11 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs

दानिश सिद्दिकींना

11 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 मे 2022)

आता देशात होणार डिजिटल जनगणना :

  • करोना साथीच्या रोगामुळे देशात गेल्यावर्षी जनगणनेची प्रक्रिया राबवण्यात आली नाही.
  • भारतात दर दहा वर्षांनी जनगणना प्रक्रिया राबवली जाते. यापूर्वी ही प्रक्रिया कागदोपत्री केली जायची.
  • पण आता जनगणना प्रक्रियेचं डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.
  • ही प्रक्रिया डिजिटल केल्यामुळे मोजणी प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे.
  • एवढंच नव्हे तर, जन्म आणि मृत्यू बाबतचं रजिस्टरही याला जोडण्यात (लिंक) येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
  • यामुळे देशात प्रत्येक जन्म आणि मृत्यूनंतर जनगणना आपोआप अपडेट होणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 मे 2022)

भारतीय रेल्वेने सादर केली ‘बेबी बर्थ’सीट :

  • भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे (NR)झोनने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आणखी एक पाऊल उचलले आहे.
  • उत्तर रेल्वे झोनच्या लखनौ विभागाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये खालच्या बर्थमध्ये लहान मुलांसाठी बेबी बर्थ जोडण्यात आला आहे.
  • प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये बेबी बर्थ बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • रेल्वेच्या या निर्णयामुळे लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
  • बेबी बर्थमधील प्रवासी त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या मुलाला अतिरिक्त बर्थमध्ये बसवून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

भारताच्या दानिश सिद्दिकींना ‘फोटोग्राफीचा नोबेल’:

  • अफगाणिस्तानमध्ये गतवर्षी जुलैमध्ये कर्तव्य बजावताना ठार झालेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांना फोटोग्राफी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • फिचर फोटोग्राफी विभागामध्ये दानिश यांना यंदाचा ‘पुलित्झर पुरस्कार 2022’ प्रदान केला जाणार आहे.
  • दानिश यांच्यासहीत चार भारतीयांना हा बहुमान यंदा हा बहुमान देण्यात येणार आहे.
  • ‘पुलित्झर पुरस्कार’हा फोटोग्राफीमधील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.
  • दानिश यांच्या कामाचा या पुरस्काराच्या माध्यमातून मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे.
  • दानिश यांचे रॉयटर्स वृत्तसंस्थेमधील सहकारी अदनान अबिदी, साना इशरद माटो आणि अमित दवे यांनाही या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

आशिया चषक तिरंदाजी स्पर्धाट भारताला तीन सुवर्ण, एक कांस्य :

  • भारतीय तिरंदाजांनी आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी तीन सुवर्ण आणि एक कांस्य अशा एकूण चार पदकांसह आपले खाते उघडले.
  • महिला विभागाच्या अंतिम फेरीत परनीत कौर, अदिती स्वामी आणि साक्षी चौधरी यांनी कझाकिस्तानचा 204-201 असा पराभव केला.
  • मग पुरुष विभागाच्या अंतिम फेरीत प्रथमेश फुगे, ऋषभ यादव आणि समाधान जावकर यांनी बांगलादेशवर 224-218 असा विजय मिळवला.
  • त्यानंतर समाधानने पुरुषांच्या वैयक्तिक विभागात कझाकस्तानच्या सर्गेई क्रिस्टीचवर 147-145 अशी मात करत कांस्य पदक मिळवले.
  • याशिवाय मिश्र विभागात भारताच्या प्रथमेश आणि परनीत जोडीने कझाकिस्तानच्या अ‍ॅडेल झेक्सेनबिनोवा आणि क्रिस्टीच या जोडीला 158-151 असे नमवून भारताला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले.

दिनविशेष :

  • 11 मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
  • 11 मे 1857 चा राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
  • मिनेसोटा अमेरिकेचे 32 वे राज्य 11 मे 1858 मध्ये झाले.
  • 11 मे 1867 मध्ये लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
  • मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना 11 मे 1888 मध्ये रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
  • इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश 11 मे 1949 मध्ये झाला.
  • 11 मे 1949 मध्ये सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 मे 2022)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago