12 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (12 जानेवारी 2022)
सहा राफेल लढाऊ विमाने लवकरच वायूदलात दाखल होणार :
- भारतीय वायुदलातील सर्वात अत्याधुनिक मध्यम वजनाची लढाऊ विमाने म्हणून राफेल लढाऊ विमान ओळखलं जातं.
- फ्रान्स देशाचे तंत्रज्ञान असलेल्या राफेल लढाऊ विमानांचा ताफा येत्या एप्रिल महिन्यात पुर्णत्वास जाणार आहे.
- तसेच आत्तापर्यंत 30 राफेल विमाने भारतीय वायूदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत.
- तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन राफेल विमाने दाखल होणार असून एप्रिल महिन्यात उर्वरीत तीन विमाने दाखल होणार आहे.
- तसेच यापैकी शेवटची तीन राफेल विमाने ही आणखी अत्याधुनिक असणार आहे, भारतीय वायूदलाच्या मागणीनुसार दाखल होणाऱ्या शेवटच्या तीन राफेलमध्ये आवश्यक बदल केले जात आहेत.
- हवेतून हवेत अधिक अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र सामावून घेण्याची सोय, फ्रिक्वेन्सी जॅम करणारे रडार, अत्याधुनिक संपर्क यंत्रणा, जमिनीवरील रडारची सूचना देणारे रिसिव्हर, जमिनीवरील हालचालीची वेगाने नोंद करणारे संवेदक, विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची जलद नोंद करणारी यंत्रणा असे काही बदल हे भारतीय वायूदलाने सुचवले आहेत.
- तर हे बदल शेवटच्या तीन राफेल लढाऊ विमानात केले जातील. जेव्हा टप्प्याटप्प्याने उर्वरीत राफेलचे नुतनीकरण करण्यात येईल तेव्हा हे आवश्यक बदल इतर 33 राफेलमध्ये केले जातील.
विराट कोहलीने आणखी एक मोठा विक्रम केला आपल्या नावावर :
- विराट कोहलीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
- दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने उपाहारापर्यंत नाबाद 15 धावांची खेळी केली.
- तर यासह त्याच्या दक्षिण आफ्रिकेत कसोटीत 626 धावा आहेत.
- दक्षिण आफ्रिकेतील कसोटीत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
- तर त्याने माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे सोडले.
- तसेच आता तो फक्त सचिन तेंडुलकरच्या मागे आहे.
- सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाज म्हणून कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत.
टाटा समूहने मिळवले ‘आयपीएल’चे शीर्षक प्रायोजकत्व :
- देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेल्या टाटा समूहाने येत्या हंगामापासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचे शीर्षक प्रायोजकत्व येत्या हंगामापासून दोन वर्षांसाठी मिळवले आहेत.
- चायनीज मोबाइल निर्मिती कंपनी व्हिवो यांच्या जागी टाटा समूहाकडे हे अधिकार देण्यात आल्याचे‘आयपीएल’ प्रशासकीय समितीचे प्रमुख ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले.
- टाटा समूह दोन वर्षांसाठी सुमारे 670 कोटी रुपये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) देणार आहे.
अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस मॉरिसची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर :
- दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस मॉरिसने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
- तर तो टायटन्स संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम करणार असल्याचेही त्याने सांगितले.
- मॉरिस हा आयपीएल 2021 चा सर्वात महागडा खेळाडू होता..
अमेरिकेतून भारतात आयात होणार डुकराचं मांस :
- अमेरिकेतून भारतात डुकराच्या मांसाची आयात करण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे.
- भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परवानगी देण्यात आली असून ऐतिहासिक पाऊल म्हणून या घटनेकडे पाहिलं जात आहे.
- अमेरिकेतील डुकरांपासून तयार केलेली विविध उत्पादनं आता भारतात आयात करणं या निर्णयामुळे शक्य होणार आहे.
- अमेरिकेतून भारतात येणाऱ्या विविध कृषी उत्पादनांपैकी डुक्कर आणि संबंधित उत्पादने हे एक महत्त्वाचं प्रॉडक्ट आहे.
- मात्र इतर कृषी उत्पादनांप्रमाणं डुकराचं मांस भारतात आयात करायला आतापर्यंत सरकारनं परवानगी दिली नव्हती.
- तर यासंदर्भात द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परवानगी देण्यात आली असून भारताचे दरवाजे आता पोर्क आणि पोर्क प्रॉ़डक्टसाठी खुले झाले आहेत.
- 2020 मधील आकडेवारीनुसार अमेरिका हा डुकरांच्या मांसाचं उत्पादन करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
- तर या पदार्थांची निर्यात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
दिनविशेष:
- 12 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन‘ म्हणून साजरा केला जातो.
- नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त 12 जानेवारी रोजी भारतात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.
- स्वामीजींचे तत्त्वज्ञान आणि ज्या आदर्शांमुळे ते जगले व कार्य केले ते भारतीय युवकांसाठी प्रेरणास्थान बनले आणि 1984 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला.
- राजमाता ‘जिजाऊ‘ यांचा जन्म 12 जानेवारी सन 1598 रोजी झाला होता.
- भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ ‘स्वामी विवेकानंद‘ यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला होता.
- सन 1936 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा केली.
- सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना सन 1997 मध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.
- 12 जानेवारी 2005 रोजी राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना झाली.