13 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs
13 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 फेब्रुवारी 2023)
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती:
- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा केंद्र सरकारने रविवारी मंजूर केला.
- आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- महाराष्ट्रासह 12 राज्यांत तसेच, लडाख या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी नव्या राज्यपालांची नियुक्ती केली.
- सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी झालेली नियुक्ती भुवया उंचावणारी ठरली आहे.
- कटारिया यांची थेट आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर जिल्ह्यातील बलाढय़ ब्राह्मण नेते शिवप्रताप शुक्ला यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल करून त्यांचे अप्रत्यक्ष पुनर्वसन केले आहे.
- वाराणसीतील लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना निष्ठेचे फळ मिळाले असून त्यांना सिक्कीमचे राज्यपाल करण्यात आले आहे.
- हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना आता भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा बिहारचे राज्यपालपद देण्यात आले आहे.
- छत्तीसगढच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची बदली मणिपूरच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे.
- तमीळनाडूतील दोन बडय़ा भाजप नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली असून सी. पी. राधाकृष्णन हे हिंदूी पट्टय़ातील झारखंडचे नवे राज्यपाल झाले आहेत.
- तर, मणिपूरचे राज्यपाल ला. गणेशन यांना नागालँडच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
- मेघालयमध्ये फागू चौहान यांची राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे.
- आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांना आता छत्तीसगडचे राज्यपाल बनवण्यात आले आहेत.
- निवृत्त ब्रिगेडीअर बी. डी. मिश्रा या आता लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपाल असतील, तर लेफ्ट. जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक (निवृत्त) अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल असतील.
Must Read (नक्की वाचा):
न्या. सोनिया गोकाणी यांच्यासह चौघे मुख्य न्यायाधीशपदी:
- या महिनाअखेरीस निवृत्त होणार असलेल्या दोघांसह चार न्यायाधीशांची रविवारी उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- गुजरात उच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्या. सोनिया गिरिधर गोकाणी यांना त्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आले.
- शपथ घेतल्यानंतर त्या उच्च न्यायालयाच्या एकमेव महिला मुख्य न्यायाधीश असतील.
- देशात 25 उच्च न्यायालये आहेत.
- आणखी एक महिला न्यायाधीश, न्या. सबिना या सध्या हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहात आहेत.
बांगलादेशच्या अध्यक्षपदासाठी चुप्पू यांचे नाव निश्चित:
- बांगलादेशच्या संसदेत संपूर्ण बहुमत असलेल्या सत्ताधारी अवामी लीगने माजी न्यायाधीश मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू यांना अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित केल्यामुळे, ते देशाचे पुढील अध्यक्ष बनणार असल्याचे निश्चित झाले आहे.
- अध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद यांचा कार्यकाळ 24 एप्रिलला संपत असून, चुप्पू हे त्यांची जागा घेतील.
- 350 सदस्यांच्या सभागृहात अवामी लीगचे 305 सदस्य आहेत.
- संसदेतील अधिकृत विरोधी पक्ष असलेल्या जातीय पार्टीने अध्यक्षपदासाठी कुणाच्याही नावाची शिफारस केलेली नाही.
भारताच्या महिला क्रिकेट संघाने टी-२० क्रिकेटमध्ये रचला खास इतिहास:
- महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केले आहे.
- विशेष म्हणजे पाकिस्तानने 149 धावांचा डोंगर उभारूनही भारताने हे आव्हान लिलया पेलले आहे.
- भारताने सात गडी राखून हा सामना खिशात घातला आहे.
- या विजयासोबतच भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत एक खास विक्रम केला आहे.
- महिला टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने आतार्यंतच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे.
रोहित शर्माने सचिन-सेहवागला मागे टाकत रचला खास विक्रम:
- कर्णधार रोहित शर्माने माजी सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडला आहे.
- रोहित शर्माने भारताकडून सलामी देताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके विजयात झळकावली आहेत.
- अशाप्रकारे तो आता भारताचा सर्वात यशस्वी सलामीवीर बनला आहे.
- सलामीवीर म्हणून रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 31 वे शतक होते, जे विजयात आले.
- सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 30 शतके आहेत, जी विजयात आली आहेत.
- या यादीतील तिसरे नाव भारताच्या वीरेंद्र सेहवागचे आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 21 सामने जिंकत शतके झळकावली.
नॅथन लायनचा मोठा पराक्रम:
- बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपुरात पार पडला.
- या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने इतिहास रचला आहे.
- यादरम्यान नॅथन लायनने कसोटी क्रिकेटमध्ये 30 हजार चेंडू फेकण्याचा विक्रम केला.
- अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ सहावा आणि दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे.
- त्याच्या रेकॉर्डमधील खास गोष्ट म्हणजे त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकही नो बॉल टाकलेला नाही.
- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत असा एकही गोलंदाज नाही. ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 30,000 चेंडू टाकले असतील पण त्यात एकही नो बॉल टाकला नाही.
- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू फेकण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे.
दिनविशेष:
- 13 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक रेडीओ दिन‘ आहे.
- स्पेनने सन 1668 या वर्षी पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
- प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 मध्ये झाला होता.
- इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1894 मध्ये झाला.
- लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1911 रोजी झाला होता.
Thank you for helping us. Delightful information helping to me and my friends