13 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs
13 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 डिसेंबर 2020)
डिजिटल मतदार ओळखपत्रांचा प्रस्ताव :
- निवडणूक आयोग मतदारांना डिजिटल पद्धतीची ओळखपत्रे जारी करण्याबाबत विचार करीत असून ही मतदार ओळखपत्रे डिजिटल रूपात असल्यास ती चटकन वापरता येऊ शकतात. असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.
- डिजिटल मतदान ओळखपत्र मतदार मोबाइलमध्ये बाळगू शकतात काय या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की एकदा निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार ओळखपत्रांचा निर्णय घेतल्यानंतर ती पुढची पायरी असू शकते.
- तसेच हे ओळखपत्र मोबाइलवर , संकेतस्थळावर, ई-मेलरूपात ठेवता येणारे किंवा मुद्रित स्वरूपात मतदानावेळी स्वतजवळ बाळगता येणारे अशा कुठल्याही प्रकारात आणता येईल.
- डिजिटल स्वरूपात व्यक्तीचे छायाचित्रही स्पष्ट असेल. अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे, की तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेताना सुरक्षेचा विचार करावा लागेल.
Must Read (नक्की वाचा):
केरळमधील नागरिकांना करोना लस मिळणार मोफत :
- केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी करोना लशीसंदर्भात एक मोठी घोषणा केली.
- केरळमध्ये करोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.
- केरळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे करोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
- तर या अगोदर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात घोषणा केली होती की, एकदा करोनावरील लस आली की ती राज्यातील नागरिकांना मोफत दिली जाईल.
- यानंतर मध्यप्रदेशकडून देखील ऑक्टोबरच्या शेवटी अशाचप्रकारची घोषणा केली गेली.
डॉक्टरांना दहा वर्ष द्यावी लागणार शासकीय रुग्णालयात सेवा :
- उत्तर प्रदेशात शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी असून, डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
- वैद्यकीय पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणं अनिवार्य असतं.
- तर उत्तर प्रदेश सरकारने डॉक्टरकीची पदवी घेतल्यानंतर 10 वर्षे शासकीय रुग्णालयात काम करणं सक्तीचं केलं आहे. जर मध्येच सेवा सोडली, तर डॉक्टरांना 1 कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.
- उत्तर प्रदेशात सध्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण एक वर्ष नोकरी केल्यास 10 अंकांची सूट दिली जाते.
- तर दोन वर्ष सेवा केल्यास 20 अंकांची सूट देण्यात येते. त्याचबरोबर डॉक्टर पदव्युत्तर अभ्यासक्रमाबरोबरच इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेऊ शकतात.
दिनविशेष:
- भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक ‘संजय लोळ‘ यांचा जन्म 13 डिसेंबर 1940 मध्ये झाला होता.
- गोव्याचे मुख्यमंत्री ‘मनोहर पर्रीकर‘ यांचा जन्म 13 डिसेंबर 1955 मध्ये झाला.
- सन 1991 मध्ये मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे 23वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.
- सायरस मिस्त्री यांना 2016 मध्ये टी.सी.एस. च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.
- अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने 2016 जागतिक विजेते घोषित केले.