13 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 फेब्रुवारी 2023)
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती:
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा केंद्र सरकारने रविवारी मंजूर केला.
आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासह 12 राज्यांत तसेच, लडाख या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी नव्या राज्यपालांची नियुक्ती केली.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी झालेली नियुक्ती भुवया उंचावणारी ठरली आहे.
कटारिया यांची थेट आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर जिल्ह्यातील बलाढय़ ब्राह्मण नेते शिवप्रताप शुक्ला यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल करून त्यांचे अप्रत्यक्ष पुनर्वसन केले आहे.
वाराणसीतील लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना निष्ठेचे फळ मिळाले असून त्यांना सिक्कीमचे राज्यपाल करण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना आता भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा बिहारचे राज्यपालपद देण्यात आले आहे.
छत्तीसगढच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची बदली मणिपूरच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे.
तमीळनाडूतील दोन बडय़ा भाजप नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली असून सी. पी. राधाकृष्णन हे हिंदूी पट्टय़ातील झारखंडचे नवे राज्यपाल झाले आहेत.
तर, मणिपूरचे राज्यपाल ला. गणेशन यांना नागालँडच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मेघालयमध्ये फागू चौहान यांची राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांना आता छत्तीसगडचे राज्यपाल बनवण्यात आले आहेत.
निवृत्त ब्रिगेडीअर बी. डी. मिश्रा या आता लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपाल असतील, तर लेफ्ट. जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक (निवृत्त) अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल असतील.
न्या. सोनिया गोकाणी यांच्यासह चौघे मुख्य न्यायाधीशपदी:
या महिनाअखेरीस निवृत्त होणार असलेल्या दोघांसह चार न्यायाधीशांची रविवारी उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
गुजरात उच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्या. सोनिया गिरिधर गोकाणी यांना त्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आले.
शपथ घेतल्यानंतर त्या उच्च न्यायालयाच्या एकमेव महिला मुख्य न्यायाधीश असतील.
देशात 25 उच्च न्यायालये आहेत.
आणखी एक महिला न्यायाधीश, न्या. सबिना या सध्या हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहात आहेत.
बांगलादेशच्या अध्यक्षपदासाठी चुप्पू यांचे नाव निश्चित:
बांगलादेशच्या संसदेत संपूर्ण बहुमत असलेल्या सत्ताधारी अवामी लीगने माजी न्यायाधीश मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू यांना अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित केल्यामुळे, ते देशाचे पुढील अध्यक्ष बनणार असल्याचे निश्चित झाले आहे.
अध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद यांचा कार्यकाळ 24 एप्रिलला संपत असून, चुप्पू हे त्यांची जागा घेतील.
350 सदस्यांच्या सभागृहात अवामी लीगचे 305 सदस्य आहेत.
संसदेतील अधिकृत विरोधी पक्ष असलेल्या जातीय पार्टीने अध्यक्षपदासाठी कुणाच्याही नावाची शिफारस केलेली नाही.
भारताच्या महिला क्रिकेट संघाने टी-२० क्रिकेटमध्ये रचला खास इतिहास:
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केले आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानने 149 धावांचा डोंगर उभारूनही भारताने हे आव्हान लिलया पेलले आहे.
भारताने सात गडी राखून हा सामना खिशात घातला आहे.
या विजयासोबतच भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत एक खास विक्रम केला आहे.
महिला टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने आतार्यंतच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे.
रोहित शर्माने सचिन-सेहवागला मागे टाकत रचला खास विक्रम:
कर्णधार रोहित शर्माने माजी सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडला आहे.
रोहित शर्माने भारताकडून सलामी देताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके विजयात झळकावली आहेत.
अशाप्रकारे तो आता भारताचा सर्वात यशस्वी सलामीवीर बनला आहे.
सलामीवीर म्हणून रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 31 वे शतक होते, जे विजयात आले.
सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 30 शतके आहेत, जी विजयात आली आहेत.
या यादीतील तिसरे नाव भारताच्या वीरेंद्र सेहवागचे आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 21 सामने जिंकत शतके झळकावली.
नॅथन लायनचा मोठा पराक्रम:
बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपुरात पार पडला.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने इतिहास रचला आहे.
यादरम्यान नॅथन लायनने कसोटी क्रिकेटमध्ये 30 हजार चेंडू फेकण्याचा विक्रम केला.
अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ सहावा आणि दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे.
त्याच्या रेकॉर्डमधील खास गोष्ट म्हणजे त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकही नो बॉल टाकलेला नाही.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत असा एकही गोलंदाज नाही. ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 30,000 चेंडू टाकले असतील पण त्यात एकही नो बॉल टाकला नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू फेकण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे.
दिनविशेष:
13 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक रेडीओ दिन‘ आहे.
स्पेनने सन 1668 या वर्षी पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 मध्ये झाला होता.
इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1894 मध्ये झाला.
लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1911 रोजी झाला होता.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.
View Comments
Thank you for helping us. Delightful information helping to me and my friends