फोटोग्राफीचा नोबेल’:
- अफगाणिस्तानमध्ये गतवर्षी जुलैमध्ये कर्तव्य बजावताना ठार झालेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांना फोटोग्राफी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
- फिचर फोटोग्राफी विभागामध्ये दानिश यांना यंदाचा ‘पुलित्झर पुरस्कार 2022’ प्रदान केला जाणार आहे.
- दानिश यांच्यासहीत चार भारतीयांना हा बहुमान यंदा हा बहुमान देण्यात येणार आहे.
- ‘पुलित्झर पुरस्कार’हा फोटोग्राफीमधील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.
- दानिश यांच्या कामाचा या पुरस्काराच्या माध्यमातून मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे.
- दानिश यांचे रॉयटर्स वृत्तसंस्थेमधील सहकारी अदनान अबिदी, साना इशरद माटो आणि अमित दवे यांनाही या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.
आशिया चषक तिरंदाजी स्पर्धाट भारताला तीन सुवर्ण, एक कांस्य :
- भारतीय तिरंदाजांनी आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी तीन सुवर्ण आणि एक कांस्य अशा एकूण चार पदकांसह आपले खाते उघडले.
- महिला विभागाच्या अंतिम फेरीत परनीत कौर, अदिती स्वामी आणि साक्षी चौधरी यांनी कझाकिस्तानचा 204-201 असा पराभव केला.
- मग पुरुष विभागाच्या अंतिम फेरीत प्रथमेश फुगे, ऋषभ यादव आणि समाधान जावकर यांनी बांगलादेशवर 224-218 असा विजय मिळवला.
- त्यानंतर समाधानने पुरुषांच्या वैयक्तिक विभागात कझाकस्तानच्या सर्गेई क्रिस्टीचवर 147-145 अशी मात करत कांस्य पदक मिळवले.
- याशिवाय मिश्र विभागात भारताच्या प्रथमेश आणि परनीत जोडीने कझाकिस्तानच्या अॅडेल झेक्सेनबिनोवा आणि क्रिस्टीच या जोडीला 158-151 असे नमवून भारताला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले.
दिनविशेष :
- 11 मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
- 11 मे 1857 चा राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
- मिनेसोटा अमेरिकेचे 32 वे राज्य 11 मे 1858 मध्ये झाले.
- 11 मे 1867 मध्ये लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
- मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना 11 मे 1888 मध्ये रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
- इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश 11 मे 1949 मध्ये झाला.
- 11 मे 1949 मध्ये सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड केले.