13 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

13 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 जानेवारी 2020)
‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे भाजपा कार्यालयात प्रकाशन :
- ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ असं पुस्तक लिहिण्यात आलं असून, या पुस्तकाचे भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात प्रकाशन करण्यात आले आहे.
- या पुस्तकावरून वादंग निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर यावरून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीही केली जात आहे.
- भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं आहे.
- तर या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी भाजपाचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारींसह भाजपाच्या नेत्यांची उपस्थिती होती. जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.
Must Read (नक्की वाचा):
हर्नाडेझ बार्सिलोनाचा मुख्य प्रशिक्षक :
- स्पेनला 2010 च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा मातब्बर खेळाडू आणि बार्सिलोनाचा माजी कर्णधार हॅव्हिएर हर्नाडेझ लवकरच बार्सिलोनाच्याच मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता बळावली आहे.
- तर सध्या कतार प्रीमियर लीगमध्ये अल-साद संघाला मार्गदर्शन करणाऱ्या हर्नाडेझच्या भवितव्याविषयी स्वत: क्लबच्या अधिकाऱ्यांनीच माहिती दिली आहे.
- बार्सिलोनाचे सध्याचे प्रशिक्षक इर्नेस्टो व्हॅलवरेड यांची लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्यामुळे हर्नाडेझकडे प्रशिक्षकपद सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. विशेषत: स्पॅनिश सुपर चषकातील उपांत्य फेरीत अॅटलेटिको माद्रिदविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नवीन वर्षात जसप्रीत बुमराहचा मानाच्या पुरस्काराने सन्मान :
- भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
- 2018-19 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी जसप्रीतची बीसीसीआयच्या मानाच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. तर सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून बुमराहचा सन्मान होणार आहे.
- 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या जसप्रीतने आपल्या तेजतर्रार माऱ्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं आहे. जसप्रीतने केवळ 12 कसोटी सामन्यांत 62 बळी मिळवत फार कमी कालावधीत संघातलं आपलं स्थान पक्कं केलं.
भारतीय संघाची घोषणा, हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व :
- भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे आगामी महिला टी-20 विश्वचषकाच्या भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने रविवारी 15 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली.
- बंगालची तडाखेबाज फलंदाज रिचा घोष हा भारतीय संघातला एकमेव नवीन चेहरा असून, 21 फेब्रुवारीला भारतीय महिला संघ सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला सामना खेळतील.
- तर याव्यतिरीक्त स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या शेफाली वर्मालाही भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिलांची अ गटात निवड झाली असून त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेश यांचं आव्हान असणार आहे.
- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), शेफाली वर्मा, जेमायमा रॉड्रीग्ज, हरलीन देओल, दिप्ती शर्मा, वेदा कृष्णमुर्ती, रिचा घोष, तानिया भाटीया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पुजा वस्राकर, अरुंधती रेड्डी, नुझत परवीन.
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात महाराष्ट्र अग्रस्थानी कायम :
- खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने रविवारीदेखील अपेक्षेप्रमाणे अग्रस्थान कायम ठेवले.
- रविवारी महाराष्ट्राला एकूण चार सुवर्णपदके मिळाली. सायकलिंगमध्ये पूजा दानोळे आणि मधुरा वायकर यांच्या रूपाने तर अॅथलेटिक्समध्ये अभय गुरव आणि पूर्वा सावंत यांनी सुवर्णपदके पटकवली.
- तर याबरोबरच महाराष्ट्राने पदकतालिकेत 11 सुवर्ण, 10 रौप्य आणि 15 कांस्य यांच्यासह एकूण 36 पदकांची कमाई केली आहे.
- महाराष्ट्राला रविवारी सायकलिंगमधून (मुलींच्या गटात) दोन सुवर्णपदके मिळाली. पूजा दानोळेने 15 किलोमीटर आणि मधुरा वायकरने 20 किलोमीटर गटात सुवर्णपदकांची कमाई केली.
- मधुराने 20 किलोमीटर अंतराची शर्यत 30 मिनिटे 36 सेकंद अशी वेळ देत जिंकली.
दिनविशेष:
- 13 जानेवारी 1610 मध्ये गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.
- मिकी माऊसची चित्रकथा 13 जानेवारी 1930 मध्ये प्रथम प्रकाशित.
- 13 जानेवारी 1953 मध्ये मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले.
- हिराकुंड धरणाचे उद्घाटन 13 जानेवारी 1957 मध्ये झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Mam ,
Very appreciative work done by you , we are getting valuable information from this site …but can we get PDF of 10 to 12 th book also ?