Current Affairs (चालू घडामोडी)

13 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस यांची निवड:

13 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2020)

ट्रम्प प्रशासनाकडून भारतीयांना सर्वाधिक फायदा:

  • अमेरिकेतील सत्ताधारी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा धारकांना दिलासा दिला आहे.
  • H-1B व्हिसावरील निर्बंध थोडे शिथिल केले आहेत. याआधी ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय लागू केला होता.
  • लॉकडाउन आधी जे काम करत होते, त्याच नोकरीसाठी H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत परतायचे असेल तर, त्यांना परवानगी देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.
  • H-1B व्हिसावरील निर्बंध शिथिल करण्याचा भारतीयांना सर्वाधिक फायदा होईल.
  • H-1B हाच व्हिसा घेऊन भारतीय अमेरिकेत जातात तसेच याच व्हिसावर भारतीय मोठया संख्येन तिथे नोकरी करतात.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 ऑगस्ट 2020)

उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस यांची निवड:

  • अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस यांची निवड केली.
  • निवडून आल्यास त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष असतील. शिवाय पहिल्या भारतीय-अमेरिकी तसेच आफ्रिकी उपाध्यक्ष असतील.
  • अमेरिकेत कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराच्या घटनांनंतर अशांतता माजली असताना हॅरिस यांची उमेदवारी डेमोक्रॅटिक पक्षाला फायदेशीर ठरणार आहे.
  • बायडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच कृष्णवर्णीय महिलेची निवड करून एक इतिहास घडवला आहे. हॅरिस यांचे वडील हे जमैकातील, तर आई भारतीय आहे.

करोना प्रतिबंधक लशीची खरेदी केंद्रीय स्तरावर केली जाणार:

  • करोना प्रतिबंधक लशीची खरेदी केंद्रीय स्तरावर केली जाणार असून राज्यांनी स्वतंत्रपणे लस खरेदी करू नये, अशी सूचना राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने सर्व राज्यांना केली आहे. त्यामुळे लशीची खरेदी आणि वितरण दोन्हीही केंद्रिभूत केले जाणार आहे.
  • भारत हा जगातील प्रमुख लस उत्पादन केंद्रांपैकी असल्याने करोनाच्या लशीसाठी देशी उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर कसा करता येऊ शकेल तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरही लस उत्पादक देशांशी समन्वय कसा साधता येईल, या दोन प्रमुख मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आल्याचे केंद्र सरकारच्या निवेदनात नमूद केले आहे.
  • केंद्र सरकारने राज्यांना वितरित केलेल्या कृत्रिम श्वसन यंत्रांच्या वापरासंदर्भातील अचूक माहिती उपलब्ध होणारी यंत्रणा विकसित केली गेली.

प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवं व्यासपीठ केंद्र शासनाने तयार केले:

  • टॅक्स वेळेत भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (13 ऑगस्ट) एक ‘गूड न्यूज’ देणार आहेत.
  • प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवं व्यासपीठ केंद्र शासनाने तयार केलं असून याची पंतप्रधान मोदी उद्या घोषणा करणार आहेत.
  • पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ (Transparent Taxation : Honouring the Honest) असं या व्यासपीठाचं नाव आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) याबाबत माहिती देण्यात आली आहे.

पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेतील स्क्वेअरवर तिरंगा फडकवला जाणार:

  • भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार आहे.
  • विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त स्क्वेअरवर तिरंगा फडकवला जाणार आहे.
  • अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कॉन्टेकट या तीन राज्यांमधील भारतीयांचा समावेश असणाऱ्या एफआयएने जारी केलेल्या पत्रकामध्ये, “आम्ही इतिहास घडवणार आहोत,” असं म्हटलं आहे.
  • 15 ऑगस्ट 2020 रोजी टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडवणार आहोत,” असंही या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी लांबणीवर:

  • करोना साथीच्या पार्श्वभूमीवर ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा तसेच आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या आशियाई देशांची पात्रता फेरी लांबणीवर टाकण्यात आले.
  • तर भारतीय फुटबॉल संघाला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी क्रीडा चाहत्यांना अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
  • 2022 मध्ये कतार येथे फिफा विश्वचषक, तर 2023 मध्ये आशिया चषक रंगणार आहे. या दोन्ही स्पर्धासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आशियातील संघांचे पात्रता सामने खेळवण्यात येणार होते.
  • भारताने गतवर्षी ओमानविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून पात्रता फेरीत 8ऑक्टोबर रोजी कतारविरुद्ध, तर अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात भारताचा सामना होणार होता.

दिनविशेष :

  • ‘क्रिस्टियन हायगेन्स‘ या शास्त्रज्ञाने 13 ऑगस्ट 1642 रोजी मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.
  • ‘त्र्यंबक बापूजी ठोंबरे‘ तथा ‘बालकवी‘ यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 मध्ये झाला.
  • ‘कार्ल गुस्ताव्ह विट‘ याने सन 1898 मध्ये 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
  • लेखक ‘प्रल्हाद केशव‘ तथा ‘आचार्य अत्रे‘ यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 मध्ये झाला.
  • सन 1918 मध्ये बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 ऑगस्ट 2020)

Vaishnavi Jadhav

Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago