13 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
13 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 डिसेंबर 2022)
भारतीय नौदलात आता महिलाही होणार ‘मरिन कमांडो’ :
- भारतीय नौदलाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
- या निर्णयानुसार आता महिलांनाही नौदलाच्या मरिन कमांडोजच्या स्पेशल फोर्सेसमध्ये दाखल होता येणार आहे.
- या वृत्तानुसार, महिलांनी ठरलेले निकष पूर्ण केले तर त्यांनाही नौदलात मरिन कमांडो म्हणून भरती होता येणार आहे.
- असं असलं तरी कोणालाही थेट मरिन कमांडो म्हणून भरती होता येत नाही.
- नौदलात भरती झाल्यानंतर मरिन कमांडो होण्यासाठीचे निकष पूर्ण करून मगच ‘स्पेशल फोर्स’मध्ये भरती होता येते.
- भारतीय सैन्य, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल या तिन्ही दलात स्पेशल फोर्सेस आहेत.
- या स्पेशल फोर्सेसमध्ये प्रतिकुल परिस्थितीतही तग राहू शकतील असे मानसिक आणि शारीरिक पातळीवरील सदृढ सैनिकांची भरती केली जाते.
Must Read (नक्की वाचा):
देशात लवकरच नवी टोल सिस्टीम :
- केंद्र सरकार लवकरच नवीन टोल सिस्टिम आणणार आहे.
- सध्या फास्टटॅगवरून टोल जमा करण्याच्या सिस्टिमचा वापर करण्यात येत आहे.
- यामध्ये लवकरच बदल करण्यात येत असुन एका नवी सिस्टिम अंमलात आणण्यात येणार आहे.
- केंद्र सरकारकडुन कॅमेरावर आधारित टोल जमा करण्याच्या पद्धतीचा विचार सुरू आहे.
- या कॅमेऱ्यांना ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर’ (ANPR) म्हणून ओळखले जाईल.
- कॅमेऱ्यावर आधारित या टोल जमा करण्याच्या पद्धतीचे मुख्य कारण नागरिकांचा टोल प्लाझावरील वेळ वाचवणे हा आहे.
- देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरून टोल प्लाझा हटवण्यात येतील आणि त्याजागी एएनपीआर इन्स्टॉल केले जाईल.
- एएनपीआरद्वारे गाडीच्या नंबर प्लेटवरील नंबरची नोंद करण्यात येईल आणि त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून पैसे भरले जातील.
मोपा विमानतळाला मनोहर पर्रीकरांचं नाव :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केलं.
- यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आदी नेते उपस्थित होते.
- मोपा येथील या नवीन विमानतळाला सरकारने दिवंगत मनोहर पर्रीकर यांचं नाव दिलं आहे.
- मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून काम केलं आहे.
स्मृती मंधानाने रचला इतिहास :
- भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे.
- या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पार पडला.
- डीवाय पाटील स्टेडियमवर पार पडलेल्ला सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला.
- सुपर ओव्हरमध्ये भारताने 4 धावांनी विजय नोंदवला.
- भारतीय महिला संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 हून अधिक धावा करणारी स्मृती मंधाना ही दुसरी महिला खेळाडू ठरली आहे.
- तिच्या आधी हे विशेष पराक्रम फक्त हरमनप्रीत कौरच्या नावावर नोंदवला गेला होता.
- मंधानाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2544 धावा केल्या आहेत.
दिनविशेष:
- भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक ‘संजय लोळ‘ यांचा जन्म 13 डिसेंबर 1940 मध्ये झाला होता.
- गोव्याचे मुख्यमंत्री ‘मनोहर पर्रीकर‘ यांचा जन्म 13 डिसेंबर 1955 मध्ये झाला.
- सन 1991 मध्ये मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे 23वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.
- सायरस मिस्त्री यांना 2016 मध्ये टी.सी.एस. च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.
- अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने 2016 जागतिक विजेते घोषित केले.