Current Affairs (चालू घडामोडी)

13 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

13 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 एप्रिल 2019)

ए.आर. रेहमान यांचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण:

  • आपल्या संगीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार, गायक ए.आर. रेहमान यांनी आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.
  • ए.आर. रेहमान निर्मित ’99 साँग्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेहमान यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा केली आहे.
  • ’99 साँग्स’ या चित्रपटाची निर्मिती रेहमान यांची ‘वाय.एम. मूव्हीज’ आणि जिओ स्टुडिओज मिळून करणार आहेत. ही एक प्रेमकथा असणार आहे.
  • विशेष म्हणजे रेहमान यांनीच चित्रपटाची कथा लिहिली आहे. रेहमान यांचा चित्रपट म्हटल्यावर अर्थात संगीताचा त्यात महत्त्वपूर्ण भाग असेल. ‘या चित्रपटाच्या प्रेमकथेत संगीताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 एप्रिल 2019)

नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर:

  • भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे, असे रशियाच्या दूतावासाकडून सांगण्यात आले.
  • रशियाने नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ सेंट अ‍ॅण्ड्रू दी अपोस्टल‘ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे. परदेशातील राष्ट्रप्रमुख आणि राष्ट्राध्यक्षांनाच हा पुरस्कार देण्यात येतो.
  • मोदी यांना यूएईने 4 एप्रिल रोजी सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. त्यापूर्वी दक्षिण कोरिया, सौदी अरब आणि यूएनने मोदींना पुरस्कार देऊन गौरविले आहे.
  • भारत आणि रशियातील भागीदारी त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधील जनतेतील मैत्रीपूर्ण संबंध याबाबत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचे रशियाने म्हटले आहे.

पोलीस भरतीत आधी लेखी परीक्षा, नंतर शारीरिक चाचणी:

  • पोलीस शिपाई पदावर बुद्धिमान उमेदवारांची निवड करण्याच्या उद्देशाने आता प्रथम लेखी परीक्षा व त्यानंतर शारीरिक चाचणीसाठी बोलावण्याचा निर्णय पोलीस विभागाने घेतला आहे. या निर्णयाचे तरुणांनी स्वागत केले असून, बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
  • पोलीस दलातील कर्मचार्‍यांचे कामाचे स्वरूप बदलले असल्याने शक्तीसोबत समयसूचकता ठेवून तत्परतेने काम करणे आवश्यक झाले आहे. पोलीस शिपाई पदभरतीवेळी शारीरिक चाचणी आधी घेण्यात येत होती. या चाचणीदरम्यान काही दुर्घटनाही झाल्या आहेत.
  • याशिवाय शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होणारे काही तरुण लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण होत असल्याचेही आढळून आले. त्यामुळे शारीरिक चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी परिश्रम घेणार्‍या उमेदवारांची निराशा होत होती. अशा सर्व बाबी विचारात घेऊन शासनाने पोलीस शिपाई पदभरतीत प्रथम लेखी परीक्षा व त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त झालेल्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविले जाणार आहे.
  • त्यामुळे भरतिप्रक्रिया रेंगाळणार नाही तसेच परजिल्ह्यातील उमेदवारांनाही ताटकळत राहावे लागणार नाही. उमेदवारांना या बदलाचा फायदा होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

मुंबई नर्सिग होम अधिनियम 2019:

  • राज्यातील नर्सिग होम्सची नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासाठी आकारावयाचे शुल्क, नर्सिग होममध्ये प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक, तसेच वर्षांतून दोन वेळा अ वर्ग वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी हे मुंबई नर्सिग होम नियम 2019 मधील प्रस्ताव नर्सिग होम्ससाठी अन्यायकारक असल्याची हरकत इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे घेण्यात आली आहे.
  • असोसिएशनकडून राज्याच्या आरोग्य विभागाला यासंबंधीच्या सूचना आणि हरकतींचे पत्र देण्यात आले आहे.
  • राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मुंबई नर्सिग होम नोंदणी अधिनियम 2006 अंतर्गत राज्यात मुंबई नर्सिग होम नियम 2018 लागू करण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याला विरोध करण्यासाठी आयएमएच्या महाराष्ट्र शाखेचे नियोजित अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी आयएमएच्या वतीने या सूचना आणि हरकती आरोग्य विभागाला कळवल्या आहेत.

दिनविशेष:

  • गुरु गोविंद सिंग यांनी सन 1699 मध्ये खालसा हे गुरु पंथ तयार केले.
  • भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म 13 एप्रिल 1895 मध्ये झाला होता.
  • सन 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाला, यात 379 लोक ठार तर 1200 जखमी झाले होते.
  • व्ही. शांताराम प्रभात हे सन 1942 मध्ये फिल्म कंपनीतून बाहेर पडले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 एप्रिल 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago