Current Affairs (चालू घडामोडी)

12 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

12 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 जानेवारी 2019)

‘एनएसई’चे अध्यक्ष अशोक चावला यांचा राजीनामा:

  • नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (एनएसई) अध्यक्ष अशोक चावला यांनी 11 जानेवारी रोजी रात्री अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याआधी काही वेळापूर्वीच केंद्र सरकारला सीबीआयमार्फत एअरसेल-मॅक्सिस प्रकरणामध्ये चावला यांच्याविरोधात खटला भरण्याला परवानगी मिळाली होती. या महत्वपूर्ण घडामोडीनंतर लगेचच चावला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  • मात्र, एनएसईकडून रात्री चावला यांच्या राजीनाम्याबाबत घोषणा करताना कोणतीही विशेष माहिती देण्यात आली नव्हती. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सेबी) एनएसईमधील को-लोकेशन सुविधेतील तृटींवर काम करीत आहे. काही दलालांना एक्सचेंद्वारे तीव्र फ्रिक्वेन्सीच्या सुविधेत अस्विकारार्ह सेवा उपलब्ध करुन दिली आहे किंवा नाही याचाही सेबी शोध घेत आहे.
  • माजी वित्त सचिव असलेले चावला हे 28 मार्च 2016 रोजी एनएसईचे अध्यक्ष बनले. त्यांनी भारतीय नागरविकास विमान सचिवही म्हणूनही काम पाहिले आहे. चावला यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये येस बँकेच्या अध्यक्षपदावरुन राजीनामा दिला होता.
  • तसेच यापूर्वी सीबीआयने दिल्लीच्या एका कोर्टात सांगितले होते की, केंद्राने पाच लोकांविरोधात खटला भरण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये विद्यमान आणि काही माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहेत. हे लोक काँग्रेस आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांच्याशी संबंधित एअरसेल-मॅक्सिस प्रकरणातील आरोपी आहेत.

कोहली, पदुकोण सर्वांत महागडे सेलिब्रिटी:

  • अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. 2018 या वर्षातील सर्वांत महागडा भारतीय सेलिब्रिटी विराट कोहली ठरला आहे. त्यापाठोपाठ बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात दीपिका पदुकोण आहे.
  • ‘डफ अँड फेल्प्स’द्वारा जाहीर करण्यात आलेल्या भारतातील सर्वांत महागड्या सेलिब्रिटींच्या यादीत विराट सलग दुसऱ्यांदा अग्रस्थानी आहे. विराटचे ब्रँड मूल्य 170.9 मिलिनय डॉलर तर दीपिकाचे ब्रँड मूल्य 102.5 मिलिनय डॉलर इतके आहे.
  • विशेष म्हणजे विराटशिवाय 100 मिलियन डॉलर ब्रँड मूल्याचा आकडा पार करणारी एकमेव सेलिब्रिटी दीपिका ठरली आहे.
  • गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत विराटने भारतातील 24 विविध ब्रँड्सच्या जाहिराती केल्या तर दीपिकाने 21 विविध ब्रँड्सच्या जाहिराती केल्या.
  • भारतात जाहिरातींसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींना अधिक महत्त्व दिले जाते. पण विराट याला अपवाद ठरला आहे. सर्व बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकत प्रसिद्धीच्या बाबतीत विराट अव्वल ठरला आहे.

माजी बँकर मीरा सन्याल यांचे निधन:

  • बँकिंग क्षेत्रातील आपली उत्कृष्ट वाटचाल सोडून राजकारणात प्रवेश केलेल्या मीरा सन्याल यांचे अल्पशा आजाराने 11 जानेवारी रोजी निधन झाले, त्या 57 वर्षांच्या होत्या.
  • त्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विटद्वारे सन्याल यांच्या मृत्यूला दुजोरा दिला. देशाने एका तल्लख मेंदू आणि सभ्य आत्म्याच्या व्यक्तीला गमावले आहे, असे भावनिक ट्विट सिसोदिया यांनी केले आहे.
  • राजकारणात प्रवेश करताना सन्याल यांनी आपले 30 वर्षांचे उज्ज्वल बँकिंग करिअर सोडण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला होता. कोची येथे जन्मलेल्या सन्याल यांनी एबीएन अॅम्रो या परदेशी बँकेच्या आशियातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कॉर्पोरेट फायनान्सच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
  • मीरा सन्याल यांनी 2014 मधील लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघातून आपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

आता टॅबव्दारे होणार चालकाच्या शिकाऊ परवान्याची चाचणी:

  • राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) दिल्या जाणाऱ्या (लायसन्स) परवाना चाचणीचे काम आता अधिक पारदर्शी व गतिमान होणार आहे.
  • लायसन देण्याचे काम लवकरच संगणकाद्वारे केले जाणार आहे. त्यासाठी तब्बल 500 टॅबलेट खरेदी करण्यात येणार आहेत.
  • तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारच्या प्रकल्प अंमलबजावणी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली होती.
  • राज्यातील सर्व 11 परिवहन कार्यालयांत टॅब पुरविले जाणार आहेत. त्याद्वारे चालकाची ड्रायव्हिंग चाचणी घेतली जाईल.
  • 500 टॅबच्या खरेदीसाठी गृह विभागाने आरटीओला मान्यता दिली असून येत्या काही महिन्यांत त्याची पूर्तता होईल, असे अधिकार्‍याकडून सांगण्यात आले.

दिनविशेष:

  • 12 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन‘ म्हणून साजरा केला जातो.
  • नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त 12 जानेवारी रोजी भारतात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. स्वामीजींचे तत्त्वज्ञान आणि ज्या आदर्शांमुळे ते जगले व कार्य केले ते भारतीय युवकांसाठी प्रेरणास्थान बनले आणि 1984 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला.
  • राजमाताजिजाऊ‘ यांचा जन्म 12 जानेवारी सन 1598 रोजी झाला होता.
  • भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फस्वामी विवेकानंद‘ यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला होता.
  • सन 1936 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा केली.
  • सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना सन 1997 मध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.
  • 12 जानेवारी 2005 रोजी राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago