13 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2019)
‘नॉलेज क्लस्टर’ मध्ये पुण्यासह सहा शहरांची निवड :
- केंद्र सरकारच्या ‘शहर ज्ञान व नवोपक्रम समूह’ (सिटी नॉलेज अँड इनोव्हेशन क्लस्टर्स) उपक्रमात विकासासाठी पुणे, भुवनेश्वर, चंडीगड, जोधपूर, अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकाता या सहा शहरांची निवड करण्यात आली आहे.
- तर या शहरांमध्ये किंवा राज्यात अस्तित्वात असलेल्या संस्था आणि निरनिराळे उद्योग यांच्यात समन्वय साधण्यासाठी या समूहांची योजना करण्यात येत आहे.
- राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांसाठी निश्चित केलेल्या अॅजेंडांतर्गत हा प्रकल्प प्रधान वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) कार्यालयाच्या नेतृत्वाखाली प्राधान्याने राबवण्यात येत आहे.
- तसेच या सर्व शहरांसाठी ‘कन्सेप्ट नोट्स’ तयार असून, काही शहरांमध्ये चर्चात्मक बैठकी आधीच सुरू झालेल्या आहेत. दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्तरावरील 20 प्रयोगशाळा याआधीच भुवनेश्वरच्या यादीवर असून, तीसहून अधिक औद्योगिक घराणी किंवा उद्योगांनी पुण्यात झालेल्या निरनिराळ्या बैठकींमध्ये भाग घेतला.
पृथ्वीची कक्षा ओलांडून 14 ऑगस्टला यान चंद्राकडे होणार रवाना :
- चांद्रयान-2 पृथ्वीची कक्षा ओलांडून 14 ऑगस्टला चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करेल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
- 14 ऑगस्टच्या पहाटे 3.30 मिनिटांनी चांद्रयान-2ची कक्षा बदलण्यात येणार आहे. त्यानुसार, हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर जाईल, याला ट्रान्स लुनार इंजेक्शन असे संबोधतात.
- तर त्यानंतर हे यान चंद्राच्या दिशेने रवाना होईल. त्यानंतर ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेतून जाईल. या प्रक्रियेनंतर पुढील 8 दिवसांत म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी चंद्राजवळ पोहोचेल, त्यानंतर यानाची कक्षा पुन्हा बदलण्यात येईल.
- तर त्यानंतर अखेर 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान-2 चंद्रावर उतरेल.
- तसेच यापूर्वी 6 ऑगस्ट रोजी चांद्रयान-2च्या कक्षेत पाचव्यांदा बदल करण्यात आला होता.
- इस्रोने 22 जुलै रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन आंतराळ केंद्रावरुन चांद्रयान-2चे प्रक्षेपण केले होते.
- इस्रोचे सर्वात शक्तीशाली रॉकेट जीएसएलव्ही मार्क 3च्या मदतीने हे प्रक्षेपण झाले होते. या यानाचे तीन भाग आहेत ऑर्बिटर, लैंडर (विक्रम) आणि रोवर (प्रज्ञान).
नदालचे 35वे जेतेपद :
- स्पेनच्या राफेल नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याचा 6-3, 6-0 असा धुव्वा उडवत माँट्रियल मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली.
- तसेच यासह नदालने नोव्हाक जोकोव्हिचला (33 जेतेपदे) मागे टाकत आपल्या मास्टर्स विजेतेपदांची संख्या 35 वर नेली.
- तर लाल मातीचा बादशाह समजल्या जाणाऱ्या नदालने आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदाच हार्डकोर्टवर इतक्या सहजपणे विजेतेपद कायम राखले.
मुकेश अंबानींचा सहा मोठ्या घोषणा :
- रिलायन्स इंडस्ट्रीज एजीएम 2019 मध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्या थेट सामान्यांना फायदा पोहोचवणार आहेत. जिओ लाँच केल्यानंतर रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ उडविली होती.
- तीन वर्षांनी पुन्हा त्यांनी जिओ गिगाफायबरची घोषणा करत देशातील 1600 शहरांना सुपरफास्ट इंटरनेट आणि बऱ्याच गोष्टींनी जोडण्याची घोषणा केली आहे.
- जिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
- सिनेमागृहांमध्ये रिलिज होणारा सिनेमा त्याच दिवशी घरबसल्या पाहता येणार आहे. ही सेवा 2020 पासून देण्यात येईल. यामुळे तुम्हाला टॉकीजमध्ये जाण्याची गरज राहणार नाही.
- अमेरिका, कॅनडासाठी 500 रुपयांचे अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन असतील. तसेच आयएसडी कॉलिंगचेही दर दहा पटींनी कमी केले आहेत.
- फायबर अॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत 4K ची मजा लुटण्यासाठी सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे. यावरून व्हिडिओ कॉलिंगही करता येणार आहे. यासाठी जिओ फॉरेव्हर प्लॅन घ्यावा लागणार
आहे. यासाठी किती रक्कम आकारणार याबाबत काहीच सांगितलेले नाही. - स्टार्टअप कंपन्यांसाठी क्लाऊड सर्व्हिस मोफत असणार आहे. ही सेवा 1 जानेवारीपासून दिली जाईल. याशिवाय लघू, मध्यम व्यवसाय इंटरनेट आणि अॅप्लीकेशन जोडणीसाठी 15 ते 20 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यासाठी यापुढे 1500 रुपये खर्च येणार आहे.
- 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च रिलायन्स करणार आहे.
दिनविशेष :
- ‘क्रिस्टियन हायगेन्स‘ या शास्त्रज्ञाने 13 ऑगस्ट 1642 रोजी मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.
- ‘त्र्यंबक बापूजी ठोंबरे‘ तथा ‘बालकवी‘ यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 मध्ये झाला.
- ‘कार्ल गुस्ताव्ह विट‘ याने सन 1898 मध्ये 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
- लेखक ‘प्रल्हाद केशव‘ तथा ‘आचार्य अत्रे‘ यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 मध्ये झाला.
- सन 1918 मध्ये बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा