13 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2018)
नोबेल पुरस्कार विजेते व्ही.एस. नायपॉल कालवश:
- नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक व्ही.एस. नायपॉल (वय 85) यांचे 11 ऑगस्ट रोजी निधन झाले.
- विद्याधर सुरजप्रसाद नायपॉल असे त्यांचे पूर्ण नाव होते. त्यांचा जन्म त्रिनिदाद येथे झाला. त्यांचे वडील सुरजप्रसाद हे त्रिनिदाद गॉर्जियनमध्ये पत्रकार होते आणि लेखकही होते. त्यांचे शिक्षण शिष्यवृत्ती घेऊन ऑक्सफोर्ड विद्यापीठात ब्रिटीश साहित्यात झाले. त्यानंतर ते लंडनमध्येच वास्तव्यास होते.
- नायपॉल यांनी 1955 मध्ये पेट्रीसिया एन हेल यांच्याशी विवाह केला होता. पण, त्यांचे 1996 मध्ये निदन झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानी पत्रकार नादिरा अल्वी यांच्याशी विवाह केला.
- नायपॉल यांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांना अनेक मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना 1971 मध्ये बुकर पुरस्कार देण्यात आला. तर, 2001 मध्ये साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला.
- ‘ए बेंड इन द रिव्हर‘, ‘अ हाऊस फॉर मिस्टर बिस्वास‘ ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्यांचे ‘द मिस्टिक मैसर‘ हे त्यांचे पहिले पुस्तक 1951 मध्ये प्रसिद्ध झाले होते.
- नायपॉल यांचे लेखन सुरवातीला वेस्ट इंडीज केंद्रीत होते. पण, नंतर त्याला जागतिक रुप मिळाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 30 हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘इन ए फ्री स्टेट (1971)‘, ‘ए वे इन द वर्ल्ड (1994)‘, ‘हाफ ए लाईफ (2001)‘ आणि ‘मॅजिक सीड्स (2004)‘ ही महत्त्वाची आहेत.
मद्रासच्या मुख्य न्यायमूर्तीपदी विजया कापसे यांची नियुक्ती:
- नळगीर ता. उदगीर येथील न्या. विजया कापसे ताहिलरामानी यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक केली आहे. त्यांनी 12 ऑगस्ट रोजी तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडून पदाची शपथ घेतली.
- तर मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. लातूरचे दोघे एकाचवेळी दोन वेगवेगळ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- गेल्या वर्षी डिंसेबर महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर सेवानिवृत्त झाल्यानंतर न्या. विजया कापसे ताहिलरमानी यांना प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी बढती मिळाली होती.
- त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्या. विजया ताहिलरमानी यांची शिफारस मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी केली होती. तर मूळचे मुशिराबाद (ता. लातूर) येथील न्या. नरेश पाटील हे ऑक्टोबर 2001 पासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी कार्यरत आहेत.
- न्या. विजया ताहिलरमानी यांच्या बढतीनंतर राष्ट्रपतींनी वरिष्ठ न्यायमूर्ती पाटील यांची मुंबई उच्च न्यायालायाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती केली आहे.
नासाचे ‘पार्कर सोलर प्रोब’ यानाचे यशस्वी प्रेक्षेपण:
- ‘नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन‘चे (नासा) ‘पार्कर सोलर प्रोब‘ हे यान 12 ऑगस्ट रोजी अंतराळात यशस्वीपणे झेपावले आहे. सूर्याच्या दिशेने झेपावून लाखो किलोमीटरचे अंतर पार करण्याची क्षमता या यानामध्ये आहे. तसेच हे यान पहिले मानवविरहित यान असल्याने याला मोठे महत्व असे प्राप्त झाले आहे.
- ‘पार्कर सोलर प्रोब‘ या पहिल्या मानवविरहित यानाच्या प्रक्षेपणास तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले होते. ‘नासा’चे हे यान अवकाशात झेपावण्यासाठी अवघे 55 सेकंद शिल्लक राहिले असताना प्रक्षेपण नियंत्रकाच्या कक्षातून ‘होल्ड, होल्ड, होल्ड’ असा आवाज आला होता. त्यामुळे या यानाने प्रक्षेपण थांबवण्यात आले होते.
- तसेच या प्रक्षेपणादरम्यान ‘हेलियम सिस्टीम‘मधील बिघाड कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे 11 ऑगस्ट रोजी होणारे प्रक्षेपण 12 ऑगस्ट रोजी घेण्यात आले. त्यानंतर या यानाचे प्रक्षेपण यशस्वीपणे घेण्यात आले.
सरकारव्दारे राख्या आणि गणेशमुर्ती करमुक्त:
- रक्षाबंधन आणि गणेश चतुर्थीला डोळ्यासमोर ठेवून अर्थमंत्री पियूष गोयल यांनी राख्या आणि गणेशमुर्तीवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) काढून टाकला आहे. त्यामुळे आता राख्या आणि गणेश मुर्तीची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
- अर्थमंत्री पियूष गोयल यांनी नवी दिल्लीमध्ये याची घोषणा केली. ‘येणाऱ्या रक्षाबंधनला राखीला जीएसटीमधून वगळले आहे. म्हणजे आता राखीवर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागणार नाही. त्याबरोबरच गणेश मुर्तीलाही जीएसटीमधून वगळले आहे.’ याशिवाय हस्तशिल्प आणि हँडलूमलाही जीएसटीमधून वगळण्यात आले आहे.’ असे अर्थमंत्री पियूष गोयल म्हणाले.
- दरम्यान, केंद्र सरकार जीएसटीचा टॅक्स स्लॅब 14 टक्क्यांवर आणण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे केंद्र सरकार 28 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करण्याचा विचार करत असताना दुसरीकडे 12 आणि 18 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करुन एकच 14 टक्क्यांचा स्लॅब करण्याचा विचार सरकार करत आहे.
वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धा चौथ्यांदा भारतात:
- भारताला विश्वकरंडक नेमबाजी संयोजनाची चौथ्यांदा संधी लाभली आहे. 2020 च्या टोकियो ऑलिंपिक पूर्वीची महत्त्वाची विश्वकरंडक स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहे. भारतातील ही 2012 पासून सातवी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा असेल.
- जागतिक नेमबाजी संघटनेच्या व्हिएन्ना येथील बैठकीत 2020 च्या विश्वकरंडक स्पर्धेचेही यजमानपद भारतास देण्यात आले. यापूर्वीच 2019 च्या फेब्रुवारीत दिल्लीत विश्वकरंडक स्पर्धा घेण्याचे ठरले आहे. यापूर्वी 2017 च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये तसेच ऑक्टोबरमध्ये विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धा दिल्लीत झाली होती.
- या स्पर्धेद्वारे भारतीय नेमबाजीचा दर्जा उंचावण्यास तसेच प्रसार होण्यास नक्कीच मदत होईल. भारतातील 2020 च्या स्पर्धेद्वारे भारतीय ऑलिंपिकसाठी जास्तीत जास्त कोटा मिळवतील, असा विश्वास भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांनी व्यक्त केला.
- तसेच यापूर्वी आशियाई शॉटगन (नोव्हेंबर-डिसेंबर 2012), आशिया एअरगन (सप्टेंबर-ऑक्टोबर 2015) आणि आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धा (जानेवारी-फेब्रुवारी 2016) या स्पर्धाही भारतात झाल्या आहेत.
दिनविशेष:
- ‘क्रिस्टियन हायगेन्स‘ या शास्त्रज्ञाने 13 ऑगस्ट 1642 रोजी मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.
- ‘त्र्यंबक बापूजी ठोंबरे‘ तथा ‘बालकवी‘ यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 मध्ये झाला.
- ‘कार्ल गुस्ताव्ह विट‘ याने सन 1898 मध्ये 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
- लेखक ‘प्रल्हाद केशव‘ तथा ‘आचार्य अत्रे‘ यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 मध्ये झाला.
- सन 1918 मध्ये बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा