13 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
13 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 मार्च 2019)
महासागरात सात हजार सूक्ष्म जीवांच्या प्रजातींचा शोध :
- अॅटलांटिक व हिंदी महासागरात सूक्ष्म जीवांच्या एकूण सात हजार नवीन प्रजाती सापडल्या असून त्यामुळे जैवविविधतेचे आपले ज्ञान अधिक विस्तारणार आहे.
- हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वैज्ञानिकांनी या सूक्ष्म जीवांचा शोध घेतला असून त्यात अॅसिडोबॅक्टेरिया या नैसर्गिक सूक्ष्म जीवाचा समावेश आहे.
- तर हा सूक्ष्म जीव सागरी असून त्यात पहिल्यांदा क्रिस्पर ही जनुक संपादन प्रणाली नैसर्गिक पातळीवर दिसून आली होती. गेल्या आठ वर्षांतील संशोधनाचे हे फलित असून वैज्ञानिकांनी यात विविध ठिकाणचे पाण्याचे नमुने घेऊन त्यात जैवपटले तयार करणाऱ्या सूक्ष्म जीवांच्या प्रजाती शोधल्या. यात दहा नवीन जीवाणूंचा समावेश आहे.
- तसेच जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून जगात केवळ 35000 सूक्ष्म सागरी जीव 80 सागरी जीवाणू असल्याचा दावा खोटा ठरला आहे. प्रत्यक्षात खूप अधिक प्रजाती त्यात आहेत यातून महासागरातील
जैवविविधतेचे आपले ज्ञान वाढणार असून त्यातून नवीन औषधे तयार करता येणार आहेत. - तर अॅसिडोबॅक्टेरिया हा नवीन प्रकारच सागरी सूक्ष्म जीव असून तो फायला या प्रवर्गात मोडणार आहे. तो मातीतही असतो त्याचा उपयोग प्रतिजैविके व कर्करोगविरोधी औषधे तयार करण्यासाठी वापरतात कारण त्यात विशिष्ट प्रकारची
जनुके असतात. या प्रजातींमुळे रोगांवर नवीन उपचार पद्धती विकसित करणे शक्य होणार असून सागरी प्रजातीत नैसर्गिक जनुक संपादन प्रक्रिया म्हणजे क्रिस्परचा अवलंब होत असतो.
भारतातही ‘बोईंग’ 737 मॅक्स विमान जमिनीवर:
- इंडोनेशिया व इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांना अपघात झाल्यानंतर भारतातही हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) बोईंग 737 मॅक्स 8 या विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- विमानामधील त्रुटी दूर करुन त्यात सुधारणा होत नाही तोवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या विमानांचा वापर करता येणार नाही, असे डीजीसीएने म्हटले आहे.
- तर इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमानाला भीषण अपघात झाला. इंडोनेशियातील अपघातानंतर बोईंग विमानाला हा दुसरा भीषण अपघात होता. झालेल्या अपघातात 157 जण ठार झाले आहेत. या अपघातानंतर बोईंग 737 मॅक्स 8 या विमानातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
- तसेच चीनने सर्वप्रथम या बोईंग विमानांना व्यावसायिक सेवेतून काढून घेतले. यानंतर फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, सिंगापूर, ओमान, मलेशिया, नॉर्वे या देशांनीही बोईंग विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला. अखेर भारताने या विमानांचा
वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Must Read (नक्की वाचा):
50 टक्के आरक्षणाची मर्यादा संविधानात नाही:
- आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या खुल्या प्रवर्गाला शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या आपल्या निर्णयाचा बचाव करताना केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
- आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या खुल्या प्रवर्गाला दिलेले आरक्षण हे न्याय सुसंगत असल्याचे केंद्राने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने याप्रकरणी केंद्राला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
- तर सरकारने म्हटले आहे की, या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या खुल्या पवर्गातील गरिबांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याचा सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या 50 टक्के आरक्षणाच्या निर्णयावर
परिणाम होणार नाही. तसेच संविधानात आरक्षणाची 50 टक्के मर्यादा निश्चित करण्यात आलेली नसून सर्वोच्च न्यायालयाने ही मर्यादा निश्चित केली आहे.
भारतातील मतसंग्राम ठरणार जगातील सर्वात महागडी निवडणूक :
- जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात पुढील दोन महिने सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. दिल्लीतील सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या (सीएमएस) अहवालानुसार भारतातील ही निवडणूक प्रक्रिया जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरणार आहे.
- भारतातील निवडणुकीवर यंदा तब्बल 50, 000 कोटी रुपये (सात अब्ज डॉलर) इतका खर्च होण्याची शक्यता असून अमेरिकेतील निवडणुकीवर 2016 साली 6.5 अब्ज डॉलर खर्च झाले होते. तर भारतात 2014 साली निवडणुकीवर 5 अब्ज डॉलर खर्च झाले होते.
- तसेच सेंटर फॉर मीडिया स्टडीजने निवडणुकीतील खर्चासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारावर 8 डॉलर खर्च होणार आहे. भारतातील 60 टक्के जनतेचे दिवसाचे उत्पन्न तीन डॉलर असून
त्यातुलनेत निवडणुकीत प्रत्येक मतदारावर होणारा खर्च जास्त आहे. - सीएमएसचे प्रमुख एन भास्कर राव यांनी सांगितले की, निवडणुकीतील जास्तीत जास्त खर्च हा सोशल मीडिया, प्रवास आणि जाहिरात यावर खर्च होणार आहे.
दिनविशेष :
- 13 मार्च 1781 मध्ये विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.
- सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना 13 मार्च 1897 मध्ये झाली.
- पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 13 मार्च 1910 मध्ये अटक झाली.
- 13 मार्च 1930 मध्ये क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.
- अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची 13 मार्च 1940 मध्ये उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा