11 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
11 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 ऑक्टोबर 2022)
मानसिक आजारासाठी आता आरोग्य विभागाची ‘टेलीमानस’ योजना :
- जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात लहान मुलांपासून ते वृद्धलोकांपर्यंत मानसिक आजाराच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन प्रभावी उपापयोजना करण्याची शिफारस केली आहे.
- खास करून करोनाच्या काळात वेगवेगळ्या कारणांनी मानसिक आजाराचे रुग्ण वाढू लागल्याचे लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने ‘टेलीमानस’ नावाची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्याचबरोबर कर्नाटक सरकारने विकसित केलेले ई-मानस सॉफ्टवेअर राज्यासाठी घेण्याचे निश्चित केले आहे.
- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या जिल्हा मानसिक कार्यक्रमातील आकडेवारी गेल्या काही वर्षात मानसिक आजाराचे रुग्ण वेगाने वाढत असल्याचे दाखविणारा आहे.
- ही जवळपास पावणेतीन कोटी रुपये खर्चाची योजना असून यात पुणे व ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय तसेच अंबेजोगाई रुग्णालय अशा तीन केंद्रांमधून एका विशिष्ठ दूरध्वनी क्रमांकावर रुग्णाला मानसिक आरोग्य विषयक समुपदेशन व सल्ला दिला जाणार आहे.
- यासाठीचा विशिष्ठ दूरध्वनी क्रमांक लवकरच जाहीर केला जाईल, असे सांगून डॉ. लाळे म्हणाले की, मानसोपचारतज्ज्ञांपासून मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग नियुक्त केला जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
महेंद्रसिंह धोनीने लॉन्च केला ‘ड्रोनी’ कॅमेरा :
- भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने स्वदेशी ‘ड्रोनी’ या ड्रोन कॅमेराला लॉन्च केले आहे.
- अत्याधुनिक सुविधा असलेले हे ड्रोन ‘गरुडा एयरोस्पेस’ या कंपनीने निर्मित केले आहे.
- धोनी या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
- या कंपनीने बनवलेला ‘ड्रोनी’ हा कॅमेरा 2022 च्या अखेरपर्यंत बाजारात दाखल होईल.
- “ड्रोनी ड्रोन हा पूर्णत: स्वदेशी बनावटीचा आहे. याचा उपयोग विविध उद्दिष्टांसाठी पाळत ठेवण्यासाठी होऊ शकतो.
- ड्रोन अत्यंत कार्यक्षम, अखंड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आला आहे.
आयोगाकडून ‘शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावास मान्यता :
- शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचे वाटप केले.
- त्यानुसार उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली.
- ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले आहे.
- ठाकरे गटाच्या वतीने ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ असे पक्षनावांचे तीन पर्याय आयोगापुढे सादर करण्यात आले होते.
हरमनप्रीत कौरने आयसीसी पुरस्कार जिंकत रचला इतिहास :
- भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे.
- दोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांच्या श्रेणीतील महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे.
- महिला गटात हरमनप्रीत महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली आहे, तर रिझवानला पुरुष गटात हा बहुमान मिळाला आहे.
- हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये इतिहास रचला होता, कारण भारताला 1999 नंतर एकदाही इंग्लंडमध्ये विजय मिळवता आला नव्हता.
- पण आता हरमनप्रीतच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
- हा पुरस्कार मिळवण्यासाठी हरमनप्रीत कौरने सहकारी खेळाडू स्मृती मानधना आणि बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना यांना मागे टाकले.
दिनविशेष:
- 11 ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिन‘ आहे.
- सन 1852 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना झाली.
- प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व निर्माते अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 मध्ये झाला.
- व्ही.एस. नायपॉल यांना सन 2001 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले.