Current Affairs (चालू घडामोडी)

13 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

13 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 डिसेंबर 2018)

मोदी सरकार आज करणार मोठी घोषणा:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 13 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोदी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
  • 3 राज्यांतील पराभवानंतर मोठी सरकार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    मोदी सरकार तब्बल 4 लाख कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्याचा 2 लाख 63 हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
  • तीन राज्यांत शेतकऱ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात असलेल्या नाराजीमुळेच भाजपाला सत्ता गमवावी लागल्याची चर्चा आहे. आता त्याचीच दखल घेत भाजपा ही कर्जमाफी करण्याची शक्यता आहे.
  • एनडीए सरकारसमोर आता 2019च्या लोकसभा निवडणुकीचं मोठे आव्हान आहे. अशातच जनमानसात भाजपाबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याबरोबरच शेतकरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी ही कर्जमाफीची घोषणा करण्यात येऊ शकते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 डिसेंबर 2018)

इनसाइट यानाची मंगळावरून पृथ्वीकडे ‘सेल्फी’:

  • अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने मंगळावर पाठवलेल्या इनसाइट यानाने यांत्रिक बाहू व कॅमेरा यांच्या मदतीने सेल्फी छायाचित्र घेतले असून त्यात एकूण अकरा प्रतिमांचे ते संकलन आहे असे सांगण्यात आले.
  • क्युरिऑसिटी रोव्हर मोहिमेतही याच पद्धतीने छायाचित्रे काढण्यात आली होती. नंतर ती एकत्र जुळवण्यात आली होती. या स्वप्रतिमेत (सेल्फी) लँडरचे सौर पंख व सगळी वैज्ञानिक उपकरणेही दिसत आहेत.
  • इनसाइट लँडर मंगळावर खडकाळ भागात उत्खननाचे काम सुरू करणार असून हे यान 26 नोव्हेंबरला मंगळावर उतरले आहे.
  • इनसाइट लँडर मोहिमेतील वैज्ञानिकांनी सांगितले की, सेल्फी छायाचित्र चार बाय दोन मीटर आकाराचे असून त्यात इनसाइट यानाची सगळी पार्श्वभूमीही दिसत आहे. एकूण 52 छायाचित्रे जुळवून हे छायाचित्र तयार करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासन नव्या स्टेशनचे निर्माण करणार:

  • नर्मदा नदीकाठच्या सरदार सरोवरामध्ये उभारण्यात आलेली देशातील सर्वात भव्य प्रतिमास्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी पर्यटकांना रेल्वेच्या माध्यमातून पोहोचता यावे, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन नव्या स्टेशनचे निर्माण करणार आहे.
  • जिथे सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य प्रतिमा विराजमान आहे. तिकडे पर्यटकांना पोहोचण्यासाठी पाच किलोमीटर अंतरावर केवडिया या स्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे. हे रेल्वे स्टेशन अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहे.
  • पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी ही माहिती दिली आहे. येत्या 15 डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन करणार आहेत. यादरम्यान रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही उपस्थित राहणार आहेत.
  • केवडिया रेल्वे स्टेशन निर्माणासाठी जवळपास 20 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येणार आहे. या रेल्वे स्टेशनचं काम सप्टेंबर 2019पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.
  • सद्यस्थितीत पश्चिम रेल्वे डभोई आणि चांदोद स्टेशनांदरम्यानच्या 18 किलोमीटर लाइनचा विस्तार करत आहे. त्यानंतर त्याची पुढील लाइन 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या केवडियापर्यंत वाढवण्यात येणार आहे.

टेबल टेनिसपटू मनिका बत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा:

  • भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस संघटनेचा मानाचा ‘Breakthrough Star’ पुरस्कार मिळवणारी मनिका पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. इंचॉन येथे हा सोहळा पार पडला.
  • 2018 साल मनिकासाठी चांगले गेले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मनिकाने भारताला महिला टेबल टेनिसमध्ये पहिले सांघिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. चार वेळा सुवर्णपदक विजेत्या सिंगापूरच्या प्रतिस्पर्ध्याचा मनिकाने 3-1 ने पराभव केला होता.
  • तर यानंतर वैय्यक्तिक प्रकारातही मनिकाने सुवर्णपदकाची कमाई केली होती. याचसोबत महिला दुहेरी प्रकारात रौप्य तर मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदकाची कमाई करत मनिका बत्राने भारताचे स्थान भक्कम केले होते.
  • 23 वर्षीय मनिका बत्राने यानंर इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये शरथ कमालच्या साथीने मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. यादरम्यान जागतिक क्रमवारीत मनिकाने 52 हे आपले सर्वोत्तम स्थान पटकावले होते.

ब्रिटनमध्ये थेरेसा मे यांना दिलासा:

  • ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. ब्रेक्झिट समझोत्यावरून अडचणीत आल्यानंतर आता त्यांच्याच हुजूर पक्षाच्या खासदारांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला होता.
  • ब्रेक्झिट करारावरुन थेरेसा मे यांच्याविरोधात हुजूर पक्षाच्या खासदारांनीच थेरेसा मे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला होता.
  • अविश्वास ठराव फेटाळण्यासाठी पक्षाच्या 315 पैकी 158 खासदारांची मते आवश्यक होती. मी माझ्या सर्व ताकदीनिशी या अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार असे थेरेसा मे यांनी सांगितले होते. यानुसार 12 डिसेंबर रोजी अविश्वास दर्शक ठराव संसदेत मांडण्यात आला.

दिनविशेष:

  • भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक ‘संजय लोळ‘ यांचा जन्म 13 डिसेंबर 1940 मध्ये झाला होता.
  • गोव्याचे मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर‘ यांचा जन्म 13 डिसेंबर 1955 मध्ये झाला.
  • सन 1991 मध्ये मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे 23वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.
  • सायरस मिस्त्री यांना 2016 मध्ये टी.सी.एस. च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.
  • अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने 2016 जागतिक विजेते घोषित केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 डिसेंबर 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago