11 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 ऑक्टोबर 2018)
भारताचे नवे महाधिवक्ता तुषार मेहता:
- ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता यांची भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. रंजीतकुमार यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद भरण्यात आले नव्हते. मागील वर्षी डिसेंबरमध्ये रंजीतकुमार यांनी राजीनामा दिला होता.
- कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने भारताच्या महाधिवक्तापदी मेहता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. मागील 11 महिन्यांपासून हे पद रिकामे होते. तुषार मेहता हे गुजरातचे आहेत.
- भाजपाची केंद्रात सत्तेत आल्यानंतर 2014 मध्ये मेहता यांना अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नेमण्यात आले होते. मेहता यांनी माहिती अधिकार कायदा कलम 66 अ प्रकरणी केंद्र सरकारची बाजू मांडली आहे.
यूथ ऑलिम्पिक स्पर्धेत सौरभ चौधरीला सुवर्णपदक:
- सौरभ चौधरी याने यूथ ऑलिम्पिकमध्ये 10 ऑक्टोबर रोजी दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. भारतीय नेमबाजांची यूथ ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.
- 16 वर्षांच्या सौरभने 244.2 गुणांची कमाई केली. त्याने द. कोरियाचा सुंग युन्हो (236.7) आणि स्वित्झर्लंडचा सोलारी जेसन (215.6) यांना मागे टाकले. आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत सौरभने दहापेक्षा अधिक गुणांची 18 वेळा नोंद केली.
- आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ज्युनियर आयएसएसएफ विश्व चॅम्पियनशिोमध्ये सुवर्ण विजेत्या राहीलेल्या सौरभने पात्रता फेरीतही 580 गुणांसह अव्वल स्थान पटकविले होते. या आधी 16 वर्षांच्या मनू भाकरने महिलांच्या पिस्तुल प्रकारात सुवर्ण जिंकले होते.
- चार दिवसात चौथ्यांदा भारताच्या नेमबाजांनी पदक जिंकले आहे. शानू माने आणि मेहली घोष यांना रौप्य पदक मिळाले होते. सौरभने मागच्या महिन्यात झालेल्या आयएसएसएफ विश्व नेमबाजीत एअर पिस्तुलमध्ये विश्व विक्रमासह सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पाचवा भारतीय नेमबाज ठरला.
ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित डी.के. दातार कालवश:
- जागतिक कीर्तीचे व्हायोलीनवादक पंडित डी.के. दातार यांचे 10 ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. गायकी अंगाने व्हायोलीन वादन करणारे एक अतिशय वरच्या दर्जाचे कलावंत म्हणून ते प्रसिद्ध होते.
- भारतीय अभिजात संगीतात सर्वात जुन्या अशा ग्वाल्हेर घराण्याचे संस्कार त्यांच्यावर होते. त्यांचे वडील केशवराव हे विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे गुरुबंधू. त्यामुळे अगदी लहान वयातच त्यांच्यावर घराणेदार स्वरसंस्कार झाले. याच वयात मोठे बंधू नारायणराव यांनी त्यांच्या हातात व्हायोलीन हे वाद्य दिले आणि त्यानंतर त्यांनी या वाद्याची संगत कधीच सोडली नाही.
- हिंदुस्थानी संगीतामध्या गायकी अंगाने व्हायोलिन वाजवण्याची पद्धत रुजवण्याचे श्रेय पंडित दातार यांना जाते. त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 1996 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1998 साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तर 2004 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हरविंदर सिंहला तिरंदाजीत सुवर्णपदक:
- जकार्ता येथे सुरु असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये भारताचा तिरंदाज हरविंदर सिंहने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. याव्यतिरीक्त मोनु घांगसने थाळीफेकमध्ये रौप्य तर मोहम्मद यासिरने गोळाफेकीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली.
- हरविंदर सिंहने अंतिम फेरीत चीनच्या झाओ लिक्स्युचा 6-0 ने पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. भारताचे या स्पर्धेतले हे सातवे सुवर्णपदक ठरले.
- दुसरीकडे थाळीफेक प्रकारात भारताच्या मोनु घांगसने अंतिम प्रयत्नात 35.89 मीटर लांब थाळी फेरत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. इराणच्या ओलाद मेहदीने 42.37 मी. लांब थाळी फेकत सुवर्णपदक पटकावलं.
- तसेच गोळाफेकीत भारताच्या मोहम्मद यासिरला कझाकिस्तान आणी चीनच्या खेळाडूची झुंज मोडता आली नाही, 14.22 मी. लांब गोळा फेकल्यामुळे मोहम्मदला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर:
- रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर झाला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा फायदा जवळपास 12 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. आता रेल्वे मंत्रालयाकडून याबाबतची अमलबजावणी केली जाणार आहे.
- केंद्रीय मंत्रिमंडळाची 10 ऑक्टोबर रोजी बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे.
- तसेच यातील ठराविक रक्कम दसऱ्याच्या अगोदर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. उर्वरित रक्कम दिवाळीच्या बँक खात्यात जमा होईल. रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांना हा बोनस मिळणार नाही.
दिनविशेष:
- 11 ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिन‘ आहे.
- सन 1852 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना झाली.
- प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व निर्माते अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 मध्ये झाला.
- व्ही.एस. नायपॉल यांना सन 2001 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
View Comments
Dailly gk update sent in my whatsapp