12 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (12 जून 2019)
कामगार कायद्यांत बदलाचा विचार :
- गुंतवणूकदारांसाठी सध्याच्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. सध्याच्या कामगारविषयक 44 कायद्यांचे चार गटांत वर्गीकरण आणि सुसूत्रीकरण केले जाणार आहे.
- तर वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा आणि ओद्योगिक संबंध अशा चार गटांत या कायद्यांचा समन्वय साधला जाणार आहे.
- गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आंतरमंत्री गटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- तसेच या बैठकीस शहांबरोबर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कामगारमंत्री संतोष गंगवार, वाणिज्य आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल आदी सहभागी झाले होते.
- कामगारांच्या प्रॉव्हिडंड फंडशी संबंधित कायदे, कामगार राज्य विमाविषयक कायदे, प्रसूतीविषयक सवलती आणि भरपाईविषयक कायदे यांचे एकाच सामाजिक सुरक्षा कायद्यात सुसूत्रीकरण होणार आहे.
- तर औद्योगिक सुरक्षाविषयक सध्या अस्तित्वात असलेल्या खाण कामगार कायदा, गोदी कामगार कायदा आदी कायद्यांचे विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. किमान वेतन कायदा, बोनस कायदा, प्रोत्साहन आणि अन्य भत्ते या कायद्यांचेही सुसूत्रीकरण होण्याची शक्यता आहे.
- औद्योगिक तंटा कायदा 1947, कामगार संघटना कायदा 1926, औद्योगिक कामगार कायदा 1946 यांचेही सुसूत्रीकरण अपेक्षित आहे.
ई-सिगारेटवरील बंदीच्या प्रस्तावाला मान्यता :
- ई-सिगारेट आणि व्हॅप्स यांसारख्या निकोटिनयुक्त इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल संघटनेने (सीडीएससीओ) ई-सिगारेटला ड्रग्ज म्हणून प्रतिबंधित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती मिळाली आहे.
- तर या प्रस्तावाला आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर सीडीएससीओला उत्पादन, विक्री आणि वितरण यावर प्रतिबंध घालता येणे शक्य होणार आहे. मात्र याचा व्हेपर उत्पादने बाजारपेठेला फटका बसणार आहे. यापूर्वी आरोग्य
मंत्रालय आणि सीडीएससीओने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या आयात आणि विक्रीवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. - तसेच कर्नाटक, केरळ, मिझोराम, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने ई-सिगारेटच्या उत्पादनावर आणि वितरण व विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश अलीकडेच जारी केले आहेत.
अंतराळातील युद्धशस्त्र प्रणाली विकासासाठी नव्या संस्थेस मंजुरी :
- अंतराळातील संकटांचा सामना करण्यासाठी देशाच्या सैन्य दलाचे लष्करी सामर्थ वाढवण्याच्यादृष्टीने केंद्र सरकारने एका नव्या संस्थेस मंजुरी दिली आहे. या उद्देशाच्या प्राप्तीसाठी ही संस्था अत्याधुनिक युद्धशस्त्र प्रणाली व तंत्रज्ञानाचा विकास करेल.
- तर डिफेन्स रिसर्च एजन्सी (डीएसआरओ) असे नाव असेलेली या नव्या संस्थेला अंतराळातील युद्धशस्त्र प्रणाली व तंत्रज्ञान निर्मितीची जबाबदारी देण्यात आली असल्याचे संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी एएनआयला सांगितले आहे.
- तसेच सरकारकडून काही वेळापूर्वीच सर्वोच्च स्तरावर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता संयुक्त सचिव-स्तरावरील शास्त्रज्ञांद्वारे या संस्थेची बांधणी करण्यास सुरूवात झाली आहे. या संस्थेसाठी शास्त्रज्ञांचा एक गट काम करेल, जो की
तिन्ही सैन्यदलाच्या अधिका-यांशी समन्वय साधुन असेल. - ही संस्था डिफेन्स स्पेस एजन्सी (डीएसए) ला संशोधन व विकास कार्यात मदत करणार आहे. ज्यामध्ये तिन्ही सेवा दलांचा समावेश असेल.डीएसएची निर्मिती ही अंतराळातील युद्धात देशाची मदत करण्यासाठी करण्यात आलेली आहे.
पाच वर्षांत पाच कोटी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती :
- मोदी सरकारनं आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक-आर्थिक सशक्तीकरणासाठी पुढील पाच वर्षांत पाच कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. यात निम्मं प्रमाण मुलींचं असेल. अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी याबद्दलची माहिती दिली.
- तसेच अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मौलाना आजाद शिक्षण प्रतिष्ठानच्या 65 व्या आमसभेनंतर नक्वींनी पत्रकारांशी संवाद साधला.
- मदरशातील शिक्षकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल असं मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मदरशातील शिक्षक हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, संगणकाचं शिक्षण देऊ शकतील.
- तर पुढील महिन्यापासून हे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक-आर्थिक सशक्तीकरणासाठी पाच वर्षांत पाच कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल.
दिनविशेष :
- 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो.
- भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म इ.स. 499 मध्ये 12 जून रोजी झाला.
- गोपाळकृष्ण गोखले यांनी 12 जून 1905 रोजी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.
- 12 जून 1975 मध्ये अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना 6 वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा