11 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
रुद्रम 1 या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
11 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 ऑक्टोबर 2020)
एचबीएस अधिष्ठातापदी भारतीय वंशाचे शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार निवड झाली:
भारतीय वंशाचे शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार यांची हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या (एचबीएस)अधिष्ठातापदी निवड झाली आहे.
ते आता नितीन नोहरिया यांचे उत्तराधिकारी आहेत. संस्थेच्या 112 वर्षांच्या इतिहासात लागोपाठ दुसऱ्यांदा भारतीय वंशाच्या व्यक्तीची अधिष्ठातापदी निवड झाली आहे.
दातार हे मुंबई विद्यापीठ आणि ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद’चे माजी विद्यार्थी असून सध्या ते उद्योग व्यवस्थापन विषयात ‘आर्थर लोवीस डिकिन्सन’चे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे वरिष्ठ सहायक अधिष्ठाता आहेत.
दातार हे 1 जानेवारीपासून अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्वीकारतील, असे अध्यक्ष लॅरी बॅकाव यांनी सांगितले.
बॅकाव यांनी म्हटले आहे की, दातार हे कल्पक शिक्षणतज्ज्ञ, विद्वान असून त्यांच्या अनुभवाचा संस्थेला निश्चितच लाभ झाला आहे व यापुढेही होईल.
गेल्या पंचवीस वर्षांत त्यांनी एचबीएस (हार्वर्ड बिझनेस स्कूल) संस्थेत विविधांगी काम केले असून इतर हार्वर्ड स्कूल्सशी सहकार्य केले आहे.
आसाममधील भाजपा सरकार राज्यातील सरकारी मदरसे आणि संस्कृत शाळा बंद करण्याच्या तयारीत आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून या शाळा बंद करण्यात येणार असून याबाबत लवकरच अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आसामचे शिक्षण आणि अर्थमंत्री हिमांता बिस्व सरमा यांनी सांगितले.
मदरसे बंद झाल्यानंतर 48 कंत्राटी शिक्षकांना शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये सामावून घेतलं जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
खासगी तत्वावर संस्कृत शाळा आणि मदरशे चालवण्याबाबत सरकारचं काहीही म्हणणं नाही, असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.
रुद्रम 1 या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी:
संरक्षण क्षेत्रात भारताने एक मोठा पल्ला गाठला आहे. डीआरडीओने आज स्वदेशी बनावटीच्या पहिल्या अँटी रेडिएशन मिसाइलची यशस्वी चाचणी केली.
या क्षेपणास्त्रामुळे भारताची शत्रूवर हवाई हल्ला करण्याची क्षमता कैकपटीने वाढली आहे.
ब्रह्मोस, निर्भय, शौर्य या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्यानंतर, डीआरडीओने शुक्रवारी पहिल्यांदाच रुद्रम 1 या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
रुद्रम 1ने आपल्या पहिल्याच चाचणीत ठरवलेले निकष पूर्ण करणं हे फक्त साधसुध यश नाहीय, कारण या क्षेपणास्त्रामुळे भारताची लष्करी, हवाई शक्ती कैकपटीने वाढली आहे.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.