12 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

12 September 2018 Current Affairs In Marathi

12 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 सप्टेंबर 2018)

सिद्धिविनायक मंदिर टपाल तिकिटाचे लोकार्पण:

  • भारतीय डाक विभागातर्फेमाय स्टॅम्प‘ या योजनेअंतर्गत प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट तयार करण्यात आले आहे. या तिकिटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. My Stamp
  • मुख्यमंत्री म्हणाले, सिद्धिविनायक हे तमाम मुंबई आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात. मी सिद्धिविनायक चरणी महाराष्ट्रावरची सर्व संकटे दूर करण्याची प्रार्थना केली आहे. सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सातत्याने प्रगती करीत राहील. हे तिकीट सर्वांच्या घरी शुभवार्ता घेऊन जाईल.
  • या वेळी टपाल विभाग व सिद्धिविनायक न्यास संस्थेचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. या योजनेअंतर्गत भक्तांना आपला स्वतःचा, परिवाराचा, मित्रांचा, नातेवाईक यांचे छायाचित्र सिद्धिविनायक मंदिर टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करून मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

पुढील वर्षी जॅक मा ‘अलिबाबा’तून निवृत्त होणार:

  • जगातील सर्वांत श्रीमंतांपैकी एक असलेले जॅक मा पुढील वर्षी ‘अलिबाबा’ कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहेत. मा यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल झॅंग यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे.
  • कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून मा वर्षभर कायम राहणार आहेत. मा यांनी त्यांच्या 54 व्या वाढदिवशी आपला उत्तराधिकारी जाहीर केला.
  • झँग हे 46 वर्षांचे असून, ते 10 सप्टेंबर 2019 मध्ये कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. झॅंग यांच्याकडे पूर्ण सूत्रे सुपूर्द करेपर्यंत मा कार्यकारी अध्यक्षपदी राहतील. कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर मा संचालक मंडळावर कायमस्वरूपी सदस्य म्हणून 2020 पर्यंत राहणार आहेत.
  • सुरवातीच्या काळात इंग्रजीचे शिक्षक असलेले मा यांनी ‘अलिबाबा’ला 420 अब्ज डॉलरची कंपनी बनविले. व्यावसायिक जबाबदारीतून मुक्त होऊन मा आता सामाजिक कार्याकडे वळणार आहेत. ते प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रावर भर देणार आहेत.

क्रीडामंत्रीच्या हस्ते राही सरनोबतचा सत्कार:

  • आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या राही सरनोबत हिचा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Rahi Sarnobat
  • राही सरनोबतने नुकत्याच झालेल्या एशियन गेम्समध्ये नेमबाजीतील 25 मीटर एअर पिस्तुल या प्रकारात सुवर्णवेध घेतला होता. या भेटीदरम्यान तावडे यांनी राहीला 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत अशीच सुवर्ण कामगिरी करून पदकाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असे सांगितले. त्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, असेही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. राहीनेदेखील आता पुढील लक्ष्य प्रामुख्याने टोकियोतील ऑलिम्पिक स्पर्धाच असल्याचे यावेळी नमूद केले.

भारतीय नेमबाजांची रौप्य-कांस्य पदकाची कमाई:

  • कोरियामध्ये सुरु असलेल्या नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संघाने स्कीट नेमबाजी प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे. याचसोबत भारताच्या गुरनिहाल सिंहने वैय्यक्तिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली आहे.
  • गुरनिहाल, अनंतजित, आयुष रुद्रराजू या संघाने 355 गुणांसह दुसरे स्थान कायम राखत भारताच्या खात्यात रौप्यपदकाची भर घातली आहे. 10 सप्टेंबर रोजी झालेल्या पात्रता फेरीत भारतीय जोडीने अव्वल स्थान मिळवले आहे. याव्यतिरीक्त अन्य प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी निराशाजनक खेळ केला.
  • आतापर्यंत या स्पर्धेमधून भारताच्या दोन खेळाडूंनी ऑलिम्पिक पात्रतेचा कोटा मिळाला आहे. अपुर्वी चंदेला आणि अंजुम मुद्गील या खेळा़डू 2020 टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. यानंतरही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली मात्र ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणे त्यांना जमले नाहीये.

एसटीत पदोन्नतीत 25 टक्के आरक्षण:

  • एसटी महामंडळात लिपिक-टंकलेखकपदासह वर्ग-3 मधील बढती प्रक्रियेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी यापुढे 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. ST Mahamandal
  • ऐन गणेशोत्सवाआधी परिवहनमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एसटी महामंडळात सध्या सुमारे एक लाख चार हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात 60 ते 70 हजार चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत.

बॅंकिंग फ्रंटीयरतर्फे महाराष्ट्रातील बॅंकांचा सन्मान:

  • आगीच्या घटनेनंतर सावरलेल्या धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला नवी दिल्लीत बेस्ट डाटा सिक्‍युरिटी पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्रातील सहा सहकारी बॅंकांचा सन्मान झाला.
  • दरवर्षी बॅंकिंग फ्रंटीयरतर्फे (एफसीबीए) देशातील बॅंकिंग क्षेत्रात वैशिष्टपूर्णउल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बॅंकांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या पुरस्कारांनी गौरविले जाते.
  • यावेळी नवी दिल्ली येथील हॉटेल प्राइड प्लाझामध्ये ‘एनएएफएससीओबी’चे अध्यक्ष, ‘नाबार्ड’चे सरव्यवस्थापक सी. रामचंद्रन, रिझर्व्ह बॅंकेचे माजी गर्व्हनर आर. गांधी, सहकार भारतीचे सतीश मराठे, लखनौस्थित नाबार्डचे (बर्ड) व्यवस्थापक मणिकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, सरव्यवस्थापक विजय सावंत, आयटी कक्षप्रमुख संजय काटे यांचा बेस्ट डाटा सिक्‍युरिटी पुरस्काराने गौरव झाला.

दिनविशेष:

  • गॅटलिंग गन चे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म 12 सप्टेंबर 1818 मध्ये झाला.
  • सुविख्यात क्रांतिकारकथोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचा पारनेर अहमदनगर येथे 12 सप्टेंबर 1880 मध्ये जन्म झाला.
  • इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1912 मध्ये झाला.
  • सन 1998 मध्ये डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान झाला.
  • सन 2002 मध्ये मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Swati says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.