12 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs

12 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 मार्च 2022)

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजारांचे अनुदान :

  • उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा तसेच महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला.
  • यावेळी अजित पवार यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान, शेततळ्याच्या अनुदान रकमेत वाढ अशा प्रकारच्या मोठ्या घोषणा केल्या.
  • अजित पवार यांनी शेती, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग यांच्यातील विकास अशी पंचसूत्री मांडली.
  • तसेच या अनुदानाचा लाभ जवळपास 20 लाख शेतकऱ्यांना होईल.
  • भूविकास बँकेच्या 34 हजार 788 कर्जादार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 मार्च 2022)

पहिली व्हीलचेअर प्रीमियर बास्केटबॉल लीग आजपासून मुंबईत :

  • भारतात प्रथमच 60 व्हीलचेअर खेळाडूंचा समावेश असलेल्या प्रीमियर बास्केटबॉल लीगचे शनिवारपासून आयोजन करण्यात येणार आहे.
  • ‘प्रोजेक्ट मुंबई’ उपक्रमांतर्गत सामान्य जनतेच्या मनात अपंगांविषयी जिव्हाळा निर्माण करण्याच्या हेतूने 12 आणि 13 मार्च रोजी मुंबईत ही स्पर्धा खेळवण्यात येईल.
  • स्टेट बँक ऑफ इंडियाने या उपक्रमासाठी 93 लाखांची मदत केली आहे.
  • शनिवारी नागपाडा आणि रविवारी मुंबई सेंट्रल येथील वायएमसीए केंद्रात दुपारी चार वाजल्यापासून या लीगचे सामने होतील.
  • या लीगमध्ये 20 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्हीलचेअर खेळाडू सहभागी होणार आहेत.

गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांना झुकते माप :

  • गतिमान वाहतूक व दळणवळण हा राज्याच्या वेगवान विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने विकासाच्या पंचसूत्रीमध्ये दळणवळणाला अधिक महत्त्व देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
  • त्यानुसार पायाभूत सुविधा आणि दळणवळणासाठी 15 हजार 673 कोटींची भरीव तरतूद केल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केले.
  • राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक विस्तृत आणि मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 या अंतर्गत सुमारे 7 हजार 500 कोटी रुपये खर्चाच्या सुमारे 10 हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण होतील.
  • तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा-3 अंतर्गत एकूण 6 हजार 550 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाना यंदा सुरुवात करण्यात येणार आहे.
  • त्याचप्रमाणे नाबार्डच्या साहाय्याने राबिवण्यात येत असलेल्या हायब्रीड अ‍ॅन्युईटी योजनेतून 65 रस्ते विकासांची व 165 पुलांची कामे यंदा सुरू करण्यात येणार आहेत.
  • आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून 5 हजार 689 कोटी रुपये खर्चून 990 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे मजबुतीकरण व दजरेन्नती करण्यात येत आहे.

स्मारके, गडकिल्ले, तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळांसाठी भरीव तरतूद :

  • विविध स्मारके, गडकिल्ले, पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे यांच्यासाठी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली अष्टविनायक मंदिरे तसेच पंढरपूर देवस्थानच्या विकासासाठी निधी देण्यात येणार आहे.
  • पर्यटन विकासावर 1700 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • मुंबईत मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन गुढीपाडव्याला होत असून त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ऐरोली येथील मराठी भाषा संशोधन उपकेंद्रासाठी 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर यांचे स्मारक म्हणून त्यांच्या नावाने सुूरू करण्यात येणाऱ्या कलिनातील आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • नागपूरमधील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या आफ्रिकन सफारीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

दिनविशेष:

  • भारताचे संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी झाला होता.
  • रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे सन 1918 मध्ये हलविण्यात आली.
  • सन 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी 200 मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
  • चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड नाटो (NATO) मध्ये 1999 यावर्षी सामील झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 मार्च 2022)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago